Project Director ATMA, Dharashiv.

Call Directions Website Contact the organization

Project Director ATMA, Dharashiv. agriculture technology management agency, Dharashiv.

18/09/2026
18/09/2026

दिनांक 17/9/2026 रोजी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ मा.कृषि मंत्री यांचे शुभहस्ते करण्यात आला.

शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या या योगदानाला अधिकृत ओळख मिळावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळणार असून, कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे, महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीची मालकी हा निकष न ठेवता शेतीतील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, मधुमक्षिकापालन, फलोत्पादन, पुष्पोत्पादन यांसह विविध शेती व शेतीपूरक कामांमध्ये सहभागी महिलांचा यामध्ये समावेश आहे.

तसेच भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर आणि पशुचारक यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पात्र महिला शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://krishi.maharashtra.gov.in) भेट देऊन महिला शेतकरी नोंदणीसाठी या लिंकवर माहिती भरावी.
👉 https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/

व महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्र साठी अर्ज कराMahila Shetkari Portal – Women Farmers Support Scheme https://share.google/7YBWuuFb...
17/09/2026

महिला शेतकरी प्रमाणपत्र साठी अर्ज करा
Mahila Shetkari Portal – Women Farmers Support Scheme https://share.google/7YBWuuFb4rGtmQ4gG

आज सायंकाळी 7.30 ला सोयाबीन पिकाची डिजिटल शेती शाळा थेट जॉईन करण्यासाठी झूम लिंकवर क्लिक करा:https://cutt.ly/sssoyabean ...
03/08/2026

आज सायंकाळी 7.30 ला सोयाबीन पिकाची डिजिटल शेती शाळा थेट जॉईन करण्यासाठी झूम लिंकवर क्लिक करा:

https://cutt.ly/sssoyabean
ID: 815 4923 0008
Passcode: 012175

कृषी पायाभूत सुविधा निधी जिल्हास्तरीय कार्यशाळा ठिकाण - कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर.दिनांक - 14 जुलै 2026वेळ - सकाळी 1...
13/07/2026

कृषी पायाभूत सुविधा निधी जिल्हास्तरीय कार्यशाळा
ठिकाण - कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर.
दिनांक - 14 जुलै 2026
वेळ - सकाळी 11.00 वाजता

Address

Front Of Central Building, Near DIC Center
Osmanabad
DHARASHIV-413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Project Director ATMA, Dharashiv. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Project Director ATMA, Dharashiv.:

Shortcuts

Share