Zilla Parishad Palghar

Call Directions Website

Zilla Parishad Palghar Official page of Zilla Parishad Office, , Rural Development Department, Government of Maharashtra

17/08/2026
15/08/2026

꧁🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिन🇮🇳 ꧂

८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा✨💐

14/08/2026

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

"१४ ऑगस्ट पालघर हुतात्मा दिन”

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'सन १९४२ च्या “चले जाओ' आंदोलनामध्ये पालघर हे महत्त्वाचे केंद्र होते. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४_ऑगस्ट_१९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाचजण शहीद झाले. सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे हे पाचजण स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढा देताना शहीद झाले. या शहिदांची स्मृती म्हणून पालघर येथे हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे.

पालघर च्या या शुरवीरांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन💐

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

९_ऑगस्ट_१९४२_क्रांती_दिन 🇮🇳 क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्य...
09/08/2026

९_ऑगस्ट_१९४२_क्रांती_दिन 🇮🇳

क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ असे म्हणतात.

क्रांती_दिना निमित्ताने सर्व वीर हुतात्म्यांना भावपुर्ण आदरांजली💐🙏

09/08/2026

९ ऑगस्ट हा दिवस
#जागतिक_आदिवासी_दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासाभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात जर आपण मूलनिवासी या नात्याने विचार केला तर मूलनिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता, समाजाचे अस्तित्व जपण्याची तसेच जल, जंगल व जमीन याचे रक्षण करण्याची जबाबदारी आदिवासी बांधवावर आहे.

*जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्ताने सर्व मूलनिवासी बंधु भगिनींना हार्दीक शुभेच्छा.*
💐💐💐💐💐💐💐💐

सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा म...
01/08/2026

सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६ वा जिल्हा १ ऑगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात आला. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान पसरला आहे.

महसूल दिन व पालघर जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दीक शुभेच्छा💐

25/07/2026

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी, पालघर डॉ. इंदु राणी जाखड यांचे नागरिकांना आवाहन

Address

Palghar DHQ, Main Administrative Building, Zilla Parishad Palghar, Morekuran Road, Palghar West
Palghar
401404

Opening Hours

Monday 10am - 6:15pm
Tuesday 10am - 6:15pm
Wednesday 10am - 6:15pm
Thursday 10am - 6:15pm
Friday 10am - 6:15pm

Telephone

02525-250800

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share