KrantiDnyanpith Kundal

Directions

KrantiDnyanpith Kundal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KrantiDnyanpith Kundal, Palus.

आज क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ज्ञानपीठ संकुल व श्रीमती सुलोचना भट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय कुंडल,मध्ये ग...
14/09/2026

आज क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ज्ञानपीठ संकुल व श्रीमती सुलोचना भट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय कुंडल,मध्ये गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

14/09/2026
29/08/2026
29/08/2026

*प्रोजेक्ट क्रांती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कुंडल यशस्वी यशवंत विद्यार्थी सौ.ऐश्वर्या कावरे मॅडम यांची पवित्र पोर्टल अंतर्गत मुंबई उपनगर मध्ये शिक्षिका पदी निवड*.....
*झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा*💐

*संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो*...

🌏💯*सौ.ऐश्वर्या कावरे मॅडम मुंबई उपनगर मध्ये शिक्षिका पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन* 💐💐

19/08/2026

ज्ञानाच्या वाटेवरील दीपस्तंभ — आदरणीय ॲड. प्रकाशभाऊ लाड

! घेऊन व्रत जनसेवेचे !
! स्वप्न पूर्ण केले ज्ञानपीठाचे !
! महाराष्ट्रात उमटवू ज्ञानपीठ संकुलाचा ठसा !
! आम्ही पुढे चालवू क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचा वारसा !

आत्ताच्या सांगली जिल्ह्यातील आणि पूर्वीच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानच्या परिसरातील कुंडल या ग्रामीण मातीत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्यासारख्या राष्ट्रनिष्ठ, परिवर्तनवादी विचारवंताच्या पोटी जन्मलेले त्यांचे सुपुत्र आदरणीय ॲड. प्रकाशभाऊ लाड यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मुंबई उच्च न्यायालयाच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. मात्र यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांनी आपल्या गावाशी, मातीशी आणि सामान्य माणसाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.

स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून आलेल्या अनुभवांनी त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—गरिबीवर मात करण्यासाठी आणि सक्षम भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाइतके प्रभावी साधन दुसरे नाही. म्हणूनच ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण व स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे, या ध्येयाने त्यांनी शिक्षणसेवेचे व्रत हाती घेतले.

याच विचारातून ‘प्रोजेक्ट क्रांती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कुंडल’ या उपक्रमाची सुरुवात झाली. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, सुविधा आणि प्रेरणा मोफत उपलब्ध करून देण्याचे हे कार्य खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन ठरत आहे. आज अनेक विद्यार्थी या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत आहेत.

प्रोजेक्ट क्रांती म्हणजे केवळ एक मार्गदर्शन केंद्र नाही; ते ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे आशास्थान आहे. काही वर्षांपूर्वी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज वृक्षात रूपांतर झाले आहे आणि भविष्यात त्याचा वटवृक्ष होईल, यात शंका नाही. या वटवृक्षाच्या पारंब्यांप्रमाणे यशस्वी विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रशासकीय सेवेत जाऊन प्रामाणिकपणे जनसेवा करतील, हीच या कार्याची खरी फलश्रुती असेल.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी विकास हा ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर अवलंबून आहे, हे ओळखून आदरणीय प्रकाशभाऊंनी गांधी एज्युकेशन सोसायटी आणि क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड ट्रस्ट यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

शिक्षकांना प्रशिक्षित करणे, कौशल्याधारित आधुनिक शिक्षणासाठी I.T.I. सारख्या उपक्रमांची उभारणी करणे, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अद्ययावत इमारती, डिजिटल वर्गखोल्या व शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे, दर्जेदार शिक्षकांची नियुक्ती करणे, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी सुसज्ज इमारत, ग्रंथालय आणि मोफत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे—या सर्व कार्यामागे एकच ध्येय आहे, ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी नव्या युगाचा सक्षम नागरिक बनला पाहिजे.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंनी पाहिलेल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रकाशभाऊ आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि कष्टाने कमावलेला पैसा शिक्षणसेवेसाठी खर्च करीत आहेत. वडिलांचा विचारांचा वारसा केवळ जपणे नव्हे, तर तो कृतीतून पुढे नेणे, हे त्यांच्या कार्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

कुंडल परिसराला ज्ञानाचे कवचकुंडल लाभावे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, या ध्येयाने आ. अरुणअण्णा आणि ॲड. प्रकाशभाऊ यांनी ज्ञानपीठ संकुलाच्या कार्याचा वेल गगनावरी नेला आहे. हे कार्य केवळ एका संस्थेचे नसून, ग्रामीण समाजाच्या भविष्याला आकार देणारे व्यापक सामाजिक अभियान आहे.

आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा देताना एकच सदिच्छा—

आपले आयुष्य शतायुषी होवो,
आपल्या हातून शिक्षणसेवेचे कार्य अखंड सुरू राहो,
हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आपल्या कार्यातून पंख मिळोत,
आणि क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचा विचारांचा वारसा महाराष्ट्रभर अधिक व्यापक होवो!

आदरणीय प्रकाशभाऊ,
आपण ज्ञानाच्या वाटेवरील दीपस्तंभ आहात.
आपल्या कार्याला मनःपूर्वक सलाम आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🌹🎂 शतायुषी व्हा! निरोगी राहा! कार्यरत राहा! 🎂🌹

— ज्ञानाच्या वाटेवरील आपल्या सर्व सहकाऱ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

Address

Palus
416309

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KrantiDnyanpith Kundal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share