30/09/2026
कुंडल येथे प्रशिक्षणार्थी लिपिक-लेखापाल यांच्याशी विशेष संवाद सत्र संपन्न! 🏛️🌱
कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी, कुंडल येथे कॅम्पा (CAMPA) अंतर्गत सुरू असलेल्या ४५ दिवसांच्या लिपिक-लेखापाल प्रशिक्षण वर्गाला मा. श्री. जयरामगौडा आर. (भा.व.से.), उपवनसंरक्षक (शिक्षण आणि प्रशिक्षण), पुणे यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधून:
🔹 प्रशिक्षण कालावधीतील निवास, भोजन व इतर पायाभूत सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
🔹 अभ्यासक्रम, कार्यालयीन कामकाज, लेखा प्रणाली व वन प्रशासनातील जबाबदाऱ्या यांविषयी मार्गदर्शन केले.
🔹 दैनंदिन प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी बहुमूल्य कानमंत्र दिला.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी मा. श्री. प्रशांत वरुंडे (विभागीय अधिकारी) संचालक (अतिरिक्त कार्यभार),आणि मा. श्री. भरत शिंदे (अप्पर संचालक - प्रशासन) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रशिक्षणातील सकारात्मक वातावरण आणि दर्जेदार सुविधांबद्दल प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले.
📍 कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी, कुंडल