09/10/2024
फलटण नगरपरिषद हद्दीतील फटाके विक्री व वापर करणारे व्यावसायिक तसेच नागरिक यांना कळविण्यात येते की, फलटण शहरात माझी वसुंधरा अभियान ५.० ची अंमलबजावणी सुरु असुन त्याकामी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदुषणास आळा बसावा यासाठी उपाययोजना सुरु आहेत. दिवाळी सणादरम्यान फटाक्यांचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. मा.शासन निर्णय परिपत्रक क्रमांक संकिर्ण १०२/सी-१८६/-९ यानुसार परदेशातुन आयात केलेले फटाके विक्री व त्यांचा वापर यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे तरीही येणा-या सणामध्ये परदेशी फटाक्यांची विक्री अथवा वापर करु नये.यंदाची सण पुर्वक म्हणजेच इकोफ्रेंडली साजरी करावयाची असल्याने फलटण नगरपरिषदे मार्फत परदेशी फटाके विक्री व वापर करण्यावर बंदी घालण्यात येत आहे.
माझी वसुंधरा अभियान-५.० व स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ अंतर्गत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार ज्या फटाक्यामध्ये बेरियम साल्ट,लिथियम,अर्सेनिक,लीड,मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकामुळे विषारी वायू तयार होतात. हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत. चला तर आपण सर्वांनी मिळून पर्यावरणपूरक ,पर्यावरणस्नेही व प्लास्टिक मुक्त दसरा दिवाळी साजरी करूया.
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव