29/12/2025
#पुणे
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपल पुणे PUNE, Pune.
29/12/2025
#पुणे
पुणे शहरात नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा चौक झालाय असं परवा अचानक पौड रस्त्यावर दिसलं. वसंतराव गोवारीकर यांच्या नावाचा चौक आहे का?
भाजपावाल्यांचा प्राधान्यक्रम राजकारणासाठी धर्म हाच आहे.
विज्ञानातलं त्यांना काही कळत नाही. विज्ञान म्हणलं की गोमुत्रामधल्या घटकांची नावं सांगतात.
कलेशी त्यांचा संबंध नाही. कला म्हणलं की भजन गाऊन दाखवतील.
संस्कृतीशी यांचा संबंध नाही. संस्कृती काय असं विचारलं तर पाडव्याची शोभायात्रा हीच संस्कृती असं सांगतील.
परंपरेशी यांचा संबंध नाही. परंपरा म्हणलं की राखी पौर्णिमेला संघ करतो ते रक्षाबंधन म्हणजे परंपरा असं सांगतील.
अध्यात्माशी यांचा संबंध नाही. अध्यात्म म्हणलं की लगेच अध्यात्मिक आघाडी वगैरे काढून तथाकथित महंतांना मतं मिळवण्याच्या कामाला लावतील आणि अध्यात्माचंच राजकीयीकरण करून वाटोळं करतील.
धर्म कशाशी खातात हे यांना कळत नाही. धर्म म्हणलं की फक्त जय श्रीराम म्हणून जोरात ओरडतील.
अशा महान पक्षाच्या हाती लोकांनी देशाचं, राज्याचं, शहराचं नशीब सोपवलेलं आहे.
आणि तरीही उर्वरित महाराष्ट्र आम्हाला 'सुजाण पुणेकर' म्हणतो.
पुण्यामध्ये वाहतुकीचे नियंत्रण अजिबात राहिले कोणी पण कसे पण वाहने चालवतात
19/11/2024
09/06/2024
पुण्याची मुंबई करून दाखवल्याबद्दल सर्व राजकारणी मंडळींचे आभार
#पुणे
11/05/2024
लोकांना धर्मोन्मादात गुरफटवणे हे हुकुमशाही वृत्तीच्या नेत्यांचे लोकशाहीच्या हत्येच्या दिशेने उचलले जाणारे अतिगंभीर पाउल असते.
लोकांचे विचार काढून घेणे हे राजकीय नेत्यांचे कार्य नसते तर लोक विशारशील आणि सकारात्मक कृतीशील कसे होतील हे पाहणे, त्यासाठी प्रयत्न करणे राजकीय नेत्यांचे कार्य असते.
भाजपा सरकार हे नुसते धर्मवादीच नव्हे तर टोकाचे धर्मोन्मादी आहे आणि त्या उन्मादात देशातील लोकशाही, सहिष्णू परंपरा आणि अर्थव्यवस्थेचा विध्वंस करत निव्वळ “धर्मझोंबी” निर्माण करत आलेले आहेत.
या पक्षाला आणि त्याच्या बी टीम असलेल्या वंचितसारख्या पक्षाला मत देणे म्हणजे लोकशाहीच्या मृत्यूस हातभार लावणे.
हा उन्माद थांबवण्यासाठी पुढे या आणि इंडिया आघाडी/ महाराष्ट्र विकास आघाडीला मत द्या ही नम्र विनंती.
संजय सोनवणी
#लोकसभा
शेवटच्या फेजच्या भाषणांमधली काही वाक्य अशी असतील-
- राहूल गांधींनी वडनगरचा विकास गेली दहा वर्षं रोकला आहे
- पंडीत नेहरूंनी भारतावर नोटाबंदी लादली
- जसोदाबेन यांनी मला संसार करू दिला नाही
- राजीव गांधींमुळे मी परदेशी शिकायला जाऊ शकलो नाही
- मी थापा मारतो त्यामुळे भारतीय राज्यघटना टिकून आहे.
-पुण्याच्या ट्रॅफिक जाममध्ये पाकिस्तानचा हात आहे
#लोकसभा
10/04/2024
💃 : एक दिवस याच फडावर त्याला तुनतुनं घेवून उभं नाय केलं, तर नावाची 'कमळी' न्हाय मी !
#बिनशर्त
#पिंजरा
#महाराष्ट्र
मराठी संस्कृतीची होळी!
होळीच्या दिवशी होळी पेटवायची; दुसऱ्या दिवशी धुळवडीला विझलेल्या होळीची राख खेळायची आणि मस्त मटण, चिकन, दारू वगैरे करायचे... त्यानंतर तीन दिवसांनी रंगपंचमीला आपलेच जुने कपडे घालून पाणी घातलेले रंग खेळायचे... ही झाली महाराष्ट्रीय पद्धत!
पण, परंतु, but, किंतू... होळीच्या दिवशी पांढरे कपडे घालून, इकोफ्रेंडली आणि स्किनफ्रेंडली कोरडे रंग उगीच एकमेकांच्या गालाला आणि कपड्यांना लावून स्पीकरवर हिंदी गाणी लावून नाचायचे आणि भांग प्यायची... ही झाली गायपट्ट्यातली पद्धत!
हिंदी सिनेमाच्या आक्रमणाने मराठी सिनेमा बुडाला... आणि तीच अवस्था मराठी सणांचीसुद्धा झाली आहे. रंगपंचमीला कुणी रंग खेळत नाही हे दुःख आहेच... त्याहीपेक्षा मोठे दुःख हे आहे की कधी दांडपट्टा आणि तलवारी फिरवणारी मर्दानी मराठी पोरे आता ओढण्या गळ्यात टाकून नऊ दिवस टिपऱ्या/गरबा खेळतात.
गायगुराची बारस, नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान वगैरे करणारे लोक आता बडी दिवाली, छोटी दिवाली करत कॅडबरी आणि सोनपापडी वाटतात. वडाला दोरे गुंडाळणे आता फालतू आहे, पण चाळणीतून नवऱ्याला बघण्याचा "करवा चौथ" आता फॅशनेबल आहे. थोड्या दिवसांनी संक्रांतीला तिळगुळ विसरून लोढी साजरी करायला लागले आणि छट पूजेला मराठी बायका जथ्था करून जायला लागले की आपण पूर्ण भय्ये झालो असे मानायला हरकत नाही.
उत्तरेच्या आक्रमणात मराठी संस्कृतीची होळी होताना पाहवत नाही.
- डॉ. विनय काटे