माणसं जिवाभावाची

माणसं जिवाभावाची

Share

लेह ते कन्याकुमारी सायकल यात्रा

Photos from माणसं जिवाभावाची's post 30/09/2024
Photos from माणसं जिवाभावाची's post 29/07/2024

My new sketch...
Best friend Manikandan ( Mani Anna )

21/05/2024

धर्मरक्षक ,शिवपुत्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भजन सेवा....

Photos from Nilesh Ramesh Bhise's post 11/05/2024
Photos from माणसं जिवाभावाची's post 10/01/2024

*याची साठी केला होता अट्टाहास*
आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आर्थिक शारीरिक पाठबळाने केलेले शिवकार्य फलिताप्रमाणे फुलत आहे
आपले गड वैभव पूर्ण उभे राहणार...
लवकरच कामाला सुरुवात..

आपण तयार केलेल्या तिकोनागड विकास आराखाड्यावरून तिकोनागडावर कामा करीता १,४७,०२,८५३/- निविदा प्रसारित.

प्रथमत: तिकोनागड विकास आराखडा तयार करण्याकरीता ज्या ज्ञात अज्ञात शिवभक्तांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार व अभिनंदन.

किल्ले तिकोनागड हा राज्याच्या असंरक्षीत स्मारका मध्ये येत असल्या मुळे त्यांचे संवर्धना करीता निधी उपलब्ध होत नव्हात. त्या करीता आपण तिकोनागड विकास आराखडा वास्तूविशारद यांचे कडुन १,००,०००/- ₹ (एक लक्ष रू) खर्च करत तयार केला होता. त्यास राज्य पुरातत्व विभागानी मंजूरी दिली .

या आराखड्यावरून किल्ले तिकोनागडास पुरातत्व विभाग पुणे चे मा.उप संचालक श्री विलास वाहने यांनी तिकोनागडास २,११,४९,२१८/- ₹ मंजूर होने बाबात प्रस्ताव पाठविला होता.

त्यानुसर गडास १,४७,०२,८५३/- रू.च्या कामास मंजूरी मिळत त्या प्रमाणे निविदा प्रसारित झाली.

गडावर आता चाललेल्या कामा पेक्षा मेठ्या प्रमाणित कामे होवून आपल्या शिवरायांचा तिकोनागड आधिक व्यवस्थित होईल.

पुनच्शा सर्व शिवभक्तांचे आभार व अभिनंदन.

गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगाव मावळ.

जय शिवराय.

05/11/2023

धन्यवाद…! दै. इंद्रायणी वार्ता 🙏🚩

05/11/2023

धन्यवाद…! दै. लोकमत 🙏🚩

02/11/2023

धन्यवाद..! दै. पुढारी 🙏🚩

01/11/2023

धन्यवाद…! दै. सकाळ 🙏🚩

Photos from माणसं जिवाभावाची's post 29/10/2023

॥ श्रीशिवराय असे शक्तिदाता ॥

३५० व्या श्रीशिवराजाभिषेका निमित्त लेह (खारदूंगला पास) ते कन्याकुमारी सायकल मोहीम २०२३ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आज बाणेर येथील श्रीबाणेश्वर मंदिराच्या सभागृहात सर्व सायकलस्वार यामध्ये श्री. विनायकराव दारवटकर, श्री. किरणभाऊ शेळके, श्री. हनुमंतराव जांभुळकर, श्री. विशालभाऊ डुंबरे, श्री. संदीपभाऊ गोडांबे, श्री. दत्तात्रयजी म्हाळसकर, श्री. राकेशभाऊ धावडे, बॅकअप टीमचे शिलेदार श्री. प्रकाशभाऊ खाणेकर, सायकल दुरूस्त करणारा कु. चिन्मय गंधे, ॲम्ब्युलंस चालक श्री. भुषण कदम, मोहिमेचा आचारी दत्ताभाऊ तसेच मोहिमेला ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केले अशांचा सन्मान व कौतुक सोहळा "माणसं जीवाभावाची"-"शिवभक्त" मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.
सदर कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री. पांडुरंगजी बलकवडे, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान चे संस्थापक श्री. नितीनदादा चौगुले, मुळशी तालुक्यातील घोटावडे गावचे मा. सरपंच श्री. रमेशनाना शेळके, पुण्यातील हिंदुत्ववादी नेतृत्व श्री. दिपकभाऊ नागपुरे, शिवव्याख्याते श्री. निलेशजी भिसे, युवा सामाजिक कार्यकर्ते कु. जयेश संजय मुरकुटे, युवा शिवव्याख्याते श्री. सौरभ करडे, मा. नगरसेवक श्री. सनी निम्हण, भाजपाचे श्री. गणेश कळमकर, श्री. लहू बालवडकर, श्री. प्रकाशतात्या बालवडकर, श्री. प्रल्हाद सायकर, श्री. सचिन पाषाणकर, रा. स्व. संघाचे श्री. राजेंद्र सुतार, श्री. राहुल कोकाटे, राष्ट्रपती पदक विजेते श्री. मधुकर रणपिसे, कोंढवे-धावडे गावचे मा. सरपंच श्री. अतुल धावडे, मा. उपसरपंच सुनितभाऊ लिंबोरे, शिवप्रतिष्ठान युवा जिल्हाध्यक्ष श्री. मुकुंदभाऊ मासाळ, श्री. आप्पा भूमकर, पत्रकार श्री. केदार कदम व इतर अनेक क्षेत्रातील मान्यवर शिवभक्तांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे सर्व सन्मानार्थी शिलेदारांचे कुटुंब या कौतुक सोहळ्यास आवर्जुन उपस्थित राहीले होते. शिलेदारांचा सन्मान करताना प्रत्येकाने संपुर्ण मोहिमेमध्ये सायकल चालवताना प्रवासामध्ये आलेले चित्तथरारक अनुभव उपस्थितांना सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अशोकभाऊ सरपाटील, श्री. अक्षय भेगडे, श्री. दादा दाभाडे, श्री. अक्षय मुरकुटे, श्री. हर्षल तापकीर, कु. अजिंक्य सुतार, कु. शुभम चांदेरे, ॲड. अनिरूद्ध बनसोड, कु. जयेश येळवंडे, कु. लोकेश कोंढरे, कु. अभिषेक पानसरे, श्री. महेश गायकवाड, कु. ओंकार घोलप, कु. अक्षय बोथाटे, श्री. प्रशांत अरवलकर, श्री. संदीप तुपे यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. विश्वास कळमकर यांनी केले तर 'माणसं जीवाभावाची-शिवभक्त मित्र परिवाराच्या' वतीने श्री. राजेंद्र बेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

्रीशिवराजाभिषेक_मोहीम_२०२३
लेह ते कन्याकुमारी सायकल यात्रा…🚴‍♂️💪🚩

27/10/2023

॥ श्रीशिवराय असे शक्तिदाता ॥

आपल्या जिगरबाज मावळ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा. 🙏🚩

्रीशिवराजाभिषेक_मोहीम_२०२३

Want your business to be the top-listed Government Service in Pune Station?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Vadgaon Maval Dist-pune Taluka/maval
Pune Station
412106