Breaking 🔥
उद्यापर्यंत अध्यादेश न निघाल्यास आमदार बच्चूभाऊ कडू, आ.निलेश लंके,आ.सुनील अण्णा शेळके आंदोलनात सहभागी होणार. 💪🚩
मराठा टायगर फोर्स MTF
शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विच?
मनोज दादांचा आदेश आहे☝️
कोणीही मुंबईत किव्हा मुंबई बाहेर जाऊ नये 🙏🏻
गाड्या पाशी व जिथं सोय आहे तिथंच थांबावे 🙏🏻
26/08/2022
मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व समन्वयक यांची सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक आयोजित केली होती त्यावेळी त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री महोदय दादा भुसे साहेबांच्या सोबत काही काळ बसून चर्चा केली आणि त्यावेळी काढलेले फोटो
*जय शिवराय*
आपला समाज असंघटित आहे, तसेच संघटीत होऊन काम करत नाही म्हणून मागे पडतोय .. आपल्या समाजाला एकसंध ठेवणे आणि त्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय , शैक्षणिक, व्यावसायिक, नोकरीविषयक उनन्तीच्या द्रुष्टीने *मराठा टायगर फोर्स (MTF)* ही संघटना कार्यरत आहे...आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हे समजून आम्ही *मराठा टायगर फोर्स* या संघटनेची स्थापना केली आहे. तसेच मराठा समाजासाठी काम करत असणाऱ्या कोणत्याही एका संघटनेत तरी आपण काम करावं... तसेच दिवसातील 24 तासांपैकी फक्त दोन तास समाजासाठी देणे हेच माझं ध्येय आहे असे मी स्वतः समजतो. कोणत्याही प्रकारे तुम्ही संघटनेला मदत करू शकता. ज्यांच्या कडे वेळ आहे ते वेळ द्या, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसे द्या, तसेच ज्यांच्याकडे समजउपयोगी काही कार्यक्रम असतील त्यांनी ते घ्यावेत. पण वेळ द्यायलाच हवा.. मी देखील सर्वसामान्य व्यक्ती सारखाच नोकरी, व्यवसाय, शेती, घरसंसार पाहूनच समाजासाठी योगदान देतो आहे... तुम्ही ही द्या. आणि समाजउपयोगी गोष्टी साठी होत असलेल्या मिटिंग आणि कार्यक्रम साठी वेळ द्या......आपल्या ज्या पुर्वजांनी स्वराज्यासाठी , देशासाठी, समाजासाठी आपलं स्वतः चं उभे आयुष्य वाहून टाकलं आहे म्हणून आपण स्वातंत्र्याची फळ चाखतोय.तर त्या महापुरुषांच्या आणि स्वतंत्र सैनिकांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम आपापल्या परीने करायला पाहिजेत आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण एक सक्षक्त समाज देणे हे आपल आद्य कर्तव्य आणि दायित्व आहे....
आपणास माझा विषय समजला असेल अशी मी अशा व्यक्त करतो
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
आपला - *संदीप लहाने पाटील*
संस्थापक अध्यक्ष- *मराठा टायगर फोर्स*
17/07/2022
*मराठा टायगर फोर्स,महाराष्ट्र राज्य (MTF)*
मा.मुख्य अधिकारी
पी. एम. पी. एम. एल.
*विषय*-
1) *हडपसर ते किल्ले पुरंदर व नारायणपूर*
2) *हडपसर ते श्री क्षेत्र तुळापूर व वढू बु*
3) *हडपसर ते किल्ले सिंहगड*
हे पर्यटन स्थळे असल्याने या ठिकाणी शनिवार आणि रविवार बससेवा सुरू करणे बाबत
*महोदय*
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करत आहोत की शनिवार आणि रविवारी शिव-शंभू प्रेमी- पर्यटक वरील ठिकाणी जात येत असतात परंतु त्यांना जाण्यायेण्यासाठी सध्या खूप गैरसोय होत असल्याने आपण *१)हडपसर ते किल्ले पुरंदर व नारायणपूर २)हडपसर ते श्री क्षेत्र तुळापूर व वढू बुद्रुक ३)हडपसर ते किल्ले सिंहगड* अशा ठिकाणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने लवकरात लवकर प्रवासासाठी बस सेवा सुरू करण्यात यावी ही तमाम शिव-शंभू प्रेमींची विनंती आणि इच्छा आहे
मा.PMPMLचे आयुक्त साहेब आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर ही बससेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती... तमाम शिव-शंभू प्रेमीच्या भावनांचा आदर करून आपण ही बस सेवा * दिनांक 30 जुलै 2022 या तारखेच्या आत चालू करावी अशी तमाम शिव-शंभू प्रेमींची अपेक्षा आहे.
*कळावे आपले*
*संदीप लहाने पाटील*
संस्थापक अध्यक्ष
*निलेश काळे पाटील*
प्रदेश उपाध्यक्ष
*किरण दादा गायकवाड*
प्रदेश संघटक
*विशाल लहाने पाटील*
प्रदेश महासचिव
प्रत
१)मा.महापालिका आयुक्त, पुणे
२)PMPML आयुक्त, पुणे
28/05/2022
सियाचीनमध्ये श्लोक नदीत बस कोसळून मराठा बटालियनचे ७ जवान शहीद.
शाहिद जवानांना
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🇮🇳
01/05/2022
जय जिजाऊ - जय शिवराय - जय शंभूराजे
*मराठा टायगर फोर्स- महाराष्ट्र राज्य (MTF)*
या महाराष्ट्रातील शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या मराठी तरुण-तरुणींच्या संघटनेला आज ७ वर्षे पूर्ण झाली
*१ मे -वर्धापनदिन*
*७व्या वर्धापनदिनानिमित्त सर्वाना हार्दिक हार्दिक शिव- शुभेच्छा*
*शुभेच्छूक*
संदीप लहाने पाटील
संस्थापक अध्यक्ष - मराठा टायगर फोर्स
मोबा-9823213177
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411030
