बातम्यांचे नवे पर्व पुणे पूर्व

बातम्यांचे नवे पर्व पुणे पूर्व

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बातम्यांचे नवे पर्व पुणे पूर्व, 411040, Pune.

पुणे पूर्व | Local News Portal
बातम्यांचे नवे पर्व, पुणे पूर्व!
पुण्यातील पूर्व भागातील बातम्या व वास्तव
📰 डिजिटल पत्रकारितेचा नवा चेहरा
#PunePurva #PuneEast #DigitalNews #PuneMedia #MarathiNews

28/01/2026

बारामती येथील अजितदादा पवार यांच्या अपघाताचे व्हिडिओ.

#अजितपवार

28/01/2026

किती धावपळ होती तुमच्या आयुष्यात दादा. बरं तुमच्यासोबत सगळ्यांना धावायला लावायचे ते ही एकदम पट्टीत. आम्ही बातम्या करायचो दादा पहाटेच अमक्या ठिकाणी पोहोचले, तमक्या अधिकाऱ्याला झापलं. काम पुन्हा करायला सांगितलं. काम म्हणलं की तुम्हाला जोम असायचा.

दादांना भेटलं की काम होतंय हा मंत्रालयातला एक अलिखित नियम. म्हणूनच मुख्यमंत्र्यांइतकाच गजबजाट दादांच्या ऑफिसला असायचा. कागद हातात आलाय आणि त्याचं उत्तर दादांकडे नाही असं कधी झालं नाही. कामाची त्यांची स्टाईल आणि किस्से त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी आणि मित्र सांगत असतात.

दादा एखाद्या दौऱ्याला गेलेत आणि त्यांना एखादं मजेशीर कॅरेक्टर भेटलं नाही असं झालं नाही. 'मला सगळ्यांनी साथ द्या' असं म्हणतात कुणीतरी संबळ वाजवावा आणि दादांनी म्हणावं 'तू गबस तू नको साथ देऊ' आणि सगळ्यांसोबत स्वतःही हसावं. 'वो छोडके गये कैसा लगा' दादा म्हणतात 'अच्छा नहीं लगा' आणि जोक व्हावा सगळे फुटावे. कुणीतरी खालून भाषण सुरू असताना आय लव्ह यु दादा म्हणावं आणि दादांनी म्हणावं अरे बायकोला म्हण लव्ह यु लव्ह यु. कार्यक्रमात कुणीतरी चिठ्ठी द्यावी आणि त्यात मोकाट जनावरांचा विषय द्यावा दादांनी त्यावरून विनोद करावा. फडणवीस-शिंदे आणि दादा सोबत असताना शिंदेंनी काहीतरी बोलावं आणि दादांनी 'हमारा फिक्स है हम जा रहे है' 'अजून विसरले नाहीत' असे पंच टाकावेत. सगळे लोटपोट व्हावेत. कुठेतरी गाडी थांबवावी मिसळ खावी, चहा घ्यावा, म्हाताऱ्या कोताऱ्यांना भेटावं काम जाणून घ्यावं, थोडीशी मस्ती करावी. दादांच्या अशा किस्यांचाच एखादा खंड होईल.

राजकारणात काही तडजोडी झाल्या तरी कुटुंब म्हणून त्यांची आपुलकी कायम राहिली. बाहेरच्यांना कुटुंबात जास्त घुसून दिलं नाही. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे तंत्र त्यांनी कसोशीने पाळलं. त्यामुळं फुटीनंतर सुद्धा अनेक जिव्हाळ्याचे क्षण आपण पाहिले.

राजकीय भूमिकांमुळे काही आरोपांमुळे टीकाही झाल्या मात्र त्याला दादांनी फार किंमत दिली नाही. त्यांचं व्हिजन क्लिअर होतं, तसे ठामपणे निर्णय त्यांनी घेतले. त्यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या असल्या तरी समोरच्यांना देखील वेळोवेळी उघडं पाडलं.

व्हिजन पाहिजे तर दादांसारखा नेता पाहिजे, दादांनी केलेली अनेक कामं सांगता येतील, शिवाय कुणाचंही काम असो ते बेष्ट झालं पाहिजे यासाठी आग्रही असणारा हा व्हिजनरी नेता. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला नेता.. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्रालय सगळ्या स्तरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता.

असे नेते फार कमी घडतात, अर्थात दादा घडण्यामागे शरद पवार आहेत मात्र यात त्यांची मेहनत, अभ्यास, सातत्य आणि लोकांची जुळलेली नाळ या गोष्टी दादांना 'दादा' बनवून जातात. दादांची तुलना शरद पवारांशी व्हायची मात्र त्यांनी स्वतःला तिकडं नेलं नाही, ते स्वतः भन्नाट होते.

आता हे ट्रेनमध्ये लिहीत असताना दादांच्या बातम्या बघणारी कित्येक लोकं भावुक झालीत, माझ्या डोळ्यातलं पाणी मी रोखू नाही शकलोय.

अवघड होऊन बसलंय, पवार फॅमिली आणि दादांवर प्रेम करणारी माणसं यातून कशी सावरतील हा बिकट प्रश्न आहे.

धक्के देण्यात दादा माहीर होते, मात्र एवढा मोठा धक्का द्याल असं वाटलं नव्हतं दादा.

आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येतंय, दादा बजेट मांडताना दिसले असते, काही शेर आले असते काही टोलेबाजी झाली असती, मजा आली असती.

अजातशत्रू नेता गेला... दादांची धावपळ थांबली. महाराष्ट्र सुन्न झालाय.

दादा, लव्ह यु... 🙏🏽

#अजितपवार #निलेश्राव #अजितदादा

शिव्यांचा प्रचार आणि कोमेजलेली लोकशाही - बातम्यांचे नवे पर्व - पुणे पूर्व न्युज | Pune Purva News 12/01/2026

कोमेजलेली लोकशाही...

#पुणे #मनपा #निवडणूक #वानवडी #भाजप #काँग्रेस

शिव्यांचा प्रचार आणि कोमेजलेली लोकशाही - बातम्यांचे नवे पर्व - पुणे पूर्व न्युज | Pune Purva News प्रतिनिधी (वानवडी) : निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आणि याच टप्प्यावर नेत्यांची खरी ओळख समोर येते पण दुर्दै....

09/01/2026

मतदारांसाठी खास सूचना

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६

जबाबदार मतदार, सक्षम लोकशाही

#पुणेमहानगरपालिका #सार्वत्रिकनिवडणूक #पुणेपूर्व

वानवडीत आपचा झाडू कोणाची सफाई करणार? १८-ड मधून मनोज सुभाषचंद चोरडीया रिंगणात. - बातम्यांचे नवे प 07/01/2026

वानवडीत आपचा झाडू कोणाची सफाई करणार? १८-ड मधून मनोज सुभाषचंद चोरडीया रिंगणात.

वानवडीत आपचा झाडू कोणाची सफाई करणार? १८-ड मधून मनोज सुभाषचंद चोरडीया रिंगणात. - बातम्यांचे नवे प पुणे (प्रतिनिधी) – वानवडी साळुंखेविहार प्रभागात आम आदमी पक्षाने दोन उमेदवार रिंगणात उतरवले असून १८-ब मधून शर्मिष.....

अपक्ष उमेदवार सचिन जांभुळकर यांनी प्रचाराात आघाडी घेतली - बातम्यांचे नवे पर्व - पुणे पूर्व न्य 07/01/2026

वानवडी : अपक्ष उमेदवार सचिन जांभुळकर यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होताना दिसत आहे

#पुणेपूर्व

अपक्ष उमेदवार सचिन जांभुळकर यांनी प्रचाराात आघाडी घेतली - बातम्यांचे नवे पर्व - पुणे पूर्व न्य वानवडी : अपक्ष उमेदवार सचिन जांभुळकर यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण नि.....

06/01/2026

पुण्याच्या विकासाच्या वाटचालीत मोलाचा ठसा उमटवणारे, माजी खासदार व कुशल पायलट सुरेशभाई कलमाडी यांचे दुःखद निधन ही अत्यंत वेदनादायक बातमी आहे.

पुणे शहराच्या पायाभूत सुविधा, क्रीडा, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय ओळख घडवण्यात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. नेतृत्व, धाडस आणि दूरदृष्टी यांचा संगम असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तस्वकीयांना व समर्थकांना धैर्य लाभो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण आदरांजली. 🙏

#सुरेशकलमाडी

रामटेकडी–माळवाडी–वैदुवाडीमध्ये भाजपाची पदयात्रा; नव्या प्रवेशांनी प्रचाराला वेग, मात्र अंत 05/01/2026

रामटेकडी–माळवाडी–वैदुवाडीमध्ये भाजपाची पदयात्रा; नव्या प्रवेशांनी प्रचाराला वेग, मात्र अंतर्गत नाराजीचा सूर.

#पुणेपूर्व

रामटेकडी–माळवाडी–वैदुवाडीमध्ये भाजपाची पदयात्रा; नव्या प्रवेशांनी प्रचाराला वेग, मात्र अंत पुणे : प्रभाग क्र. १७ (रामटेकडी–माळवाडी–वैदुवाडी) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पदयात्रेमुळे परिसरात ...

प्रभाग १८ वानवडी साळुंखे विहार मध्ये पंचरंगी लढत; भाजपमधील बंडखोरीने समीकरणे बदलली - बातम्यां 05/01/2026

प्रभाग १८ वानवडी साळुंखे विहार मध्ये पंचरंगी लढत; भाजपमधील बंडखोरीने समीकरणे बदलली.

#पुणेपूर्व

प्रभाग १८ वानवडी साळुंखे विहार मध्ये पंचरंगी लढत; भाजपमधील बंडखोरीने समीकरणे बदलली - बातम्यां महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ (वानवडी–साळुंखे विहार) मधील निवडणूक लढत दिवसेंदिवस अधिक चुरशीची आणि गुंतागु...

वानवडी परिसरात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार निवडणूक प्रचाराला सुरुवात - बातम्यांचे नवे पर्व - 05/01/2026

वानवडी परिसरात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार निवडणूक प्रचाराला सुरुवात

#वानवडी #मनपानिवडणूक #भाजप #पुणेपूर्व #प्रभाग26

वानवडी परिसरात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार निवडणूक प्रचाराला सुरुवात - बातम्यांचे नवे पर्व - वानवडी परिसरात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. ....

वानवडी प्रभागात काँग्रेस उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात - बातम्यांचे नवे पर्व - पुणे पूर्व न्य 05/01/2026

वानवडी प्रभागात काँग्रेस उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात

#निवडणूक #पुणे #मनपा #वानवडी #काँग्रेस

वानवडी प्रभागात काँग्रेस उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात - बातम्यांचे नवे पर्व - पुणे पूर्व न्य

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


411040
Pune
411040