31/05/2026
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
#आहिल्याबाई_होळकर
Shri. Chandrakantdada Patil, Cabinet Minister of Maharashtra and MLA, Kothrud - Pune.
31/05/2026
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
#आहिल्याबाई_होळकर
विशेष मुलाखत: 'जय हो' मालिका!
उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या, पुण्यातील ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र 'निसर्ग छाया' या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची विशेष मुलाखत नक्की पहा!
🔸 प्रसारण: गुरुवार, ४ जून रोजी रात्री ८:०० वाजता
🔹 पुनःप्रसारण: शुक्रवार, ५ जून रोजी दुपारी २:०० वाजता
⚡ वाहिनी: फक्त दूरदर्शन सह्याद्रीवर!
#चंद्रकांतदादापाटील #जयहो #दूरदर्शनसह्याद्री #निसर्गछाया #पुणे #विशेषमुलाखत
Chandrakant Patil
28/05/2026
प्रखर राष्ट्रभक्ती व अखंड स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज कोथरूड येथील निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#स्वातंत्र्यवीरसावरकर #सावरकरजयंती #चंद्रकांतदादापाटील #कोथरूड
Chandrakant Patil
27/05/2026
नवा उत्साह... नवी ऊर्जा!
पुणे येथे 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' अंतर्गत भाजप पुणे शहराच्या दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्गाची अतिशय उत्साहात सुरुवात झाली.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ऊर्जावान कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कार्यकर्त्यांचा हाच उत्साह आणि आपुलकी हीच भाजपाची खरी ताकद आहे!
#चंद्रकांतदादा_पाटील #भाजप_पुणे #प्रशिक्षण_वर्ग #कार्यकर्ता
Chandrakant Patil
समाजात वावरताना बऱ्याचदा फक्त चुका किंवा उणिवा शोधण्याकडे कल असतो. पण, त्या पलीकडे जाऊन जे लोक प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे काम करत आहेत, त्यांना बळ देणं ही आपली खरी जबाबदारी आहे.
-ना. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री)
(२२ मे २०२६ | नवभारत सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड सोहळा,पुणे)
#सकारात्मकता
Chandrakant Patil
24/05/2026
'मानसी प्रेरणा फाउंडेशन'च्या कार्याचा राष्ट्रीय व्यासपीठावर गौरव!
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या 'मानसी प्रेरणा फाउंडेशन'ची 'जय हो' कार्यक्रमासाठी निवड. महिला सशक्तीकरण आणि मानसिक आधारासाठीच्या या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर झालेला हा एक गौरवपूर्ण सन्मान आहे.
#गौरवक्षण #महिला_सशक्तीकरण #समाजकार्य #चंद्रकांतदादा_पाटील
Chandrakant Patil
केवळ मदत करणे म्हणजे सेवा नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाचे दुःख पूर्णपणे दूर होऊन एक सुखी आणि समाधानी समाज निर्माण व्हावा, हाच आपल्या सामाजिक बांधिलकीचा खरा उद्देश असला पाहिजे. जेव्हा आपल्याला दुःख नसलेला समाज निर्माण करता येईल, तेव्हाच आपले प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी होतील.
-ना. चंद्रकांतदादा पाटील ( उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री)
(२२ मे २०२६ | नवभारत सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड सोहळा, पुणे )
#नवभारत_सोशल_इम्पॅक्ट_अवॉर्ड
Chandrakant Patil
23/05/2026
बाणेर-बालेवाडीकरांना वीज समस्येतून मिळणार दिलासा!
बाणेर-बालेवाडी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची गंभीर दखल घेत, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
नागरिकांना अखंडित आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल, अशी ग्वाही चंद्रकांतदादांनी यावेळी दिली.
#पुणे #विकासकामे
Chandrakant Patil
आजच्या युगात पैसा, यश आणि प्रतिष्ठा केवळ बाह्य सुख देऊ शकतात. खरं सुख तर मानसिक समाधानात असतं. त्याहूनही पुढे जाऊन, जेव्हा आपण निस्वार्थीपणे कोणाच्या कामी येतो आणि समाजकार्य करतो, तेव्हा आध्यात्मिक समाधान मिळतं, जे पैशाने कधीच विकत घेता येत नाही.
-ना. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री )
(२२ मे २०२६ | नवभारत सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड सोहळा,पुणे)
#चंद्रकांतदादापाटील
Chandrakant Patil