28/10/2025
*एक ऐतिहासिक कदम, एक सशक्त आवाज़!*
Dr. Farha Anwar Hussain Shaikh, जिन्होंने मुस्लिम महिलाओं को मस्जिदों में नमाज़ की अनुमति दिलाने के लिए पुणे से लेकर सुप्रीम कोर्ट तक संघर्ष किया
अब उनकी यह प्रेरणादायक यात्रा और विचार सुनिए Awaz The Voice News Channel पर, जहाँ देश की जानी-मानी पत्रकार Aamna Farooque (Delhi) ने उनसे एक गहराई भरी बातचीत की।
🎙️ विषय: “मस्जिद में महिलाओं को इबादत का हक़”
📺 पूरा इंटरव्यू देखें: https://youtu.be/ahGljzALCew?si=y5YVYHG6NhsniVJ3
फराह शेख: जिन्होंने महिलाओं के लिए मस्जिद के दरवाजे खुलवाए
#पुणे में #कमरुद्दीन #मस्जिद के बाहर हुई एक घटना ने फराह को इतना प्रेरित किया कि उसने एक शक्तिशाली आंदोलन को जन्म दि.....
23/10/2025
आभार संदेश 🌍
Miss Farha Charitable Foundation की ओर से हम *The Times of India* जो एक अंतरराष्ट्रीय स्तर का प्रतिष्ठित समाचार पत्र है और *Awaz The Voice* जो एक अग्रणी अंतरराष्ट्रीय न्यूज़ एजेंसी है दोनों का दिल से धन्यवाद करते हैं।
*पुणे के शनिवारवाड़ा नमाज़ प्रकरण से जुड़ी हमारी संस्था की भूमिका और मुस्लिम महिलाओं के हक़ों के लिए हमारी चल रही लड़ाई को इन दोनों मीडिया संस्थानों ने अपने मुख्य पृष्ठ पर प्रमुख स्थान दिया*। उन्होंने हमारी आवाज़ को सिर्फ महाराष्ट्र या भारत तक सीमित नहीं रखा, बल्कि उसे अंतरराष्ट्रीय स्तर तक पहुँचाया इसके लिए हम उनका हार्दिक आभार व्यक्त करते हैं।
महिला सशक्तिकरण, धार्मिक स्वतंत्रता और सामाजिक न्याय जैसे मुद्दों को जिस संवेदनशीलता और निष्ठा से उन्होंने दुनिया के सामने रखा, वह क़ाबिले तारीफ़ है।
आपका यह सहयोग हमारे प्रयासों को और मज़बूती देता है।
हम सच्चे दिल से धन्यवाद देते हैं।
✒️
डॉ. फरहा अनवर हुसैन शेख
Miss Farha Charitable Foundation
📞 8459867838
📧 [email protected]
The Times of India Hindustan Times Times of India: Pune
‘Namaz row unfortunate, women face discrimination within community too’ | Pune News - The Times of India
Pune: Muslim Satyashodhak Mandal, a social organisation, described BJP Rajya Sabha member Medha Kulkarni's act of \"purifying\" the site in Shaniwarwada.
20/10/2025
आभार संदेश
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे आम्ही Free Press Journal या राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
शनिवारवाडा येथील अलीकडील घटनेवर वृत्त देताना, आमच्या संस्थेच्या भूमिकेला आणि आमच्या विचारांना त्यांनी प्रमुख स्थान दिले आहे. विशेषत: महिलांच्या मशिदींमधील प्रवेश हक्काबाबत डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख यांच्या मतांना त्यांनी जागा दिली, याबद्दल आम्ही Free Press Journal च्या संपादक मंडळाचे, पुणे तसेच दिल्लीतील संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
आमची संस्था समाजात समानता, स्त्री-सक्षमीकरण आणि धार्मिक सौहार्द यासाठी कार्यरत आहे. आमच्या कार्याला माध्यमांतून सातत्याने मिळणारा प्रतिसाद आणि मान्यता ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
प्रत्येक मीडिया हाऊस, पत्रकार आणि वृत्तसंस्था ज्यांनी आमच्या कार्याला जागा दिली — त्यांचेही आम्ही ऋणी आहोत.
समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क आणि सन्मान मिळावा, हा आमचा प्रयत्न पुढेही असाच सुरू राहील.
— मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख
अन्वर हुसेन शेख
📞 8459867838 / 9511696198
✉️ [email protected]
‘Purify Your Thoughts’: Opposition Hits Back At BJP MP Over Shaniwarwada Namaz Protest
Defending her actions, she stated that Shaniwarwada is an ASI-protected historical monument and a symbol of Hindavi Swaraj established by Chhatrapati Shivaji Maharaj, and namaz cannot be allowed at the site. However, Kulkarni’s act has drawn criticism from several political leaders and social acti...
20/10/2025
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख व अन्वर हुसेन शेख यांच्या वतीने
दिनांक: १९ ऑक्टोबर २०२५
विषय: शनिवारवाडा प्रकरणाचा निषेध; पण मूळ कारण - 'महिलांना मशिदीत प्रवेशबंदी' - मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनची ठाम भूमिका
पुणे — आज शनिवारवाडा परिसरात एक मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेवरून काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप नोंदवला, तसेच भाजपच्या नेत्यांनी यास राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झाला.
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन या घटनेकडे दोन महत्त्वाच्या पैलूंमधून पाहते आणि आपली स्पष्ट भूमिका मांडत आहे:
१. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृतींचा तीव्र निषेध:
कोणत्याही प्रकारची धार्मिक अशांतता, समाजद्वेष किंवा धार्मिक स्थळांचा वापर करून तणाव निर्माण करणाऱ्या कृतींचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या घटनेनंतर भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी त्या परिसरात एका मजारावर झेंडा लावण्याचा जो कथित प्रयत्न केला, तो अत्यंत बेजबाबदारपणाचा आणि आगीत तेल ओतणारा प्रकार आहे.
यापूर्वीही, मग ते सारसबागेतील बासी ईदच्या मुद्दा असो, कोथरूडमधील दांडिया कार्यक्रमावरून निर्माण केलेला वाद असो, वा आझम कॅम्पससारख्या शैक्षणिक संस्थांबाबतची त्यांची विशिष्ट भूमिका असो;
यातून एक ठराविक सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा नमुना दिसून येतो. आजच्या संवेदनशील प्रसंगी अशी कृती करणे, हे शहराचा सलोखा बिघडवण्यास कारणीभूत ठरते.
२. घटनेचे मूळ कारण: महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे
सार्वजनिक, ऐतिहासिक किंवा पर्यटक स्थळांवर कोणतेही धार्मिक विधी होऊ नयेत, याबद्दल आमचेही दुमत नाही. पण आज त्या महिलांवर सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याची वेळ का आली, याच्या मुळाशी जाणे अत्यावश्यक आहे.
याचे मूळ उत्तर एका कटू सत्यात आहे: जर शहरातील मशिदींची दारे मुस्लिम महिलांसाठी सन्मानपूर्वक खुली असती, तर त्यांना शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात नमाज अदा करण्याची गरजच भासली नसती. शहरातील अनेक मशिदींमध्ये महिलांना प्रार्थनेसाठी प्रवेश, सोय किंवा सुरक्षित जागा उपलब्ध नाही. हीच व्यवस्थात्मक अडचण (Systemic Problem) आजच्या या अनावश्यक वादाचे खरे मूळ आहे.
डॉ. फरहा शेख यांचा लढा आणि फाऊंडेशनची भूमिका:
आमच्या संस्थेच्या संस्थापिका, डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख, याच मूलभूत हक्कासाठी गेल्या १० वर्षांपासून 'महिलांना मशिदीत प्रवेश' (Women's Entry in Mosques) यासाठी घटनात्मक आणि सामाजिक लढा देत आहेत.
* हा केवळ धार्मिक नाही, तर महिलांच्या घटनात्मक समानतेचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे.
* डॉ. फरहा यांनी स्वतः भारतातील अनेक प्रमुख मशिदींमध्ये महिलांना प्रार्थनेची प्रवेश मिळावा , यासाठी रीतसर पत्रव्यवहार केला, मात्र त्यांना सातत्याने परवानगी नाकारण्यात आली.
* हाच लढा आज डॉ फरहा अन्वर शेख सुप्रीम कोर्टातही याचिका दाखील केली आहे आणि प्रलंबित आहे.
* जर महिलांना त्यांचा हा धार्मिक आणि घटनात्मक हक्क मिळाला असता, तर आज असे प्रसंगच उद्भवले नसते आणि राजकीय व्यक्तींना त्यावर 'राजकारण' करण्याची संधीही मिळाली नसती.
आमची मागणी:
* प्रशासनाने तात्काळ शांतता प्रस्थापित करावी आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही (राजकीय किंवा धार्मिक) कृतींवर कठोर कारवाई करावी.
* ऐतिहासिक वास्तूंच्या वापराबाबत स्पष्ट नियमावली जाहीर करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रसंग टाळता येतील.
* सर्वात महत्त्वाचे: प्रशासनाने आणि मुस्लिम समाजाने 'महिलांना मशिदीत प्रवेश' या मूलभूत प्रश्नावर संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा. महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक प्रार्थनेची सोय करणे, हीच अशा घटनांवरील खरी उपाययोजना आहे.
नोट: आम्ही शनिवारवाडा येथील घटनेचे समर्थन करत नाही, पण त्या महिला ज्या परिस्थितीमुळे तिथे नमाज अदा करण्यास भाग पडल्या, त्या परिस्थितीचे आणि त्यांच्या मूळ हक्काचे आम्ही ठाम समर्थन करतो.
संपर्क:
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख —
अन्वर हुसेन शेख —
8459867838 / 9511696198
ई-मेल: [email protected]
06/10/2025
⚕️ Miss Farha Charitable Foundation चा तातडीचा इशारा : ‘Coldrif Syrup’ ही विषारी औषधं मुलांच्या जीवाला धोका
पुणे Miss Farha Charitable Foundation तर्फे नागरिकांना आणि पालकांना गंभीर इशारा देण्यात आला आहे. अलीकडेच बाजारात उपलब्ध असलेल्या ‘Coldrif Syrup’ या औषधामुळे किमान १२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या सिरपमध्ये अत्यंत विषारी आणि हानिकारक रासायनिक घटक असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी हे औषध अजूनही मेडिकल स्टोअर्समध्ये विकले जात आहे आणि काही डॉक्टरांकडून ते लिहूनही दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे — जे अत्यंत चिंताजनक आहे.
🚨 तातडीची कारवाई आवश्यक:
जर कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे औषध विकले जात असल्याचे दिसले, किंवा एखादा डॉक्टर हे औषध प्रिस्क्राइब करत असल्याचे आढळले,
तर नागरिकांनी लगेच पुढील ठिकाणी संपर्क साधावा:
1. नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा
2. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाशी संपर्क साधा
3. Miss Farha Charitable Foundation च्या खालील क्रमांकावर त्वरित माहिती द्या: 8459867838 / 9511696198
4. तसेच आपल्या स्थानिक धार्मिक संस्था, सामाजिक संघटना किंवा स्थानिक आरोग्य अधिकारी यांनाही तत्काळ कळवा, जेणेकरून आणखी जीवितहानी टाळता येईल.
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख, अध्यक्षा Miss Farha Charitable Foundation, यांनी सांगितले:
“जी औषधं जीवन वाचवण्यासाठी तयार केली जातात, तीच जर मृत्यूचं कारण ठरली, तर हा समाजासाठी मोठा इशारा आहे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की, अशा औषधांबद्दल सतर्क राहावं आणि त्वरित कारवाई करावी. एका फोनमुळे अनेक निरपराध जीव वाचू शकतात.”
जनहितार्थ प्रसिद्ध
ही सूचना Miss Farha Charitable Foundation, पुणे तर्फे जनहितार्थ जारी करण्यात आली आहे. आपल्या परिसरातील मेडिकल स्टोअर्सवर लक्ष ठेवा. जर ‘Coldrif Syrup’ हे औषध आढळले, तर त्वरित कळवा कारण आपली एक छोटीशी खबरदारी, एका मुलाचा जीव वाचवू शकते.
#जनजागृतीअभियान #मुलांचेसुरक्षितआरोग्य #औषधांपासूनसावध #पुणेआरोग्यजागृती
03/10/2025
Too many suffer in silence.
Don’t let financial barriers stop you from seeking help. MFCF provides legal aid for just ₹1 to ensure women and underprivileged voices are heard.
Reach out today. Justice is your right. ⚖️
02/10/2025
“Cleanliness is not just a duty, it’s a way of showing respect to our nation.”
On the occasion of Gandhi Jayanti and under the vision of Swachh Bharat Abhiyan,
Miss Farha Charitable Foundation carried out a cleanliness drive to promote hygiene and civic responsibility.
Our Director, Mr. Anwar Shaikh, personally participated in the cleanliness activity,
spreading the message that true tribute to Mahatma Gandhi lies in following his ideals of cleanliness and service.
Let’s all pledge to keep our surroundings clean and contribute to a healthier, greener India.
🌿 A cleaner today for a brighter tomorrow! 🌿
02/10/2025
✨ Warm wishes on Dussehra! ✨
The festival that celebrates the triumph of Good over Evil, Truth over Falsehood, and Light over Darkness.
On this auspicious occasion, Miss Farha Charitable Foundation,
Anwar Hussain Shaikh and Dr. Farha Anwar Hussain Shaikh
extend heartfelt greetings to everyone.
May this Dussehra inspire us to conquer negativity with kindness,
hatred with compassion, and injustice with truth.
🌿 Wishing you strength, peace, and victory in every step of life! 🌿