आंबेडकरी युवा संघ-समाजहितासाठी कटिबद्ध

आंबेडकरी युवा संघ-समाजहितासाठी कटिबद्ध

Share

आंबेडकरी समाजहितासाठी कटिबद्ध

Photos from Dhammpala's post 12/04/2026
11/04/2026

प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते.

- महात्मा जोतीबा फुले 🙏❣️✊

11/04/2026

फुल्यांचा पुणे... बहुजन शिक्षणाची सुरावत ज्यांनी केली त्या महात्मा फुल्यांनी विनंम्र आदरांजली....





Subscribe to get exclusive benefits:
https://www.facebook.com/eccedentesiast.poet/subscribenow

08/04/2026
07/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूरला पहिली महत्त्वाची भेट २४ मार्च १९३७ रोजी स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी दिली होती, ज्यावेळी मंद्रूप (सोलापूर) येथील सभेला त्यांनी संबोधित केले. यापूर्वी मार्च १९३२ मध्ये त्यांनी सोलापूर स्टेशनवर भेट दिली होती, जिथे त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते,
पहिली ऐतिहासिक सभा (१९३७): १९३७ च्या निवडणुकीत मजूर पक्षाचे उमेदवार जिवाप्पा ऐदाळे यांच्या प्रचारासाठी बाबासाहेब सोलापुरात आले होते, जिथे मंद्रूपच्या भीमनगरमध्ये त्यांची सभा झाली होती.
पुढील भेटी: त्यानंतर १४ जानेवारी १९४६ रोजी व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात मंत्री असतानाही त्यांनी सोलापूरला भेट दिली होती.

ऋणानुबंध: सोलापूरच्या [बॅकवर्ड क्लास हॉस्टेलला] त्यांनी दोनदा भेट दिली होती, जे त्यांच्या प्रेरणेने १९३२ मध्ये सुरू झाले होते.
अस्थि कलश: सोलापुरात अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे त्यांचे पवित्र स्मृती चिन्ह आजही जतन केलेले आहे.


#जयभीम #बाबासाहेबजी

04/04/2026

*तुझ्या संसारतला संघर्ष माझ्या चळवळीचा पाया ठरतोय बघ रमा तुझ्या काटकसरीमुळे आज अवघा समाज माझा सुख सोयीने जगतोय...!!!*

*_ 🤍🌻_*

#बाबासाहेब #रमाई

01/04/2026

स्मशानात पुतळा बसवला म्हणून काय झालं ? बाबासाहेबांच्या पुतळ्याला कशाला हवेत नियम कायदे ? पुतळा हटवण्यासाठी इतकं ताणण्याची गरज काय ? असे अनेक प्रश्न अनेकजण विचारताहेत.

हे प्रश्न कोण विचारताहेत ज्यांना विषयाची खोली माहित नाही. उपोषण करण्याची कोणाला हौस नसते. शरीराचं नुकसान करून घेणं आहे ते. माझ्यासारख्या मधुमेहीसाठी जोखमीचंही ! पण सत्तेत तुमच्या विचारांच्या लढाईची कुचेष्टा करू पाहणारे मग्रुर, जातीयवादी लोक असले की 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है', म्हणत जगण्याचा मोह सोडून देऊन सत्तेशी दोन हात करणं भाग पडतं.
उल्हासनगरात स्मशानातून बाबासाहेबांचा पुतळा हटवण्याचा विषय आहे. बुलढाण्यात चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा विषय होता. तिथे ग्रामपंचायतीत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी (अप ) चे सरपंच आणि गावातील लोकांनी मिळून पुतळा हटवण्यासाठी ताकद लावली होती. तो पुतळा हटवू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या शिवसेना ( उबाठा ) च्या पदाधिकारी संजीवनी वाघ यांना जीवघेण्या मारहाणीला सामोरं जावं लागलं होतं.

आज त्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आंदोलकांनी बसवलाय. पण तो लोखंडी स्टँडवर आहे. संजीवनी वाघ आणि कार्यकर्ते चबुतऱ्याचं बांधकाम करू देण्यासाठी धडपडताहेत, पण पुतळा बेकायदेशीररित्या बसवल्याचं कारण देत सरकार प्रतिसाद देत नाहीये. तहसीलदारांचे पुतळा हटवण्याचे आदेश आहेत.
चिखला काकड गावातला पुतळा गावातील मोक्याच्या जागी खुल्या मैदानात आहे. पण तरीही पुतळा बसवणारे विरोधी पक्षातील असल्याने तिथे सरकारला पुतळा धोरण आठवतं.

उल्हासनगरातला बाबासाहेबांचा पुतळा स्मशानात आहे, पण इथे सत्तेतल्या लोकांचा खोडसाळपणा असल्याने बाबासाहेबांना पुतळा धोरण लागू नाही आणि या सरकारची बाबासाहेबांच्या विचारांचे अंत्यसंस्कार करू पाहणारी एकंदरीत विद्वेषी मानसिकता पाहता बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी योग्य जागा त्यांच्या दृष्टीने स्मशानातच आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांचं हातावर हात ठेवून बसणं सत्तेच्या दबावाशिवाय आहे काय ? राज्याच्या मुख्य सचिव, गृह सचिव, नगरविकास सचिवांना ईमेल केलेत. पण कारवाई शून्य !
स्पष्ट आहे की बाबासाहेबांच्या या हेतूपुरस्सर केलेल्या अवमानात सरकार आणि प्रशासनसुद्धा सामील आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीचं एक शिष्टमंडळ ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलं तर ते म्हणाले की मी स्वतः पुतळा मंजुरी समितीचा अध्यक्ष आहे आणि मलाच हे प्रकरण माहित नाही.

पोलिसांच्या 'ना हरकती' शिवाय पुतळा उभारता येत नाही, असा स्पष्ट शासन निर्णय आहे. पण पोलिस विभाग फक्त कागदी घोडे नाचवतोय.

या प्रकरणात सर्वाधिक बेजबाबदार भूमिका उल्हासनगर मनपा आयुक्त मनीषा आव्हाळे यांची आहे. एका दर्जाहीन, कर्तव्यचुकार आणि भ्रष्ट प्रशासनाच्या त्या प्रमुख आहेत. त्यांच्या डोळ्यांदेखत मनपाच्या मालकीच्या जागेत ( स्मशानात ) अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम करून पुतळा उभारला जात़ो, ज्याची कसलीही नोंद मनपात नसताना आयुक्त महोदया लोकभावनेचं आणि लोकवर्गणीचं कारण पुढे करून पुतळ्याचं अप्रत्यक्ष समर्थन करतात.

सप्टेंबर, २०२५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्हासनगर मनपाला पुतळ्याबाबत माहिती विचारणारं पत्र पाठवलं होतं, पण उत्तर आलं नाही, असं जिल्हाधिकारी कार्यालय सांगतंय.

मूळात, पुतळा बसवलाच गेलाय मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. स्मशानातल्या एका बांधकामावरचं बाबासाहेबांचं भित्तीचित्र काढल्याचा बहाणा करीत मतांच्या राजकारणासाठी शिंदे शिवसेनेच्या बेअकली पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांचा पुतळा स्मशानात उभारला आणि भविष्यातल्या 'रोजगार हमी'ची सोय करून घेतली, पण ती अंगलट आलीय.

विषय वाढल्यावर आता आयुक्तांच्या सहीचं जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं पुतळा स्थानांतरीत करण्याची परवानगी मागणारं २४ मार्चचं एक पत्र प्रसारित झालंय. कायद्याने वागा चं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं नसतं तर हे उघड झालंच नसतं की ते पत्र प्रत्यक्षात पाठवलंच गेलं नव्हतं. बिंग फुटल्यावर ३० मार्चला ते पत्र पाठवण्यात आलंय. एका आयएएस अधिकाऱ्याचं हे वर्तन आहे.

असलं प्रशासन काडीचाही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाहीये. उपोषण सुरू होण्याच्या शेवटच्या क्षणी फुटकळ पत्र पुढे करून उपोषण स्थगित करण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. पण बेमुदत उपोषण आज सकाळी उजाडल्यापासून सुरू झालंय. पुतळा स्मशानातून बाहेर पडल्यावरच ते थांबेल.

Post by Raj Asrondkar

31/03/2026

नेपाळ सरकारचा ऐतिहासिक निर्णय
दलित आणि वंचित समुदायांवर दशकानुदशके झालेल्या भेदभावाबद्दल
सार्वजनिक माफी,सामाजिक न्याय आणि समावेशकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

काठमांडू: सरकारने दलित तसेच ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या समुदायांवर भूतकाळात राज्य, समाज आणि धोरणात्मक रचनांद्वारे झालेल्या अन्याय व भेदभावाबद्दल औपचारिक माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ‘शासकीय सुधारणा संदर्भातील 100 सूत्रीय कार्यक्रम’ अंतर्गत जाहीर करण्यात आला आहे.

सरकारने जाहीर केलेल्या या कार्यसूचीतील पाचव्या मुद्द्यात नमूद करण्यात आले आहे की, दलित समाजाने दीर्घकाळ भोगलेल्या अन्याय, भेदभाव आणि संधींपासून वंचित राहण्याच्या परिस्थितीची राज्य औपचारिक दखल घेईल. सामाजिक न्याय, समावेशक पुनर्स्थापना आणि ऐतिहासिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी राज्याकडून विधिवत माफी मागण्याची सरकारची योजना आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, पुढील 15 दिवसांत राज्याच्या वतीने औपचारिक माफीसह एक विशेष ‘सुधारणा-केंद्रित कार्यक्रम’ जाहीर करण्याची सरकारने बांधिलकी व्यक्त केली आहे.

- jaaglya bharat

25/03/2026

"अवघे साडेपाच वर्षे वय असताना आईविना पोरका झालेला भिवा, पुढे जाऊन आपल्या ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या जोरावर जगातील सर्वांत मोठ्या जनसमुदायाची काळजी घेणारा खंबीर बाप अन् लेकरांसाठी उभं आयुष्य वाहणारी आई झाला."


#महामानव #डॉ #बाबासाहेब #आंबेडकर

22/03/2026

" २२ मार्च १९२० माणगाव येथील अस्पृश्यांची परिषद "
माणगाव यथे जी परिषद झाली त्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते व प्रमुख पाहुणे राजश्री शाहू महाराज होते,
सदर परिषद तीन गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण होती . एक गोष्ट हि कि, सदर परिषदेत अस्पृश्य समाजातील विशेषता महार लोकांना जी हजेरी लावली जात होती व त्या हजेरीच्या पोटी त्यांच्याकडून विनामुल्य काम करून घेतले जात होते, तसेच चोरी वगैरे नाहक आरोपाखाली त्यांच्यावर जुलूम केला जात होता, त्याचे वर्णन स्वतःच्या अनुभवातून खुद्द शाहू महाराजांनी केले व हि हजेरी रद्द करण्यात आल्याची पहिली घोषणा त्यांनी केली.

दुसरी वैशिष्यपूर्ण गोष्ट हि कि, त्यांनी महार आदी लोकांनी म्हारकीची ,गुलामगिरीची कामे सोडावीत , असा उपदेश केला व त्यांच्या वतनाचे रुपांतर रायताव्यात करावे असे जाहीर केले.

तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट हि कि, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिजात पुढारपणाची अशी घोषणा केली कि, " हेच तुमचे खरे पुढारी आहेत ; ते तुमचाच नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करतील अशा प्रकारचे त्यांच्या अंगी गुण आहेत . "
अशी पहिली घोषणा करणारे शाहू महाराज , भारतातील नव्हे तर जगातीलही या बाबतीतील एकमेव द्रष्टे पुरुष होत. आपल्या राजेशाही मुकुटाची फिकीर न बाळगता , अस्सल पुढारीपपणाचा मुकुट स्वहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोईवर ठेवून मोठ्या आत्मीयतेने जाहीररीत्या त्यांना तो अर्पण केला होता.
शाहू महाराज म्हणाले पुढारपणाच्या कसोटयांबद्दल व्यवहारीपणाच्या व अनुभवांच्या कसोटीतून माणगावच्या परिषदेत त्यांनी सवाल केला ." पक्ष्यांमध्ये चतुष्पादाचा पुढारी कधी झाला आहे काय ? आणि चतुष्पादांचा पुढारी कधी एखादा पक्षी बनला आहे
काय ?" पुढारीपणाची पुढे छाननी करतांना , माणगावच्या परिषदेत ते सांगतात :
" आमच्यापैकी काही आप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात . आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेला पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. जे क्षत्रियांनासुद्ध शुद्र मानून त्यांना विष्ठेपेक्षाही अस्पृश्य मानतात व स्पर्श झाला म्हणजे जे स्वतःची शुद्धी करून घेतात असे पुढारी काय कामाचे ?"

शाहू महाराजांनी दिलदारपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे केलेले वर्णन , भीमरावने ,
प्रदीर्घ विद्याभ्यासाने , शिलसंवर्धनाने , कळकळीने, जनहितासाठी निर्भयपणे लढून यथार्थ करून दाखविले .

! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

.......सविता राजेंद्र बाविस्कर ........

21/03/2026

नकारात्मक विचार तुम्हाला कधीच चांगलं आयुष्य देणार नाहीत त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारच करा..

बुध्दवाणी 🌷

मंगलमय सकाळ☘️

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Pune
411030