Pune Zilla Parishad

Pune Zilla Parishad

Share

Pune Zilla Parishad

03/06/2026

पुणे जिल्ह्याच्या विकासात तरुणांचे थेट योगदान!

"पुणे जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम २०२७" आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रशासनासोबत काम करण्याची, आपल्या कल्पनांना आणि नेतृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्याची सुवर्णसंधी.

जिल्हा परिषद पुणे फेलोशिप कार्यक्रमात सहभागी व्हा, प्रशासनात प्रत्यक्ष सहभागी व्हा !

03/06/2026

#आंतरराष्ट्रीय_सायकल_दिन

दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणारे, प्रवासातील प्रत्येक वळणावर साथ देणारे हक्काचे माध्यम म्हणजे "सायकल" !

म्हणूनच पुणे जिल्हा परिषदेकडून "सायकल बँक" ही अनोखी योजना राबवण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला शाश्वत दिशा मिळत आहे !

02/06/2026

बदल घडवण्यासाठी, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा !

"पुणे जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम २०२७" आपल्यासाठी घेऊन येत आहे प्रशासनासोबत काम करण्याची, आपल्या कल्पनांना आणि नेतृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्याची सुवर्णसंधी.

जिल्हा परिषद पुणे फेलोशिप कार्यक्रमात सहभागी व्हा, प्रशासनात प्रत्यक्ष सहभागी व्हा !

01/06/2026

पुणे जिल्हा परिषद फेलोशीप योजना : तरूणाईसाठी सुवर्णसंधी !

पुणे जिल्हा परिषद फेलोशिप योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. यासोबतच प्रशासकीय प्रक्रियांची जाण व या प्रक्रियेच्या अंमलबजावणीतील बारकाव्यांचेही ज्ञान मिळणार आहे.

जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती !

31/05/2026

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती..!

जगाच्या पाठीवर अनेक बलाढ्य शासक होऊन गेले, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. म्हणूनच कल्याणकारी, लोकाभिमुख प्रशासनाचा अभ्यास करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा अभ्यास करणं आजही कालसुसंगत ठरतं.

एकविसाव्या शतकातील भारताचे धोरण व प्रशासन हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अठराव्या शतकात राबवलेल्या धोरणांना आदर्श मानते यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची व महानतेची प्रचिती येते. पुणे जिल्हा परिषद प्रशासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख धोरणाला आदर्श मानून वाटचाल करत आहे.

जनहितासाठी जीवन समर्पित करणाऱ्या कल्याणकारी शासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

27/05/2026

तरुणाईला प्रशासनात काम करण्याची सुवर्णसंधी !

"जिल्हा परिषद पुणे फेलोशिप कार्यक्रम २०२७" अंतर्गत सर्व तरुण - तरुणींना पुणे जिल्हा प्रशासनात काम करण्याची, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण विकास अशा क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे !

26/05/2026

पुणे जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणाईला संधी !

"जिल्हा परिषद पुणे फेलोशीप कार्यक्रम २०२७" या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व्यवस्थेत ग्रामीण विकास, डिजिटल उपक्रम, शिक्षण, आरोग्य, सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांमध्ये आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी तरुणाईला मिळणार आहे. जास्तीत जास्त युवकांनी, युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

Photos from Pune Zilla Parishad's post 22/05/2026

📍 कान्हूर मेसाई (ता. शिरूर)

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हूर मेसाई येथे भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी असलेल्या स्वच्छतेच्या सुविधा व इतर पायाभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

आपल्या शाळेतून सर्वोत्तम विद्यार्थी घडावेत यासाठी संबंधित अधिकारी व शिक्षकांना श्री. गजानन पाटील यांनी आवश्यक सूचना दिल्या.

Photos from Pune Zilla Parishad's post 22/05/2026

📍 कासारी (ता. शिरूर)

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कासारी येथे भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी असलेल्या स्वच्छतेच्या सुविधा व इतर पायाभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

आपल्या शाळेतून सर्वोत्तम विद्यार्थी घडावेत यासाठी संबंधित अधिकारी व शिक्षकांना श्री. गजानन पाटील यांनी आवश्यक सूचना दिल्या.

Photos from Pune Zilla Parishad's post 22/05/2026

📍 शिक्रापूर (ता. शिरूर)

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी आज शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेला औषध व लसींचा साठा, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा व परिसराची स्वच्छता ई. बाबींचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. श्री. गजानन पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांसोबतही संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Pune
411001

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm