26/04/2026
स्नेहवनात चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ लेकरांची आज स्कॉलरशिपची परीक्षा आहे.
आमची लेकरं म्हणजे तुफान आतील दिवे आहेत. अठराविश्व दारिद्र्याच्या अंधाऱ्या रात्रीत स्वयंप्रकाशित तारे आहेत.
प्रत्येक लेकराची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. पण आज ते जिद्दीने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत.
तुम्हा सर्वांचे आशीर्वाद राहू द्या. राम कृष्ण हरी. 🙏🏻🌿☺️
08/03/2026
जागतिक महिला दिनाच्या सर्व आदरणीय माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत 🙏🌿🙌
Ashok Deshmane
07/03/2026
स्नेहवनच्या प्रवासावर त्यांनी लिहिलेला लेख. जरूर वाचा.❤️❤️
सर्व आदरणीय माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🌿🙌
आदरणीय ॲड. शैलाजाताई मोळक यांचे मनःपूर्वक आभार. Ashok Deshmane
12/02/2026
स्नेहवनच्या मैत्रिणी आणि वडापावचा आनंद🥰
जपानची 19 वर्षाची तरुणी स्नेहवनचे काम पाहून प्रेरित होते आणि तिला वाटतं, आपण भारतात जाऊन सेवा द्यावी आणि ती स्वतःच्या खर्चाने दीड-दोन महिन्यासाठी स्नेहवन संस्थेमध्ये volunteering करायला येते...
तिला भारताबद्दल काहीही माहित नाही परंतु खूप आदर आहे. तिच आणि तिच्या आई-वडिलांचे किती कौतुक आहे.
इकडे आपण तीस वर्षे झाल्यानंतर सुद्धा मायबाप लेकरांना बाजूला ठेवत नाहीत. एकटे सोडत नाहीत, स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी वेगळे प्रयत्न करत नाहीत.
आज ती मुलांना इंग्रजी जापनीज या भाषा शिकवते सोबत फुटबॉल ही शिकवते.
आपण सर्वांनी ही जिथे शक्य आहे तिथे सेवा करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. आर्थिक मदत नाही परंतु आठवड्यातील दोन तास दिल्यामुळे एखाद्या गरिबाच्या मुलाला शिक्षण मिळेल.
जपान वरून आलेल्या मिनोरीची दखल आज दै. सकाळ मध्ये पत्रकार विलास काटे सरांनी घेतली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. राम कृष्ण हरी🙏☺️🌿🙌
22/01/2026
ुरु_झाले #8796400484
माझा 8796400484 हा व्हाट्सअप नंबर काही महिन्यापूर्वी अचानक बंद पडला होता. आता तो व्हाट्सअप ने परत सुरु केला आहे.
त्याच झालं असं की पूरग्रस्तांसाठी मदत कार्य चालू केल्यानंतर माझा तो नंबर पूरग्रस्त भागांमध्ये खूप व्हायरल झाला. आणि त्यावरती दोन-चार दिवसातच 200-300 लोकांनी मेसेज केले होते. आमच्याकडूनही त्यांना रिप्लाय केला गेला.
त्यामुळे व्हाट्सअप च्या सिस्टीमने तो ऑटोमॅटिकली नंबर ब्लॉक केला. पर्सनल व्हाट्सअप वर एका दिवसात एवढे मेसेज चालत नाहीत असा आम्हाला अनुभव आला.
त्यासाठी सर्वांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्यासाठी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे.
1- पर्सनल व्हाट्सअपला खूप मर्यादा आहेत. एका दिवसात जास्त लोकांना रिप्लाय करू नये.
2- खूप जास्त Unknown ग्रुपला नंबर ॲड करू देऊ नये.
3- तुमचा व्हाट्सअपचा जास्त वापर असेल तर व्हाट्सअप बिजनेस घ्याव. त्यावर ती जास्त सुविधा आहेत.
4- तुम्ही पर्सनल व्हाट्सअप वरून जास्त ब्रॉडकास्ट मेसेज करू नये त्यासाठी बिझनेस व्हाट्सअप घेणे गरजेचे आहे.
4- व्हाट्सअप ही कंपनी आहे, त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांनी आता फ्री ब्रोडकास्ट बंद केल आहे. आता तुम्हाला बिझनेस व्हाट्सअप वरून ब्रॉडकास्ट मेसेज करायला पैसे लागतील.
5- व्हाट्सअप ने कधी 24 तासासाठी तुमचं अकाउंट बंद केलं तर समजून घ्यावं की त्यांचे नियम मोडले जात आहेत.
6- कधीही दोन व्हाट्सअप नंबर चालू ठेवणे जेणेकरून संपर्कातील लोकांची अडचण होणार नाही.
7- व्हाट्सअप कायमचा ब्लॉक जरी झालं तरी दोन महिन्यानंतर त्यांची सिस्टीम ऑटोमॅटिकली जुन account डिलीट करते.
8- त्यानंतर तुम्ही तुमचा जुना नंबर वापरून परत नवीन अकाउंट खोलू शकता.
माझा 8796400484 हा नंबर आता चालू झाला आहे याची कृपया नोंद घ्यावी.
आता माझे #व्हाट्सअप #8237277615 आणि #8796400484 या नंबर वरती संपर्कात राहू. राम कृष्ण हरी.
Photo - लेकरांसोबत संक्रांती 🥰🙏
20/12/2025
काल स्नेहवनच्या बालगोपालांना घेऊन पुणे पुस्तक महोत्सवास भेट दिली. अप्रतिम अनुभव होता.
मुलांनी सर्व नोंदी करत अनेक मान्यवरांशी संवाद साधला. पुस्तकांच्या दुनियेत जणूकाय सर्वजण हरवून गेली होती.
स्नेहवन मध्ये सध्या 15000 च्या वर पुस्तकांचे ग्रंथालय आहे. वाचन संस्कृती जपण्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. आणि मुलांना वाचनाची खूप गोडी आहे.
स्नेहवनच्या मुलांचा निर्भीडपणा, स्पष्टवक्तेपणा यामागचं खरं कारण म्हणजे वाचनच आहे.
वन मूवी वन बुक असेल, रिंगण असेल.. या माध्यमातून मुलांचं वैचारिक देवाण-घेवाण होते आणि मंथनही होत असते. 🙏🍁
Ashok Deshmane
Snehwan- A Ray of Hope