Nationalist Congress Party, Pune City

Nationalist Congress Party, Pune City

Share

This is the official page of Nationalist Congress Party, Pune City.

14/05/2025

स्वराज्यरक्षक, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त कोटी-कोटी प्रणाम!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या त्याग, समर्पण, संघर्ष, निष्ठा या मूल्यांच्या जोपासणीसाठी सर्वस्व त्यागणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्तीच नसून तर एक विचार आहेत, याचा वस्तुपाठ घालून देणारे वंदनीय छत्रपती संभाजी महाराज हे अनेक पिढ्यांचे आदर्श राहतील.

#छत्रपती_संभाजी_महाराज

#जयंती #अभिवादन

12/05/2025

ज्यांनी जगाला शांती आणि प्रेम शिकवले अशा भगवान बुद्ध यांना नमन!

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

#गौतमबुद्ध #बुद्धपौर्णिमा #पौर्णिमा

09/05/2025

थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

'कमवा आणि शिका'चा मंत्र देत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षणाचा प्रकाश दिला. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास, त्याग आणि दूरदृष्टी आजही काळाच्या पुढे घेऊन जाणारी आहे. त्यांचे विचार, मूल्ये आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत.

#कर्मवीर_भाऊराव_पाटील #कर्मवीर #शिक्षण िक्षण_संस्था #कमवा_आणि_शिका

08/05/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा.श्री. सुनीलअण्णा टिंगरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!

#पुणे #वडगावशेरी #वाढदिवस

Sunil Tingre

06/05/2025

लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अनेक प्रणाम!

समाजातील वंचित, शोषित घटकांना शिक्षण, सन्मान आणि हक्क मिळावा, यासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज ! जातीभेदाच्या भिंती पाडून त्यांनी समतेचा मार्ग दाखवला ! सामाजिक सुधारणांचा पाया रचला !

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराला मानाचा मुजरा!

#छत्रपती #राजर्षी #शाहू #महाराज #पुण्यस्मरण #अभिवादन

04/05/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मा.श्री. दीपकभाऊ मानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

राजकीय दूरदृष्टी, जिद्द, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि नेतृत्व गुणांमुळे मा. दीपकभाऊंनी पुणे शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आपल्या समाजाप्रती केलेल्या कार्यांमुळे पुणे शहरातील अनेकांना प्रेरणा मिळते.

आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, भरभराट, यश आणि दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

#वाढदिवस #राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी #पुणे

Deepak Mankar

14/04/2025

महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंनितीनिमित्त अनेक प्रणाम!

वंचित, शोषित आणि पीडितांना जगण्याचा नव्याने आत्मविश्वास देणारे थोर समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युगप्रवर्तक ठरतात. सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहित आणि जातीयवादाविरुद्धचा लढा धारदार करून मानवतेचा व्यापक अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केला.

DrAmbedkarJayanti #भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #जयंती #आंबेडकर_जयंती

12/04/2025

॥ जय वीर हनुमान ॥

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मारुतीरायाच्या चरणी प्रणाम व सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगलमय शुभेच्छा !

#हनुमान_जन्मोत्सव #हनुमान_जयंती

11/04/2025

अज्ञानाच्या गर्तेत अडकलेल्या माता-भगिनींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश आणणारे, शेतकऱ्यांच्या व्यथा ठामपणे मांडून अन्यायग्रस्त व्यवस्थेला जळजळीत शब्दांनी चपराक देणारे, थोर समाजसुधारक आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त वंदन!
समाजपरिवर्तनासाठी त्यांनी उभारलेला लढा आजही आपल्या सर्वांच्या विचारांना योग्य दिशा आणि प्रेरणा देतो.

#क्रांतिसूर्य #महात्मा #जोतिराव #फुले #जयंती #अभिवादन

10/04/2025

NCP Pune

प्रेम, शांती, करुणा आणि अहिंसेचा अमर संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जीवनमार्ग म्हणजे मानवतेचा सर्वोच्च आदर्श आहे. भगवान महावीर स्वामी यांना जन्मकल्याणक दिनानिमित्त त्रिवार वंदन!

आपण सर्वांनी सत्य, अहिंसा व संयम या मूल्यांची आठवण ठेवत जीवन समृद्ध करण्याचा संकल्प करूया. भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती महापर्वाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#महावीरजयंती

03/04/2025

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा!

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारले. उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणारे, प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजोमय कर्तृत्वास विनम्र अभिवादन!

#छत्रपतीशिवाजीमहाराज #पुण्यतिथी #अभिवादन

30/03/2025

जल्लोष नववर्षाचा, हिंदू संस्कृतीचा!

आपल्या सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुढीपाडवा #मराठीनववर्ष #मराठीनववर्ष2025

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune