29/05/2026
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील १३ विद्यापीठांचे अधिकारी एकत्र आले आणि एक महत्त्वाचा संकल्प केला...
"आरक्षण फक्त कागदावर नाही, ते प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचलेच पाहिजे!"
सहभागींच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा
🎥 https://www.youtube.com/watch?v=8NUTpOOvX9k
हा व्हिडिओ एकदा नक्की शेअर करा! 🔁
#आरक्ष #महाराष्ट्र #उच्चशिक्षण #महाराष्ट्र
#उच्चशिक्षण #आरक्षण_धोरण
27/05/2026
The future of India won’t be built by degrees alone — but by evolved educators. ✨.
Week 3 of the 28-Days EduRise Faculty Induction Programme at MSFDA, Pune is shaping exactly that — faculty who don’t just deliver lectures, but design meaningful learning experiences rooted in NEP 2020.
This week’s evolution included:
📌 Reflective Teaching & Student Counselling
📌 ICT, AI & SWAYAM in Education
📌 Research Methodology & Data Analysis
📌 Case-Based & Inclusive Learning
📌 Lesson Planning & Capstone Orientation
🏔️ Sinhagad Trek — because evolved professors learn everywhere
An evolved professor is reflective. Research-driven. Learner-centred. Tech-fluent. Inclusive by design.
MSFDA builds them. 28 days at a time.
Rise to Teach. Teach to Rise. 🚀.
l #महाराष्ट्र
Chandrakant Patil CMOMaharashtra Maharashtra DGIPR
IS THE ROLE OF THE PROFESSOR CHANGING?
25/05/2026
महाराष्ट्र राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण रिक्त असलेल्या पदांपैकी तब्बल ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीस शासन मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरणे अत्यावश्यक होते, त्याच दिशेने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पदभरतीमध्ये आरक्षण धोरण अचूकपणे राबविता यावे यासाठी मा. मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार दि. २५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे येथे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील उपकुलसचिव व सहाय्यक कुलसचिव (मागास वर्ग कक्ष) यांच्यासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभले होते. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कार्यकारी संचालक, MSFDA पुणे तथा संचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. देवळाणकर यांनी आवर्जून नमूद केले की, आरक्षण धोरण अचूकपणे राबविले तरच समाजातील सर्व घटकांना उच्च शिक्षणात न्याय मिळेल आणि NEP 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासन बळकट असणे आवश्यक आहे.
डॉ. प्रकाश बच्छाव (विभागीय सहसंचालक, कोल्हापूर), श्री. संदीप पाटील (सहाय्यक महसूल अधिकारी, मागास वर्ग कक्ष, नाशिक), श्री. इक्बाल दरवाजकर (सहाय्यक महसूल अधिकारी, मागास वर्ग कक्ष, पुणे), डॉ. दिलीप भरड (माजी कुलसचिव, य.च.म.मु. विद्यापीठ, नाशिक), डॉ. अर्चना बोऱ्हाडे (सहसंचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे) व डॉ. सुयश दुसाने (प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे) या तज्ञ साधन व्यक्तींनी बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी, सामाजिक आरक्षणासोबत महिला व दिव्यांग यांचे समांतर आरक्षण अचूकपणे कसे राबवावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि सहभागी अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
हा ऐतिहासिक उपक्रम मा. मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या दूरदृष्टी व प्रेरणादायी मार्गदर्शनातून साकार झाला आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम NEP 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व मौलिक असे ठरणार आहे असे समारोप प्रसंगी डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.
📍 दि. २५ मे २०२६ | महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे
Maharashtra DGIPR Chandrakant Patil CMOMaharashtra Shailendra K Deolankar
#महाराष्ट्र
#उच्चशिक्षण
#आरक्षण_धोरण
#ऐतिहासिक_प्रशिक्षण
#पदभरती
25/05/2026
Day 1 | FDP on Research Writing and Scholarly Publishing with AI
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने आयोजित या अनोख्या २ दिवसीय Faculty Development Programme चा आज उत्साहपूर्ण प्रारंभ झाला!
MSFDA चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सहभागींशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या मार्गदर्शनपर विचारांनी संपूर्ण सत्राला एक नवी ऊर्जा मिळाली.
✅ Dr. Sanjay Dhole यांनी संशोधनावर अनुभवसंपन्न चर्चा घडवून आणली.
AI च्या युगात संशोधन लेखन अधिक प्रभावी व्हावे यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 💡
Maharashtra DGIPR
23/05/2026
🚨 प्रत्येक शिक्षकाने हे बघायलाच हवे! 🚨
“NEP 2020 is not just a policy — it is a paradigm shift.”
— श्री. अनिल राव
शिक्षणाची व्याख्या बदलतेय. अध्यापनाची पद्धत बदलतेय.
आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत — आपले प्राध्यापक! 🙌
MSFDA कसे राज्यभर हे परिवर्तन घडवतेय?
श्री. अनिल राव सर यांच्या या सखोल मुलाखतीत जाणून घ्या.
▶️ Watch Now: https://youtube.com/watch?v=ZXq-5L76UXA&feature=shared
🌐 www.msfda.ac.in
22/05/2026
🚨 प्रत्येक शिक्षकाने हे बघायलाच हवे! 🚨
NEP 2020 आता फक्त कागदावर नाही — ती जमिनीवर उतरतेय!
श्री. अनिल राव सर यांनी या व्हिडिओत सांगितले आहे:
-> MSFDA कसे काम करते?
-> प्राध्यापक या बदलात कसे सहभागी होऊ शकतात?
👉 आत्ताच बघा, शेअर करा आणि तुमच्या सहकाऱ्यांनाही पाठवा!
🔗https://www.youtube.com/watch?v=ZXq-5L76UXA
#महाराष्ट्र #शिक्षणक्रांती #उच्चशिक्षण
#
महाराष्ट्रात NEP 2020 ची अंमलबजावणी आणि MSFDA ची भूमिका | श्री. अनिल राव सर
🎙️ महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचे भविष्य घडवणारी एक महत्त्वपूर्ण चर...
21/05/2026
EDURISE Faculty Induction Program 2026 | Day 14 /28
आजचा दिवस होता विचारांना चालना देणारा!
डॉ. सी. एम. चितळे यांनी आज "Problem-Based & Case-Based Learning"
या विषयावर एक अत्यंत प्रेरणादायी सत्र घेतले!
खरे प्रश्न. खऱ्या परिस्थिती. खरे शिकणे.
आमच्या प्राध्यापकांनी अनुभवले की —
✅ वर्गखोली कशी जिवंत करायची
✅ विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार कसा रुजवायचा
✅ समस्या सोडवण्याची क्षमता कशी विकसित करायची
✅ सहभागाने शिकणे कसे घडवायचे
कारण सर्वात उत्तम धडा तो असतो —जो फक्त शिकवला जात नाही, तो अनुभवला जातो! 💡
#प्राध्यापक_विकास #समस्याआधारितशिक्षण #शिक्षणक्रांती
Maharashtra DGIPR
20/05/2026
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
याच राष्ट्रीय भावनेला प्रतिसाद देत आणि 'डिजिटल इंडिया'च्या संकल्पाशी बांधिलकी ठेवत, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर (.shailendradeolankar) यांनी आज ऑनलाईन प्रणालीद्वारे विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न केली.
PMO India Devendra Fadnavis CMOMaharashtra Shailendra K Deolankar
20/05/2026
🌿 ग्रीन कॅम्पस FDP — Day 3 | MSFDA, पुणे
"हरित विचार, हरित कृती — आज आणखी एक प्रेरणादायी दिवस!" 🌱
आज आमच्या 5-दिवसीय Green Campus Faculty Development Programme च्या तिसऱ्या दिवशी उत्साह आणखीनच वाढला!
Day 3 चा focus होता — Sustainable Practices in Education & Campus Management. आजच्या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी faculty members सोबत सखोल चर्चा केली आणि प्रत्यक्ष उपक्रमांद्वारे sustainability च्या नवीन दिशा दाखवल्या.
📸 आजच्या Green Campus Walk चे काही सुंदर क्षण — प्रत्येक पाऊल एक नवीन शिकवण!
18/05/2026
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) तर्फे "संवाद" — मुंबई व पनवेल विभागासाठी ऑनलाइन अभिमुखता कार्यक्रम — १४ मे २०२६ रोजी Webex द्वारे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे:
✅ मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांतील २३२+ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकांची नोंदणी
✅ सोफिया, रुईया, विल्सन, मिठीबाई, मुलुंड, चेतना, पिल्लई, व्हीपीएम यासह १५०+ महाविद्यालयांचा सहभाग
✅ पीएम-उषा अंतर्गत प्राध्यापक विकास उपक्रमांशी सुसंगतता साधण्यावर भर
"संवाद" म्हणजे केवळ एक बैठक नाही — हा महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयीन शिक्षकापर्यंत पोहोचण्याचा, त्यांना सक्षम बनविण्याचा आणि उच्च शिक्षणाचे नवे भविष्य घडविण्याचा संकल्प आहे. 🇮🇳
#संवाद #प्राध्यापकविकास #उच्चशिक्षण #मुंबई #शिक्षण