My Today's good read

My Today's good read

Share

Hi dear friends,
I wish to start this page for all of them who really enjoy good reading on Facebook.

22/11/2022

ओढ्यावर येणाऱ्या बाया.....

जुन्या, मळकटल्या, विरलेल्या
वाकळांचे, कापडांचे, साड्यांचे, चादरींचे
ढीग डोईवर घेऊन
पऱ्ह्यावर पाण्याच्या शोधात येणाऱ्या....

एकमेकींच्या केसात माळलेल्या
फुलांचा वास घेत,
हातातली वजनं सावरत,
पोरांना उगाचच दामटवत जाणाऱ्या...

जथ्यात एखाद्या नव्या आलेल्या बाईकडे
शेकडो कुतूहलाने बघणाऱ्या,
पोरांची भांडणं आहे त्या जागेवरून
ओरडून सोडवणाऱ्या,
कपडे बडदताना नवर्‍याच्या, नणंदेच्या
वागण्यावर धुमसणाऱ्या,
सासूच्या हकीकती सांगत पेटणार्‍या...
आणि विचारानेच विझणाऱ्या

नियंत्याने दिलेल्या हाडांच्या राशीला कवटाळून
क्वचित एकमेकींशी भांडणार्‍या...
हसणार्‍या, खिदळणाऱ्या,
आठवणींची गाणी गाणारे,
पाखरांचे डोळे असलेल्या...

पाण्यातून बाहेर आल्या की...
कातळावर पडलेल्या कापडांसोबत
सुकत जातात...
शोधक नजरा आसपासच्या रानात जळण
धुंडाळत राहतात...

मग अचानक सुन्न होतात
गढूळ पाण्याच्या तळाशी नजर लावून
शोधत राहतात
सुखाची अज्ञात माहेरं....

योगिता जाधव
21.11.2022

12/11/2022

.
सॉफीस्टिकेटेड भावनांचं
इमोशनल बॅलड लिहायला घ्यावं
नी लाईफच्या ब्लॅक ह्युमरनं
साली नेमकी तेव्हाच
जगण्याची लाम्हण लावावी

आपण सांगायला जावं काही
लयबद्ध बॅलेसारखं
आणि
जगण्यानं थयथय नाचणारे
प्रक्षोभ होऊन हर्ट करावं

बिटन कॉफीच्या उग्र वासासारखे
अनबॅलन्सड् प्रेडिक्शन्स
उफाळून येत राहावेत
हृदयाच्या कानाकोपऱ्यात

त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर
काही कथेच्या ओळी
येता जाता वाजाव्यात डोक्यावर
विंडचाईम सारख्या
किंवा काही क्लिंगिंग कविता
अर्धवट भेटाव्यात..

नॉइजी काळ्याभोर डोळ्यांनी
त्या एक्सप्रेस करायला जावं
तर आपल्याला
लिहिताही येऊ नये एवढ्या
असाव्यात त्या व्हेग

अश्या घुम्म कवितांमध्ये
सापडावी स्वप्नातल्या
अननोन रस्त्यांची नक्काशी
जी फक्त दिसायलाच
असावी बेहद नितळ

एवढं सगळं अनवॉन्टेड
अनइंटेशनली निथळून यावं
मनाच्या पृष्ठभागावर
नको असतानाही
बाष्कळपणे

तेव्हा
ब्रेनच्या प्रत्येक सेलला
ते डिकोड करायला सांगून
आपण स्वतः मात्र
तोंडावरून पांघरूण घेऊन
झोपून राहावं एखाद्या
डिप्रेसड् माणसासारखं..

---चैताली आहेर.

(Oldie)

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune
411023