*Dear Friends ,*
*NMV 1992 BATCH IN ASSOCIATION WITH DINANATH MANGESHKAR HOSPITAL BLOOD CENTRE* has organized a Blood Donation Camp.
*ON: SATURDAY , 26th JUNE, 2021.*
*TIME: 9:00 am - 1:00 pm*
*VENUE : N. M.V. HIGH SCHOOL, BAJIRAO ROAD- B.C. KESKAR HALL*
*AGE GROUP: 18 YRS- 65 YRS*
You are requested to kindly be a part of this campaign and encourage *All Family members, relatives and friends to donate blood*
In the event of the Pandemic there is a growing demand for Blood and *N M V 1992 BATCH* has taken the initiative to come forward and reach out through this endeavour. *You can donate your blood after completion of 14 days of your vaccination and you can take vaccine any time after blood donation* (however it is advisable to take vaccine after 1 or 2 days of your blood donation, but in case of emergency you can immediately take vaccine after blood donation.)
Thank you for your contribution and cooperation in this event.
Looking forward for good response.
With Regards,
*N M V 1992 BATCH*
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
आम्ही नूमवीय २००३
स्वस्मै स्वल्पं समाजाय सर्वस्वं।
छा?
14/06/2021
*आम्ही नूमवीय २००३*
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जरी ओसरला
असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे या भावनेतूनच आम्ही नूमवीय २००३ सामाजिक संस्थेचं काम आम्ही असंच अविरत सुरू ठेवलं आहे. मागील आठवड्यात संस्थेचे ग्रामीण भागातील काम पाहून बारामती तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींनी आम्हाला संपर्क साधला आणि मदतीची विचारणा केली, तेथील संबंधित व्यक्तींशी चर्चा करून आम्ही काल दिनांक १३ जुन २०२१ रोजी त्या त्या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष जाऊन अपेक्षित मदत त्यांना सुपूर्त केली.
*ग्रामपंचायतींचे नाव आणि मदतीचे स्वरूप*
१- करंजे ग्रामपंचायत, सोमेश्वर नगर, ता- बारामती
मदत- ३ आयआर गन्स, ३ ऑक्सिमिटर, १५ पीपीई किट्स आणि १०० एन ९५ मास्क
२- सोरटेवाडी ग्रामपंचायत, आठफाटा, ता- बारामती
मदत- ३ आयआर गन्स, ३ ऑक्सिमिटर, १५ पीपीई किट्स आणि १०० एन ९५ मास्क
३- होळ ग्रामपंचायत, ता- बारामती
मदत- ३ आयआर गन्स, ३ ऑक्सिमिटर, १५ पीपीई किट्स आणि १०० एन ९५ मास्क
येणाऱ्या पुढील काळात संस्था, आपल्या मदतीचे स्वरूप अधिक व्यापक बनवेल आणि ग्रामीण भागात आपला मदतीचा हात असाच पोहोचवत राहील ही ग्वाही याप्रसंगी आम्ही देतो.
धन्यवाद
आम्ही नूमवीय २००३
अधिक माहितीसाठी वरील सामाजिक कार्याच्या *न्युज लिंक्स इथे शेअर करत आहोत.
http://www.livepunebaramati.com/2021/06/blog-post_77.html
http://www.livepunebaramati.com/2021/06/blog-post_98.html
http://www.livepunebaramati.com/2021/06/blog-post_31.html
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
12/06/2021
आम्ही नूमवीय २००३ तर्फे पौड ग्रामपंचायत ता.मुळशी येथील कातकरी बांधव, अंगणवाडी सेवक यांचे करिता दिलेले मास्क आज रोजी त्यांना मिळाले..धन्यवाद...
आम्ही नूमविय ( amhi numaviy )
हाती घ्याल ते तडीस न्या.
05/06/2021
कामाची पोचपावती
कामाचं कौतुक केलं की अजून ताकद मिळते, उत्साह वाढतो...
आपले खुप खुप आभार .
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
05/06/2021
प्रतिभा आरोग्य मंदिर, कोविड सेंटर, यशोदा गार्डन मंगल कार्यालय, कोरेगाव मु, उरुळी कांचन.
या सेंटरला सध्या२३ कोविड चे रुग्ण आहेत तसेच येथे काम करणारे डॉक्टर आणि इतर स्टाफ हा जवळपास १५ आहे.. मागील महिन्यात जवळपास ९० पेशन्ट्सना या सेंटरनी सेवा दिली आहे.
या केंद्राला *आम्ही नूमवीय २००३* संस्थेकडून मदत देण्याचे ३१ मे रोजी नक्की करण्यात आले..
त्यांच्यासाठी एकूण २० पीपीई किट्स, ५ ऑक्सिमिटर, ५ थर्मल गन्स आणि १०० एन ९५ मास्क अशी मदत देण्याचे ठरले आणि काल दिनांक ०४-०६-२०२१ रोजी उरुळी कांचन येथे जाऊन हे सर्व साहित्य संबंधित व्यक्तींकडे सुपूर्त करण्यात आले..
हे सर्व कार्य घडवून आणण्यात सोरतापवाडी, उरुळी कांचन येथे वास्तव्यास असणारे उद्योजक श्री युवराज संभाजी चौधरी यांचं सहकार्य आम्हाला लाभले त्याबद्दल त्यांचे आभार, तसेच हे सर्व साहित्य वेळेत जमा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या
आम्ही नूमवीय २००३ चे सदस्य श्री कुशल शहा यांचेही आभार..
धन्यवाद
*आम्ही नूमवीय २००३*
पुणे
02/06/2021
31/05/2021
मागील पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे मुळशी तालुक्यातील पौड गाव येथील अंगणवाडी सेवक व सेविका आणि कातकरी बांधवांसाठी, श्री राहुल तलाठी यांच्याकडून केल्या गेलेल्या मागणीनुसार, नुमविय २००३ सामाजिक तर्फे आपण त्यांना एकूण ५०० मास्क, २ इन्फ्रारेड थर्मल गन्स आणि २ ऑक्सिमिटर अशी मदत पुरवली..आज त्या वस्तूंचे हस्तांतरण तेथील ग्रामपंचायतीकडे करण्यात आले..
आम्ही नूमवीय सामाजिक २००३ चं काम हे आम्ही वेळोवेळी लोकांसमोर मांडत आलो आहे आणि एकमेकांच्या संपर्कातुन खेड्यापाड्यात पोहोचण्याची आणि तेथील ग्रामस्थांना मदतीचा हात देण्याची संधी आम्हाला मिळत राहिली आहे आणि यातूनच श्री राहुल तलाठी यांनी आम्हाला संपर्क करून या गरजेच्या वस्तूंची मागणी केली आणि तिथे आम्ही वेळेत मदत करू शकलो..!!
या कोविडच्या काळात संस्थेचं काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच निरंतर चालू राहील याची ग्वाही आम्ही आपणास या निमित्ताने देऊ इच्छितो..
धन्यवाद
आम्ही नूमवीय २००३
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
26/05/2021
पौड गावातील गरीब लोकांसाठी कातकरी लोकांसाठी अंगणवाडी सेवक सेविका ग्रामपंचायत शिपाई त्यांच्यासाठी 500 मास्क ची आवश्यकता आहे. ह्यांच्या साठी आपण ही मदत करत आहोत.
1. मास्क 500
2. थर्मल गन 2
3. ऑक्साइमिटर 2
मागणी करण्यात आलेल्या सर्व वस्तू आज देण्यात येणार आहेत.
25/05/2021
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
24/05/2021
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
411030
