पै सुरज भाऊ लांडे पा.स्पोर्ट्स क्लब

पै सुरज भाऊ लांडे पा.स्पोर्ट्स क्लब

Share

Official Page Of Suraj Nandkumar lande
Instagram Account https://www.instagram.com/suraj_bhau_lande_sports_club?igsh=MWtobjQ5ODZ3YmZibw==

08/07/2026

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥

"ज्ञानोबा माऊली तुकाराम" या अखंड जयघोषात, भक्तीरंगी रंगलेले लाखो वारकरी पंढरीच्या वारीला निघाले आहेत. भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी ही वारी आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.

कैवल्यचक्रवर्ती, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे आज श्री क्षेत्र आळंदी येथून भूवैकुंठ पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या पावन प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!

04/07/2026

॥ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय ॥

भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा दिव्य संगम असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि. ८ जुलै रोजी पुणे येथील गांधी वाडा येथून पवित्र प्रस्थान होणार आहे.

“ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात माऊलींच्या चरणी भक्तिभाव अर्पण करण्याचा हा पावन क्षण…!

या पवित्र सोहळ्यात सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वारकरी संस्कृतीचा अद्भुत अनुभव घ्यावा, ही नम्र विनंती.

॥ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय ॥

04/07/2026

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६

अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो, तो श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लवकरच प्रारंभ होत आहे.

भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारी ही पवित्र वारी लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे.

21/06/2026

योग... भारताने जगाला दिलेली देणगी! निरोगी जीवनाच्या या भारतीय व्यायाम पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे... योग करा, निरोगी राहा, सुदृढ बना, दीर्घायुषी व्हा...

सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

17/06/2026

स्वराज्याची प्रेरणाशक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या, राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि पराक्रमाचे संस्कार रुजवणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

जिजाऊसाहेबांनी दिलेले संस्कार, दूरदृष्टी आणि स्वराज्याचा विचार आजही प्रत्येक मराठी मनाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या कार्यातून आणि विचारांतून समाजसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यभावनेचा अमूल्य वारसा आपल्याला लाभला आहे.

राजमाता जिजाऊसाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

06/06/2026

थाट शिवराज्याभिषेकाचा, अभिमान हिंदवी तख्ताचा!
रयतेच्या राजाला, अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा.🚩🚩

14/05/2026

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! 🚩

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेत संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने इतिहासात अढळ स्थान निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शत्रूसमोर कधीही मस्तक झुकवले नाही. राष्ट्रनिष्ठा, धैर्य, विद्वत्ता आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

अखंड स्वाभिमान, अदम्य शौर्य आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला कोटी कोटी प्रणाम!

19/04/2026

सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

या शुभदिनी घरोघरी नवचैतन्य येवो आणि यश, समृद्धी, सुख-समाधान नांदो ही सदिच्छा!

#अक्षय्य_तृतीया

14/04/2026

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! 🌺

14/04/2026

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम !

#भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #जयंती

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
411039