एक क्षण आनंदाचा

एक क्षण आनंदाचा

Share

Is an organization that specializes in education, health and the environment.

Photos from एक क्षण आनंदाचा's post 01/05/2026

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थेमार्फत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व रोजगार सुरु करता यावा यासाठी mat रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये महिलांना विविध प्रकारच्या Design शिकविण्यात आल्या. त्याचप्रमाणे त्याला लागणारे साहित्य होलसेल मध्ये कुठे मिळते याची अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. संस्थेचा नेहमीच उद्देश राहिला आहे कि महिलांना फक्त प्रशिक्षणच न देता प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी व्यवसाय सुरु करावा यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येते. प्रशिक्षणासाठी सहकार्य माण देशी संस्थेचे लाभले यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. भविष्यात अशाच प्रकारचे विविध प्रशिक्षण संस्थेमार्फत महिलांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.

24/04/2026

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था

📌महिलांसाठी ग्रेव्ही प्रशिक्षण

📝कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व रोजगार सुरु करता यावा यासाठी ग्रेव्ही प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रशिक्षण सहकार्य - माण देशी फौंडेशन

दिनांक: २५ एप्रिल २०२६ शनिवार
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:३०
ठिकाण - सुखसागर नगर, खंडोबा मंदिर जवळ

सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक
090113 72220

16/04/2026

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था

📌महिलांसाठी मॅट रांगोळी प्रशिक्षण

📝कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व रोजगार सुरु करता यावा यासाठी मॅट रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

*प्रशिक्षण सहकार्य - माण देशी फौंडेशन*

📅 दिनांक: १७ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी ३:३०
ठिकाण - सुखसागर नगर, खंडोबा मंदिर जवळ

सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक
9011372220

23/03/2026

🔖Praj Industries कंपनीच्या माध्यमातून एक क्षण आनंदाचा संस्थेतील शिक्षक यांच्यासाठी Capacity Building आणि महिलांसाठी Health Awareness या विषयावर श्री. राहुल कुमार सर यांनी session घेतले.

🔖यामध्ये राहुल सर यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना आणि आपले माईंड चांगले राहण्यासाठी काय काय केले पाहिजे हे सांगितले.

🔖बाहेरील भौतिक सुखापेक्षा आपण आतून कसे काय खुश राहू याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी उत्तम अशी झोप घेतली पाहिजे. मोबाईल वापरताना त्याचा वापर कमी करता येईल का याचाही विचार नक्की करावा.

🔖या सत्राचा शिक्षक आणि महिलांना नक्कीच उपयोग होईल.

🔖सत्र आयोजित केल्याबद्दल श्री. मंदार पोफळे, Praj Industries, श्री राहुल कुमार सर यांचे मनापासून आभार.

Photos from एक क्षण आनंदाचा's post 10/03/2026

महिलादिन विशेष

IT sector चे आकर्षण कोणाला नसते. प्रत्येकाला वाटत आपण शिकून it मध्ये job करावा. पण अनेक वेळा शक्य होत नाही. महिला दिनाच्या निमित्त एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थेत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात computer चे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना Harbinger Group of company मुळे it sector पाहता आले.

या visit मध्ये मिस. अर्चना यांनी महिलांना कंपनी चे काम सॉफ्टवेअर मध्ये कसे चालते, it sector मध्ये करिअर oppurtunity कोणत्या आहेत, कोणते डिपार्टमेंट असतात याबद्दल माहिती दिली.

महिला दिनानिमित्त महिलांसाठी छान असा बॉलीवूड गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

मिस. प्राजक्ता यांनी कंपनी मधील सर्व डिपार्टमेंट महिलांना दाखविली.

अधिराज सर यांनी सर्व महिलांसोबत संवाद साधला.

जवळ जवळ सर्व महिलांनी पहिल्यांदाच it sector पाहिले होते. या visit मुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सहल enjoy तर आपण करतोच. पण अशाप्रकारच्या exposure visit मुळे महिलांना नक्कीच आत्मविश्वास मिळतो.

Exposure visit साठी संधी दिल्याबद्दल Harbinger Group, Adhiraj sir, Prajkta mam, Archana mam यांचे मनापासून आभार.

Photos from एक क्षण आनंदाचा's post 10/02/2026

एक क्षण आनंदाचा
काकडे वस्ती अभ्यासिका
इयत्ता १०वी आणि १२वी म्हणजे विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा. घरातील आर्थिक परिस्थितीमुळे परीक्षा देताना अनेकवेळा नवीन वस्तू घेता येत नाही. हीच गरज लक्षात घेऊन श्री. योगेशजी गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांसाठी writing pad आणि पेन दिले.
यावेळी योगेश जी यांनी विद्यार्थ्यांसोबत छान अशा गप्पा मारल्या. यामध्ये त्यांनी १० वी व १२वी झाल्यावर काय करायचे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

07/02/2026

Required Computer Trainer
Full Time

Time - 10:00am To 8:00pm

Payment -
10000

Required skills - computer knowledge, Typing English and Marathi, Advance excel

1 weekly off

Venue - Sukhsagar Nagar, Near Khandoba Mandir, Katraj, Pune

WhatsApp Only - 9011372220

Photos from एक क्षण आनंदाचा's post 27/01/2026

🔖एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था
संस्थेच्या माध्यमातून वस्तीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून अभ्यासिका त्याचप्रमाणे महिलांना रोजगारक्षम बनविण्यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. यातील विद्यार्थी, महिला यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन व कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

🔖कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून Harbinger Group company मधून Mr. Sandeep Kulkarni
Ms. Archana Mokadam
Ms. Prachi Dugal
Ms. Anu Riswadkar
उपस्थित होते.

🔖कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारतमातेचे पूजन करून करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

🔖प्रमुख पाहुणे संदीप कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना आपण मोबाईलचा आणि संगणकाचा वापर कशाप्रकारे करू शकतो याबद्दल माहिती सांगितली. संस्थेच्या नावातच आनंद आहे त्यामुळे सर्वांनाच यात आनंद मिळतो.

🔖बाल चिमुकल्यांनी खुप छान असे नृत्य सादर केले. यामध्ये देशभक्ती पर गीत, देवीला साद घालणारा गोंधळ, भारतातील विविध राज्यातील नृत्य, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे झुलवा पाळणा नृत्य, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा ऍक्ट, माउली माऊली नृत्य, संस्थेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी देसी गर्ल बसवलेले नृत्य असे अनेक नृत्य सादर केले. यातील best performance म्हणून प्रमुख अतिथी यांनी निवड केली.

🔖संपूर्ण प्रकल्पासाठी मदत करणाऱ्या Harbinger Group चे मनापासून आभार.

🔖विद्यार्थी, पालक असे मिळून 153 उपस्थित संख्या कार्यक्रमासाठी होती.

🔖ऋतुजा, आज्ञा, आर्या, प्राची, प्रकाश सर, किमया, प्रदीप देवकुळे, माधवी ताई, प्रणोती ताई या सर्वांचे देखील आभार.

🔖आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




25/01/2026

All are welcome

24/01/2026

🔖आपल्याला आग्रहाचे आमंत्रण
🟡वार्षिक स्नेहसंमेलन🟡

🔸दिनांक - 26 जानेवारी 2026
🔸वेळ - दुपारी 2:00
🔸ठिकाण - राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज जैन भवन, कान्हा हॉटेल जवळ, कोंढवा, पुणे

🔖आपल्या सर्वांच्या सहकार्यातून उभी राहिलेलेली एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था, वस्तीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी २०१८ पासून कार्य करत आहे.

🔖यावर्षी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन व कौतुक समारंभ आयोजित केलेला आहे.

🔖आपण उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे ही मनापासून विनंती. तुमच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

14/01/2026

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Upper Indira Nagar
Pune