29/05/2026
रायगडावरील शौचालयांच्या दुरावस्थेकरिता गडावर तिकीट आकारणी करणारा पुरातत्व विभाग व रायगड जिल्हा परिषद यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून यासाठी विनाकारण रायगड विकास प्राधिकरणाला रोषास सामोरे जावे लागत आहे.
रायगड विकास प्राधिकरणाची कार्यकक्षा केवळ संवर्धन व मूलभूत सुविधांची निर्मिती इतकीच मर्यादित असून याची देखभाल करण्यासाठी प्राधिकरणाचा निधी खर्च करता येत नाही. केवळ बांधकाम करून ते पुरातत्त्व विभाग व जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करणे, हे प्राधिकरणाचे काम असताना त्याच्या देखभालीसाठी प्राधिकरणास दोषी धरणे योग्य नाही.
23/05/2026
बोरीपार्धी येथे संयुक्त जयंती सोहळा समितीच्या वतीने सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला उपस्थित राहून गावातील प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात संभाजीराजे यांच्या हस्ते आला. संपूर्ण गावाने एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचा व विधायक विचारांचा आदर्श निर्माण केला आहे. सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती विधायक मार्गाने साजरी करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी आहे.
या उपक्रमासाठी आयोजक ओंकार चव्हाण यांच्यासह सर्व आयोजक व ग्रामस्थांचे संभाजीराजे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुष्यमान कुमार जी आहेर यांचा ‘महात्मा फुले बोलतोय व संत गाडगेबाबा बोलतोय’ या एकपात्री नाटकाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या प्रभावी सादरीकरणालाही शुभेच्छा दिल्या.
यावेळी रमेश आप्पा थोरात, तुषार थोरात, नितीन दोरगे, साहेबराव पोळ, सागर शेलार, राहूल दिवेकर, मल्हार सोडनवर, सागर फडके, शेखर सोडनवर, गायत्री खळदकर, अनिल ताडगे, अनिल गढदे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
14/05/2026
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महापराक्रमी, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
08/05/2026
शिवराज्याभिषेक सोहळा २०२६ 🚩
राज्यव्यापी बैठक
रविवार, दि १७ मे २०२६ रोजी, सायं ५:०० वा.
स्थळ : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, शिवाजीनगर, पुणे
सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड मार्गदर्शकः युवराज संभाजी छत्रपती महाराज