संवेदना : Sanvedana

संवेदना : Sanvedana

Share

LIFE COACH | LIFE SUPPORT | GUIDANCE | Support | Counselling | Research | SUSTAINABLE DEVELOPMENT Ps

10/06/2022

"जेव्हा घरी एक दिवस कधी आजारी असशील तेव्हा घरातील सगळी काम मी करिन पण त्या आजारापासून दूर राहण्यासाठी तुझी सोबत हवी .
संकट वाट भगत आहेत आपली त्यानां हसून दूर करू आपण फक्त तुझी सोबत हवी ."

06/06/2022

*MY HEART VERY TOUCHING*

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....
हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..
जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.
जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात 100 एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घाटावर, अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा बरोबर नव्हती.
जळताना - ना प्रेम करणारे जिवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे, ना करोडोची संपत्ती.
अरे अरे....
तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टीचा मोह धरून पळत राहिला.... ही खंत तर नसेल वाटत त्या जळणा-या प्रेताला...?
समाज बंधुंनो....!
आत्मप्रौढी, स्वतःचा मोठेपणा, दुस-याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहंपणाचा महामेरू ही जीवनातील -हासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही
चला.... जीवन सुंदर बनविण्यासाठी काम- क्रोध-लोभ- मत्सररूपी लक्षणांना दूर ठेऊन जीवनात किती ही मोठेपद, प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेऊ या....
माणूस बनू या....!
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

🌼🌼🌼

31/05/2022

मागून ढकलणारी व्यक्ती हत्तीला ट्रकमध्ये बसवू शकते असे अजिबात नाही, पण यातूनच हत्तीला कळते की माझ्या मागे कोणीतरी आहे जो मला मदत करत आहे आणि या भावनेने हत्ती ट्रकमध्ये चढतो.. कधी कधी आपल्यालाही असाच थोडा आधार हवा असतो. त्यामुळे एकमेकांना मदत करत राहा. हे परस्पर सहकार्य एकमेकांमध्ये आत्मविश्वास भरून काढते आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करू शकते. म्हणूनच समर्थन ही मोठी गोष्ट आहे.
आयुष्यात एकमेकांना साथ देत राहा.
🙏🙏🙏

30/05/2022

फक्त तू खचू नकोस

एक डाव हरला तरी
त्यात काय एवढं?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड,
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस..
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सूर्य रोजच उगवतो,
त्याच नव्या तेजाने
रोज मावळतीला जातो
रोजच्याच् नेमाने
येणे जाणे रितच् इथली
हे तू विसरु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

प्रेम तुझ्यावर करणारे
कितीतरी लोक आहेत
तुझ्यासाठी जोडणारे
खुप सारे हात आहेत,
अरे अशाच आपल्यांसाठी
तू ही थोड हसुन बघ
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

वाट तुझी बघत असतं
रोजच कुणीतरी
तुझ्यासाठी जगत असतं
आस लावून प्रत्येक क्षणी,
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
अश्रु तू गाळु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

उठ आणि उघडून डोळे
पहा जरा जगाकडे
प्रत्येकाच्या आयुष्यात
काहीतरी असतेच् थोडे,
नाही नाही म्हणून
उगाच कुढत तू बसु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सामर्थ्य आहे हातात जर,
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल
परिस्थितीशी भिडवून छाती,
दोन हात करत चल,
विजय तुझाच असेल
तेव्हा मागे वळून बघु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.
🌷🌷🌷🌷🌷

25/05/2022

मिरा हॉटेल गोल्डन paradize मध्ये येऊन बसलेली पण आज ती जबरदस्त गोंधळली होती...आताच जॉन चा फोन आलेला..अन् तो तिला विचारत होता ती कुठे आहे.....? तिला थोड आश्चर्य वाटलं....पण नंतर त्यानेच सांगितलं की राधा च्या जागेवर आज तो येणार आहे तिच्यासोबत डिनर करायला.....ती फारच घाबरली होती....भलेही ती त्याच्यासोबत अगोदर बोलली वगेरे होती..पण अस डिनर ला त्याच्या बरोबर कधीच गेली नव्हती....ती सारखा चेहऱ्यावरचा घाम पुसत होती......अन् समोरच्या glass मधून पाणी पित होती....थोड्याच वेळात तिला समोरून जॉन येताना दिसला अन् हीच्या हृदयाची धडधड जास्तच वाढली....त्याला पाहून ती उठून उभी राहिली अन् कसनुस हसली....

' हाय मिरा..' तिच्या समोरच्या चेअर वर बसत त्याने ग्रीट केलं.... आज त्याने वेगळा ड्रेस घातला होता नाहीतर रोज काळी कपडे असतात...त्यात तो थोडा स्मार्ट दिसत होता....

' हाय...' ती पण बसत बोलली.

' सॉरी हा..तुझा मूड ऑफ झाला असेल..पण मॅडम ना हाताला भाजल त्यामुळे त्यांनी मला पाठवलं...त्यांना तुला दुःखी करायचं नव्हत म्हणून....' जॉन.

' नाही नाही माझा मुूड ऑफ नाही झाला..thank you.. तुम्ही आलात..' मिरा गडबडत बोलली.

' ओके then it's good.... तू काही ऑर्डर केलं..?' जॉन.

' आम् नाही अजुन.....तुम्ही पहिलं ऑर्डर करा मग मी करते..' मिरा.

' नो नो..लेडीज फर्स्ट..' जॉन हसत बोलला...

'अस काही नाही...तुम्ही करा...' मिरा.

' नो नो त्तू कर...' जॉन.....शेजारी वेटर वैतागून दोघांकडे बघत होता....

' हेहे हे...' मिरा दात काढून जबरदस्ती हसली अन् पुन्हा तिने सँकोचून तोंड बंद केलं...जॉन ने थोड विचित्रपणे तिच्याकडे पाहिलं......मग तिने हलकं हसली अन् मेनू card बघू लागली...आज पहिल्यांदा तिला मेनू card वाचायला खूप जास्त कठीण जात होत.....ती सारखी पानं पलटत होती.....अन् मधूनच त्याच्याकडे पाहून जबरदस्ती हसत होती.....तीच तिलाच काळात नव्हत की ती अस का करतेय....

' मिरा ऑर्डर कर...तुझ तीनवेळा मेनू कार्ड पलटून झालं..' जॉन कसणुस हसत बोलला....तिचा ऑकवर्ड पना बघून आता त्याला पण nervous फील होऊ लागलं.....मिरा ने पटकन त्यातल्या एका डिश वर बोट ठेवलं अन् वेटर कडे बघितल...

' मॅडम...ते ब्रेक फास्ट साठी घेतल जात...' वेटर हसू दाबत बोलला.....मिरा ने ऑकवर्ड पने जॉन कडे पाहिल..तो थोडा गालात हसला अन् त्याने मेनू कार्ड तिच्या हातातून घेतल..

' वेज or नॉनव्हेज....?' जॉन.

' वेज..आय एम ब्राह्मण....' मिरा..

' ओके..' जॉन बोलला अन् पटापट चार डिशेस ऑर्डर केल्या..

' मिरा बी कंफर्टेबल.....' जॉन हसून बोलला.

' सॉरी..पण मी अस पहिल्यांदाच कोणासोबत तरी डिनर साठी आलेय.....' मिरा निराश पने बोलली....जॉन ने हसून प्रत्युत्तर दिलं...

' वेटर पाणी....?' जॉन वेटर कडे बघत बोलला....वेटर थोडा दूर होता...

' हे घ्या.....मिरा पाण्याचा ग्लास त्याच्याकडे सरकवत बोलली पण गडबडीत थोडा जास्त जोर लागला अन् पाण्याचा glass त्याच्या ड्रेस वर पडला..... तस तो टेबल ला पकडुन थोडा बाजूला झाला...

' omg.. omg.....I m so sorry..' मिरा उठून त्याच्या जवळ गेली अन् त्याचा शर्ट झाडू लागली....पण गडबडीत ती थोड जास्तच जोरात शर्ट ओढू लागली...

' मिरा..मिरा...कूल डाऊन....' जॉन लगेच चेअर वरून उठला अन् तिच्यापासून दूर झाला..

' मी आलोच.....' जॉन बोलला अन् वॉश रूम कडे गेला..आणखी काही वेळ ही असच झाडत बसली तर शर्ट फाटून जायचा.....त्याने मनातच विचार केला अन् जाता जाता तीच्याकडे पाहिलं...

मिरा डोक्याला हात लावून बसली....हे राम..ही अशी गडबड का होतेय..? इतर वेळी तर कधी होत नाही..आज मला झालंय काय..? ही राधा तरी ना..कशाला याला पाठवायच..मिरा नाराजीने मान हलवत अन् डोकं हातात पकडुन बसली होती......थोड्याच वेळात जॉन आला....तिला तस बघून थोड हसला..

' मिरा इट्स ओके.....' जॉन बसत बोलला तस मिरा ने त्याच्याकडे पहिलं......

' लेट्स स्टार्ट...' डिश आलेल्या बघून तो बोलला.मग तिने खायला सुरुवात केली....

त्याच वेळी दुसऱ्या एका फाईव स्टार हॉटेल मध्ये एक फॅमिली हसत खेळत डिनर टेबल वर बसली होती.........

09/05/2022

*कृपया दोन मिनिट, हे वाचा...*
मित्रानो कोणीच बापाचे मालक होवू नका
🙏🙏🙏🙏🙏🙏

विलक्षण ...
ST वाहकाच्या प्रामाणिकपणा व बापाचे वास्तव.
नेहमी प्रमाणे आज लातूर परळी ड्यूटी करत असताना लातुरवरून पुढे गाडी निघाली असता मी आपले तिकीट काडण्याचे काम करत होतो. तिकीट काडत काडत एका आजोबा जवळ आलो आणि आजोबा कुठे जायचे विचारले, आजोबा म्हणाले एक हाफ परळी द्या. त्यांचे ज्येष्ठ नागरिक चे कार्ड पाहून त्यांना एक परळी हाफ तिकीट दिले. त्यांनी विचारले किती द्यायचे पैसे? मी म्हणलो 60 रू द्या बाबा. त्यांनी माझ्या हातावर 55 रू.टेकवले. मी म्हणलो आणखी 5 रू द्या बाबा. त्यांनी तिकीट वाढले का विचारात खिश्यात पाहायला सुरवात केली तोपर्यंत मी इतर लोकांचे तिकीट काढत होतो. त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून मी परत त्यांना म्हणलो बाबा 5 रू द्या ना 60 रू.तिकीट आहे.

बाबा म्हणाले साहेब एवढेच पैसे दिलेत मला पोरांनी 55 रू तिकीट आहे म्हणून.... हे ऐकताच मला खूप वाईट वाटले. आज आपण मोठे झालो आपल्याकडे बापानी व्यवहार दिला तर आपण बापालच मोजके पैसे द्यावेत ज्या की बापानी आपल्याला खांद्यावर घेवून हे जग दाखविले. लहानपणी सर्व लाड पुरवले. पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तेंव्हा पुरवले त्याच बापावर आज अशी वेळ... मोजून तिकीट एवढेच पैसे ...उन्हाळा दिवस आहे तहान लागू शकते अशा वेळेस त्यांनी काय करावे...कोणाला मागावे. .5 रू माझ्यासाठी मोठी रक्कम नव्हती भरायला मी ती भरली पण अशी परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले.गाडी लातूरवरून परळीला आली पण माझ्या मनात ती गोष्ट सारखी सलत होती...मित्रानो कोणीच बापाचे मालक होवू नका त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या ...ते खर्च करणार नाहीत दिले तेवढे पैसे कधीच...
आपलाच

07/05/2022

🍁पत्नी🍁

आयुष्यात सुख दुःखात साथ देणारी, परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही आपला साथ कधीही न सोडणारी, लग्नानंतर स्वतःच्या आई वडिलांना सोडून कायमची आपल्या नवऱ्याच्या घरी रहायला येणारी. लग्नानंतर आपल्या नवऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी, चुकल तर समजून सुध्दा सांगणारी. आयुष्याच्या वळणावरची एक साथीदार ती एक पत्नीचं असते.

पुढील सात जन्म सोबत राहण्याच वचन घेऊन प्रत्येक संसाराला आणि पती पत्नीच्या नात्याला सुरुवात होत असते. आयुष्यभर आपल्या पतीच्या सुखात आणि दुःखात सोबत राहायचे वचन घेते ती एक पत्नीचं असते, लग्नानंतर आपल्या सुखाला विसरून पतीच्या सुखात आपले सुख मानणारी सुध्दा एक पत्नीचं असते.

🍁"हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको."🍁

03/05/2022

A strong woman understands that the gifts such as logic, decisiveness, and strength are just as feminine as intuition and emotional connection. She values and uses all of her gifts.”

21/04/2022

#संवेदना

"Fathers are the first friend you make and the last love of your life." ·

19/04/2022

*वेळ आणि आवयशकतेनुसार माणसाची किंमत कमी जास्त होते, माशी चहात पडली तर चहा फेकून दिला जातो आणि माशी तुपात पडली तर माशी फेकून दिल्या जाते. आपली किंमत स्वतःला असू द्या लोक वेळेनुसार आणि गरजेनुसार तुमची किंमत ठरवणार पण त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडायला नको, लोकांच्यामनाप्रमाणे जगायला गेलो तर आपण कधीच आनंदी राहू शकणार नाहीत.* :

* #मनअर्पिता

16/04/2022

*" स्वर्गात सर्व काही आहॆ,*
*परंतु मृत्यू नाही,*
*गीतॆमध्यॆ सर्व काही आहे,*🌿☘🌸✨🌺🌺🌹🌹🌷
*परंतु खोटं नाही,*
*जगात सर्व काही आहे,*
*परंतु समाधान नाही,*🌿🍁🍁☘🌸🌷🌺🌹
*आणि*
*आज माणसांमध्ये*
*सर्व काही आहे„*
*परंतू धीर नाही.••*✨🌿☘🌷🍁🌺🌹
*धिर धरला तर आयुष्य स्थिर* *होईल*🌷🌷 - :


* #मनअर्पिता* 💓

#संवेदना 💓🍁

09/04/2022



मुली व महिलांसाठी उपयुक्त योजना आपण राबवत आहोत, गेली 3 वर्षापासून हे काम सुरु आहे, यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, बरेच जन सदस्य, स्वयंसेवक, जनसंपर्क & शाखा अधिकारी म्हणून सहभागी होत आहे.
महिलांना घरी बसून काम, घरी बसून टेक्निकल काम-मोबाईल & संगणकावर, सर्व क्षेत्रानुसार विविध प्रकारच्या नोकरी, जॉब उपलब्ध असतात, उद्योजिकांना बिझनेस सपोर्ट, रोजच्या रोजच ऑर्डर पण मिळवून दिले जातात, सर्व प्रकारचे व्यवसायिक सहकार्य केले जाते. ज्यांना ईतर बाबीमधील देखील मदत, सहकार्य हवे त्यांनी लगेच संस्थेशी संपर्क करावा.
फेमिनिझम - महिलांनी महिलांसाठी केलेले स्वयंपूर्ण व्यासपीठ,
📱 Asha : आशा - +91 9561900911,
📱 Pooja : पूजा - +91 8308341653

संपर्क क्रमांक - कार्यालय -
📲+91 8793102978,
📲+91 9130043999,

मुली व महिलांपर्यंत हा मेसेज पाठवा.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


PUNE
Pune