Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण

Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण

Share

Stepping up with society by providing them with a dignified life to maintain peace, prosperity, and harmony in the nation.

31/05/2026
27/05/2026

कामदा एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌼

14/05/2026

स्वराज्याच्या रक्षणासाठी अदम्य धैर्य, अपराजित रणनिती आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या बळावर संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्यनिष्ठा अबाधित ठेवली. औरंगजेबाच्या आक्रमणासमोर न झुकता त्यांनी स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि पराक्रमाची परंपरा जपली. तेजस्वी बुद्धिमत्ता, अपराजित रणनिती सह्याद्रीचा लढवय्या धुरंधर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा!


#कार्यसिद्धी_प्रतिष्ठान

10/05/2026

आई माझा गुरू, आई कल्पतरू सौख्याचा सागरू, आई माझी...

आपल्या जीवनातील आपला पहिला गुरू म्हणजे आपली आई! आज मातृदिनानिमित्त सर्व मातांना खुप खुप शुभेच्छा!

06/05/2026

आपुलकी, संयम आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम – आदरणीय माईसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐

05/05/2026

।। गणपती बाप्पा मोरया ।।
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺✨

01/05/2026

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!

सह्याद्रीचा कणा, शिवछत्रपतींचा पराक्रम आणि संतांच्या विचारांनी सजलेल्या आपल्या मायभूमीचा आज उत्सव! संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून, मराठी अस्मिता आणि संस्कृतीचा वारसा अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करूया.

सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद, जय महाराष्ट्र!

Photos from Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण's post 25/04/2026

पुण्यनगरीचे शक्तीपीठ आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान, धनकवडीनिवासी गुरुवर्य श्री योगीराज शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चैतन्य नगर येथील 'शंकर महाराज विसावा मठ' येथे महाराजांचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होताना एक वेगळीच आत्मिक शांती आणि ऊर्जा अनुभवता आली. तसेच आज मठात आयोजित 'महाप्रसाद' सेवा कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य लाभले. भाविकांसाठी राबविलेल्या या सेवाकार्यात सहकार्य करता आले, याचे मनस्वी समाधान आहे.

​या मंगल समयी अनेक मान्यवर आणि योगीराज शंकर महाराज भक्तांच्या भेटी घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला.
महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
श्री शंकर महाराज की जय!

गिरीराज तानाजीराव सावंत
संस्थापक अध्यक्ष, कार्यसिद्धी प्रतिष्ठान, पुणे.

24/04/2026

पुण्यनगरीचे शक्तीपीठ आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले धनकवडीनिवासी गुरुवर्य श्री योगीराज शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त, महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

19/04/2026

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
या शुभदिनी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो.

#अक्षय्य_तृतीया

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Katraj
Pune