06/06/2026
इतिहास रचला! 🇮🇳♟️
ग्रँडमास्तर R. Praggnanandhaa यांनी 'नॉर्वे चेस २०२६' स्पर्धेचे विजेतेपद पटकावत भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्ण इतिहासात नवे पर्व लिहिले. ही मानाची स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले! 🏆
06/06/2026
निश्चयाचा महामेक । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी।।
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
06/06/2026
दिलेला शब्द पूर्ण करत भाजप सरकारने आता मराठा समाजाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारचा आणखी एक ऐतिहासिक निर्णय!
ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसेच विविध सोयी-सुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहेत.
05/06/2026
माझ्यासाठी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू हेच सर्वात मोठे समाधान आहे!
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रद्योग मंत्री संसदीय कार्य कोथरूड मतदारसंघ आमदार आदरणीय नामदार मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड तालुक्यातील वाजेघर पंचक्रोशीतील आपल्या लाडक्या लेकींचा आणि विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सुरू केलेल्या मोफत स्कूल बस सेवेला आज यशस्वी २ वर्षे पूर्ण झाली.
शिक्षणाची दारे प्रत्येकासाठी खुली असावीत आणि ग्रामीण भागातील एकही मुलगी प्रवासाच्या अडचणीअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा ध्यास घेऊन काम करणारे माझे *मार्गदर्शक मा. चंद्रकांतदादा पाटील* यांच्या दूरदृष्टीमुळे आणि दिलेल्या खंबीर बळामुळेच ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
दादांच्या याच जनसेवेच्या संस्कारांतून आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवास असाच अखंड सुरू राहील.
विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य हेच आमचे ध्येय!
मा.स्नेहलताई गणपत मामा दगडे
पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा मा.पुणे मनपा शासन नियुक्त नगरसेविका
मा.सरपंच पिसोळी
04/06/2026
सौरऊर्जेच्या बळावर महाराष्ट्राची ऐतिहासिक झेप!
'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेअंतर्गत महाराष्ट्राने ओलांडला १० लाख सौर पंपांचा विक्रमी टप्पा! देशभरातील एकूण पंपांपैकी तब्बल ६४% पंप एकट्या महाराष्ट्रात! बळीराजा आता झालाय ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी!
#सौरऊर्जा #शेतकरी #पीएमकुसुम #सौरकृषीपंप
04/06/2026
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत 2047च्या विकसित भारताच्या दृष्टीने वेगाने प्रगती करत आहे हीच विरोधकांची मुख्य पोटदुखी आहे!
#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
04/06/2026
काँग्रेस पसरवत असलेली 'RBI ने सोने विकल्याची' बातमी खोटी निघाली! आणि काँग्रेसचा फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला!