31/01/2025
दिड वर्षांच्या गॅपनंतर केंद्र सरकारने साखर निर्यात खुली करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचा मार्ग मोकळा केलाय.
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या आर्थिक वर्षाच्या सरत्या तिमाहीत हा निर्णय साखर उत्पादकांसोबतच शेतकऱ्यांच्याही पथ्यावर पडणारा आहे.
निर्यात खुली केल्याचा साहजिक परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊन साखरेचे दर पाच ते दहा टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे कमी उत्पन्न होऊनही साखर उद्योग मागणीअभावी संथ होता त्याला आता उभारी येऊ शकते. सोबतच यामुळे शेतकऱ्यांची देणी देण्याला देखील यामुळे मदत होऊ शकते.
मुळात साखर उत्पन्न हे देशांतर्गत वापरासाठी कमी आणि निर्यातीसाठी जास्त असे धाडसी धोरण नजिकच्या काळात स्विकारणे शेती उद्योग, आरोग्य, आणि पर्यावरण या तिन्ही बाबींच्या हितासाठी अतिशय गरजेचे आहे. त्या अनुषंगाने देशांतर्गत भाववाढीकडे दुर्लक्ष करून साखरेच्या वापराला चाप लावणे देखील महत्वाचे आहे.
उन्हाळा येतो तसे साखर वापराचे प्रमाण वाढते. त्याच वेळी निर्यात खुली झाल्याने दोहो बाजुंनी साखरेचे दर दबावात राहणार आहेत. तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी साखरेचा वापर पुर्णतः बंद करून गुळ किंवा अन्य पर्यायांचा वापर करायला हरकत नाही.
05/11/2024
आदरनिय पवार साहेब ,
मी पण मराठा आहे पण धडावर डोसकं अन् डोसक्यात मेंदू असणारा मराठा आहे.
म्हणजे पवार साहेब, तुम्ही जरांगे पाटील अन् गोरगरीब गरजवंत मराठा समाज अन् जमलेल्या गर्दीचा वापर तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला.
साहेब, जे तुमच्या पोटात होतं ते ओठांवर आलं एकदाचं , तुमचा हेतू मराठ्यांच्या आडून भाजपाला संपवायचा आहे तर आम्ही तर समजत होतो, आम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावत आहात , साहेब आम्ही तुम्हाला ज्येष्ठ बापमाणूस समजलो अन् तुम्ही आमचा गोरगरीब मराठ्यांचा घात केलात.
आमच्या भावनांचे शिरकाण केलेत, साहेब आमच्या आंदोलनाला अन् आंदोलकांना तुम्ही तुमची राजकारणाची B team म्हणून वापरले.
साहेब तुमच्या भाजपा द्वेषाची अन् ब्राह्मण द्वेषाची बंदूक आमच्या मराठा समाजाच्या खांद्यावर ठेवून चालवली..
पवार साहेब तुमच्या या गलिच्छ राजकीय खेळीच्या नादात माझ्या गावगाड्याची वीण उसकटली ओ, जातीजातीत तणाव वाढला ओ, एकमेकांच्या सुखादुखात सोबत असणारी गावातील माणसं एकमेकांच्या पासून तुटली ओ, इसकूट झालाय समदा..प्रत्येक जण आडनावात जात शोधायला लागलाय , साहेब लय पाणी वाहून गेलंय पुलाच्या खालून..
पवार साहेब तुम्ही चुकलात , घात केलाय सर्वांचा..
शिवछञपतीचा महाराष्ट्र परत जातीपातीत अजून विसकटला ओ तुम्ही
आपण २१ व्या शतकात आहोत, राष्ट्राच्या समोरील, समाजाच्या समोरील आव्हाने तुम्ही विसरलात
साहेब तुम्ही चुकलात,आम्ही आपणांस वडिलधारी बापमाणूस समजत होतो....
श्री प्रशांत भोसले Prashant Bhosale
बारामतीचा एक गरजवंत मराठा
31/10/2024
"छत्रपती संभाजीनगर" नावाला विरोध करणारा, काळे फासणारा इम्तियाज जलील, औरंगजेबाचे गुणगान करणारा मौलाना सज्जाद नोमानी यांना सोबत घेऊन मिळालेल्या आरक्षणापेक्षा मेलेले बरे नाही का? लोकशाहीच्या मार्गाने जर पुढे जायचेच आहे तर मग हे शरीयाच्या मार्गाने पुढे जाणारांच्या मांडीवर बसून का सांगता आहात?
स्वाभिमान तर विकलाच आहे, लाज पण विकणार का त्या फुटकळ दिशाभूल करणाऱ्या आरक्षणासाठी? छत्रपती संभाजी महाराजांचे केलेले बिभत्स हाल, छळ, काढलेली धिंड, उपटलेले नखे आणि केस, तोडलेली बोटे आणि हातपाय, फोडलेले डोळे, केलेले बलीदान सर्व विसरून या लोकांच्या सोबत उभे राहण्यासाठी लाज विकून खाणे हेच एकमेव कारण असु शकते.
त्या सज्जाद नोमानीचे एकेक देशविरोधी वक्त्व्ये बघा...
सोबत सर्व लिंक पण देतोय
त्याने औरंगजेबाचे केलेले गुणगान बघा तुम्हाला सहन होतेय का आरक्षणासाठी?
भारताचे सुद्धा पॅलेस्टाईन करण्याच्या वल्गना करणाऱ्या आणि त्यासाठी भारतातील मुसलमानांना तयार राहण्यास सांगणारा सज्जाद नोमानी जरांगेच्या मांडीला मांडी लाऊन बसलाय ते सहन करणार का मराठे आरक्षणासाठी?
भारतातील मुसलमानांचा तालीबानच्या विजयाला सलाम म्हणणारा सज्जाद नोमानी सोबत घेऊन बसलेल्या जरांगेच्या दुसऱ्या बाजुला जे भंते बसलेत ते विसरलेत का बमियानच्या बुद्ध लेण्यांवर डागलेल्या तोफांचा मारा?
हा तोच नोमानी आहे जो निवडणुकांमध्ये मतदान करणे हे धर्माचे काम आहे असे सांगून एकगठ्ठा मतदानासाठी फतवे काढून वोट जिहाद भडकवतो आहे ते काही तुमच्या आरक्षणासाठी नाही तर या देशातून तुमची जात धर्म सर्व काही संपवण्यासाठी...!
हा तोच नोमानी आहे जो नुकतेच इज्रायलच्या हल्ल्यात ठार झालेल्या हम्मासचा दहशतवादी हनिया ईस्माईलसोबत वाटाघाटी करून आला होता भारतात ईस्लामिक राजवट आणण्यासाठी मदत हवी म्हणून...!
वरून या नोमानीने अशी ही मुक्ताफळे उधळली होती की जर ईस्माईल हनिया दहशतवादी आहे तर महात्मा गांधीला देखील दहशतवादी म्हटले पाहीजे. आता फायदा करून देतो म्हटल्यावर हागल्या मुतल्यावर बोंबाबोंब करणारी काँग्रेस या वक्तव्यावर गप्प राहीलीय...
योगा हराम आहे, मुलींना शाळेत पाठवणे हराम आहे, असे म्हणणारा नोमानी पुण्यातील चार लोकसभांमध्ये महाभकासआघाडीच्या प्रचारासाठी फतवा काढण्यातही आघाडीवर होता....
Rahul Premraaj Bhosale
25/10/2024
स्वतःसाठी काही नाही... फक्त तुमच्या आमच्यासाठी राबणारा देवाभाऊ
☆ शेतकर्यांचा देवाभाऊ
✅️ मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणून शेतकर्यांच्या आयुष्य प्रकाशमान करणारा देवाभाऊ
✅ जलयुक्त शिवाराच्या माध्यामातून महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणारा देवाभाऊ
✅️ नैसर्गिक संकटात मात करीत, शेतकर्यांच्या पिकांचा विमा उतरवणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना दिवसा आणि मोफत वीज उपलब्ध करून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणारा देवाभाऊ
✅️ कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांना मतदानाचा हक्क मिळवून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना एक रुपयात पीक विमा मिळवून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांच्या प्रामाणिक पणाला सर्वोच्चपदी ठेवून, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देणारा देवाभाऊ
✅️ शेतातील निघणार्या उत्पन्नापेक्षा जास्त पीक विमा मिळवून देणारा देवाभाऊ
✅️ शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊन हजारो हेक्टर जमिन आणि शेकडो गावांची तहान भागवनारा
देवाभाऊ
✅️ मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळ , मागेल त्याला सौर पंप देऊन शेतकर्यांना आर्थिक दृष्ट्या खंबीर बनवणारा देवा भाऊ
✅️ जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मराठवाडय़ाला जलयुक्त करणारा देवाभाऊ. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २५ हजार गावांना २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले.
✅️ पहिल्या 5 वर्षात 48 लाख शेतकर्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देणारा देवा भाऊ
✅️ गाळ मुक्त धरण गाळ युक्त शेती अभियान राबवून शेतकर्यांच्या जमिनीची सुपिकता वाढणारा देवाभाऊ. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून १.२५ लाख हेक्टर शेतजमिन सुपीक
✅️ पहिल्या 5 वर्षात शेतकर्यांना सर्वाधिक पीक कर्ज उपलब्ध करून देणारा देवा भाऊ
‘आपला आमचा देवाभाऊ’…
आपले नेते ‘देवाभाऊ’ आज दक्षिण पश्चिम नागपूर येथून नामांकन अर्ज दाखल करणार ..
🐚 शंखनाद होणार !
आम्हा सर्व कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील लाडक्या भावा-बहीणींतर्फे या गाण्याच्या माध्यमातून ‘आपल्या देवभाऊ’ला यशस्वी होण्याकरीता खूप-खूप शुभेच्छा !
Devendra Fadnavis
- प्रकाश गाडे
27/09/2024
सुपारी घेऊन बातम्या देणाऱ्या अग्रोवन चा खोटारडेपणा शेतकऱ्याने केला उघड...!
यांचे हे नेहमीचेच आहे, आता लोक जाब विचारायला लागले तर बोबडी वळतेय.. 👇🏻👇🏻 व्हिडीओ
17/09/2024
शेतकऱ्यांच्या गळ्याला वृत्तपत्रांचा फास (भाग १)
यांची बरीच प्रकरणं आहेत. एकेक काढतो बाहेर.. आज पहीला भाग टाकतोय.
बातमी १ :
१९ ऑगस्ट २०२४ गुलाबी बोन्ड अळीचे आक्रमण. प्रत्यक्षात परिस्थिती काय होती. तर कापसावर कुठेही बोन्ड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. मुळात बोन्ड अली प्रादुर्भावाचा हा काळच नाही
बातमी २ :
१० सप्टेंबर २०२४ गुलाबी बोन्ड अळीने कोट्यवधींची हानी. देशभरात १०० लाख गाठींच्या उत्पादनास फटका
प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? तर अजूनही राज्यात बोन्ड अळीच्या प्रादुर्भावाच्या तक्रारींची नोंद नाही.
मग अशा बातम्या का पेरल्या जातात? तर रासायनिक औषध विक्रेत्या कंपन्यांच्या दबावाखाली. का ? तर या कंपन्या याच वृत्तपत्र वैगेरेंच्या जाहिरातदार कंपन्या असतात. त्यांना माल खपवण्याचे मासिक लक्ष दिलेले असते. भीतीपोटी शेतकरी खबरदारी म्हणून प्रादुर्भाव होण्याआधीच औषध फवारणी करून मोकळा होतो. फसगत होते शेतकऱ्यांची. अशा बातम्या देणारी वृत्तपत्रे शेती विषयाला वाहून घेणारी वृत्तपत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत हे इथे विशेष आहे.
लघु कालीन कपाशीच्या वाणांवर सहसा बोन्ड अळीचा प्रादुर्भाव होत नाही आणि दीर्घ मुदतीच्या वाणांवरील प्रादुर्भाव टाळता येत नाही म्हणून जानेवारीच्या मध्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त शेवटपर्यंत कापूस उपटून टाकणे केव्हाही चांगले. मात्र या भीतीचा फायदा वेगवेगळ्या प्रकारे उठवला जातो.
बातमी क्र. ३
आज बातमी आलीय की बोण्डअळी चा प्रादुर्भाव अगदीच कमी आहे. लाज झाकण्यासाठी वेगवेगळ्या शब्दात गूंडाळून बातमी दिली असली तरी अंतीम सत्य हे आहे की आधी दिलेल्या दोन बातम्या ह्या धादांत खोट्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करून नुकसान करणाऱ्या होत्या.
दरम्यान शेतकऱ्यांचा औषधावरील झालेला खर्च, फवारणीचा रोजगार याची नुकसान भरपाई शासनाला मागण्यासंदर्भात पुन्हा याच वृत्तपत्राकडून बातमी येईल याची वाट बघा..!
16/09/2024
Prashant Bhosale यांच्या वॅाल वरून साभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
बातमी 1: सोयाबीन हमीभावाची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे...!
बातमी 2: ॲागस्ट 2024 मध्ये खाद्यतेलाची आयात मागील वर्षापेक्षा 16 % ने घटली आहे..
खालील फोटो पहा , ही आहे बारामती तालुक्यात तेलबिया लागवडीखाली वाढलेली जमीन , जवळजवळ गेल्या तीन चार वर्षातजिरायत भागात वीस पट जमीन तेलबिया लागवडीखाली आली आहे.
अगदी संपूर्ण महाराष्ट्र , अगदी देशभर शेतकऱ्यांनी खाद्यतेल तेलबिया शेती अधिकाधिक लागवडीखाली आणली आहे. भुईमूग करडई मोहरी नारळ सूर्यफूल तिळ या तेलबियांच्या पासून तेल गाळण्याचे लाकडी दगडी खाद्यतेल घाणे संपूर्ण देशभर वाढत आहेत.
देशातील बरेपैकी कुटुंबातील महिला पुरूष स्टेनलेस स्टिलचे घरगुती खाद्यतेल घाणे वापरत आहेत. याची किंमत साधारण अठरा ते वीस हजार रूपये आहे.
बहुतांशी शेतकरी , शहरी मध्यमवर्गीय व उच्च श्रीमंत हे शुद्ध खाद्यतेल खात आहेत. जेणेकरून देशाच्या अंतर्गत खाद्यतेल बियांची मागणी वाढत आहे.
सध्या प्रचंड वेगाने वाढत असलेले जीवनशैलीचे आजार जसे मधुमेह हृदयरोग लठ्ठपणा कँसर हाडांचे विकार यास बहुतांशी प्रमाणात खाद्यतेल कारणीभूत आहे.
हे खाद्यतेल म्हणजे सध्या बाजारात मिळत असलेले खाद्यतेल म्हणजे डबल ट्रिपल रिफाईन्ड खाद्यतेल , सोयाबीन तेल , पामतेल , हे सर्व तेल आरोग्यास खूप घातक आहे , नुकसान करणारे आहे.
यामुळे जनमाणसा मध्ये शुद्ध खाद्यतेलाची मागणी खूपच वेगाने वाढत आहे. तशी जनजागृती वेगवेगळ्या हेल्थ प्रोफेशनल्स डॉक्टर्स आरोग्य सल्लागार यांच्या कडून होत आहे.
जसे लोक वर्षाचे धान्य कडधान्य एकदम भरून साठवून ठेवतात , अगदी तसेच आता बरीच कुटुंबे वर्षभर लागणारा भुईमूग करडई तिळ सूर्यफूल भरून ठेवत आहेत, घरात साठा करून ठेवत आहेत. अन् जेव्हा हवे तेव्हा त्या तेलबिया पासून शुद्ध खाद्यतेल स्टेनलेस स्टीलचे घाण्यातून घरातच गाळत आहेत.
अन् निघालेली पेंड जनावरांना शेळ्या गाईगुरे यांना खाऊ घालत आहेत. तिळ व शेंगदाणे पेंडीपासून बरेचसे लोक घरातच गुळ टाकून चिक्की बनवत आहेत.
बरेचसे शहरात खेड्यापाड्यात लाकडी दगडी खाद्यतेल घाणे तरूणांनी सुरू केले आहेत , हे शुद्ध खाद्यतेल ते आजूबाजूला विकतात अन् आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कडून खाद्यतेल बिया खरेदी करतात.
अशा प्रकारे एक स्थानिक अर्थचक्र तयार झाले आहे, लोकांच्या आरोग्याच्या मध्ये सुधारणा होत आहे , तरूणांना रोजगार मिळत आहे , खाद्यतेल आयातीला लागणारी परकीय गंगाजळी कमी होत आहे, खाद्यतेल आयातीवर लागणारा खर्च कमी होत आहे.
हे काम शेतकरी , तरूण उद्योजक , कृषि विभाग महाराष्ट्र शासन , कृषि विभाग भारत सरकार अतिशय शांतपणे सुप्तपणे करत आहे.
यामुळे कृषि विभाग महाराष्ट्र शासन अधिकारी कर्मचारी व कृषि विभाग भारत सरकार ( केंद्र सरकार ) हे निश्चितच कौतुकास पाञ आहेत.
श्री.प्रशांत भोसले , Bsc(Agri)
भाजपा किसान मोर्चा (कृषि पदवीधर मोर्चा ) ,
महाराष्ट्र प्रदेश ,महाराष्ट्र
16/09/2024
मध्यप्रदेशात सोयबीन हमीभाव 5860 केल्याची पोस्ट फेक आहे...!
"इतर राज्यात असंतोष निर्माण करण्याच्या उद्देशाने" व्हायरल करणारांवर होऊ शकते कायदेशीर कारवाई...! 👇🏻👇🏻👇🏻👇🏻कॅामेंटमध्ये डिटेल्स 👇🏻👇🏻
16/09/2024
हम्म्म्म्म्म्म.... तर आहे ते असं आहे... सर्व शेतकरी कल्याणाच्या योजना पुर्वापार पासूनच आहे मोदींनी नविन काय केलं असा प्रश्न आहे. सोलार पंप योजना मनमोहनने सुरू केली म्हणे...
पण एकही पंप वितरीत केल्याची बातमी पुराव्यादाखल देऊ न शकल्यावर ही अशी सारवासारव सुरू होती...
😝😝😝👇🏻👇🏻👇🏻👇🏻
14/09/2024
खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवले...!
शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाचा धडाका सुरू आहे..!
देशांतर्गत तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन! सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग, करडई, मोहरी पिकांसाठी पुन्हा मागणी!