Samadhan indu baliram Gaikwad

Samadhan indu baliram Gaikwad

Share

भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश

04/12/2024
02/11/2024

*येत्या दहा-पंधरा वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे, कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोकं थोडे वेगळेच आहेत !*

सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्न- धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे ; आणि तरीही उरलं तर गरीबाला देणारे किंवा दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे! पाहुणे-रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच जेवणारे !

असे लोकं आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत!

ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबरच जाईल!

समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण ह्या जगातून कायमचीच नाहीशी होईल!

त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन,वखवख, असंवेदनशील मनं, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य ; अन् सारं आभासी तथाकथित जीवन!

*कटू आहे पण हेच सत्य आहे!*

(Copy paste)

01/11/2024

आजची पूजा 🙏श्री स्वामी समर्थ...

31/10/2024

Happy Dipawali....

16/11/2023

अकलूजच्या सदूभाऊ चौकात जनसेवा नाश्ता अँड स्नॅक्स नावाचा एक गाडा आहे.तो चालवणारा एक गरजू तरुण म्हणजे माझ्यासोबत आठवी ते दहावी शाळेत असणारा जिवलग मित्र मंगेश फुटाणे....!
त्याला खूप दिवसांनी भेटून आज आनंद झाला...परिस्थिती माणसाला जागायला शिकवते...वर्गात अतिशय शांत आणि गरीब स्वभावाचा मंगेश... दहावीची परीक्षा संपल्यानंतर अचानकपणे घरातील आलेली जबाबदारी समर्थपणे आणि त्याच उत्साहाने आजही पेलतोय....🤝❣️

09/10/2023

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या संघटनात्मक प्रवास दौऱ्यात असताना कोल्हापूर येथे भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा.श्री. मकरंदजी देशपांडे साहेब यांची भेट झाली व विभागाचे काम व संघटनात्मक अनेक गोष्टीवर चर्चा झाली. याप्रसंगी भाजपा ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रदेश संयोजक माननीय श्री.गणेश काका जगताप,प्रदेश सहसंयोजक प्रसादजी कुलकर्णी,पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक हेमंत बापू पाटील,विजयजी संकपाळ,संग्रामसिंह जरग व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune