31/03/2026
📩 निमंत्रण 📩
🚩 श्री हनुमान जयंती निमित्त 🚩
आपणास व आपल्या परिवारास सप्रेम आमंत्रण आहे की,
श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
🔸 कार्यक्रम: हनुमान पूजा, अभिषेक, आरती व महाप्रसाद
🔸 दिनांक: गुरुवार २ एप्रिल २०२६
🔸 स्थळ: दक्षिण मुखी मारुती मंदिर मारुती आळी कोंढवा खुर्द पुणे ४८
🙏 आपल्या उपस्थितीची आम्ही मनापासून अपेक्षा करतो 🙏
आपले नम्र,
कोंढवा खुर्द ग्रामस्त व मारुती आळी
🚩 जय श्रीराम | जय हनुमान 🚩
30/03/2026
तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनचे संचालक, मा. श्री. सुनिलजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपले नेतृत्व आणि कर्तृत्व आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Hadapsar
27/03/2026
कोंढव्यात घुमला प्रभू श्रीरामाचा जयघोष!
आई प्रतिष्ठान आयोजित 'श्री रामनवमी उत्सव २०२६' आणि भव्य प्रभू श्रीराम मूर्ती अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला. कोंढवा खुर्द येथील नरवीर तानाजी मालुसरे चौक येथे जमलेल्या हजारो रामभक्तांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली.
यावर्षीचे विशेष आकर्षण ठरलेले 'Sonicwave Audio' आणि त्या तालावर डोलणारे रामभक्त पाहून खऱ्या अर्थाने भक्तीचा महाकुंभ अनुभवता आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या 'आई प्रतिष्ठान'च्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि उपस्थित राहून शुभाशीर्वाद देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मनापासून आभार मानतो.
प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव असावा!
21/03/2026
ुबारक
आज सकाळी रमजान ईद निमित्त कौसर बाग मज्जिद ठिकाणी भेट देऊन मुस्लिम बांधवाना ईद च्या शुभेच्छा दिल्या..!
Mahadev Babar - महादेव बाबर
08/03/2026
अभिमानास्पद विजय..! 🇮🇳🏆
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम आणि दमदार खेळाचे प्रदर्शन करत विक्रमी 255 धावा उभारल्या आणि न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या दणदणीत कामगिरीने भारताने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात आपला दबदबा सिद्ध केला.
हा विजय केवळ एका सामन्याचा नाही, तर संपूर्ण देशाच्या अभिमानाचा आणि करोडो भारतीयांच्या भावना जिंकणारा क्षण आहे. मैदानावरचा प्रत्येक शॉट, प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट आज भारतीयांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.
संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन..!
भारतीय संघाच्या या अद्वितीय कामगिरीला मनापासून सलाम..!
08/03/2026
रंगपंचमी म्हणजे आनंद, आपुलकी आणि एकतेचे रंग उधळण्याचा सण. आपल्या आयुष्यातही आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचे रंग कायम असेच उधळत राहो.
सर्वांना रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!