Pruthviraj Patil

Pruthviraj Patil

Share

Pruthviraj M.Patil,
Social Worker /
State Committee Member,Nationalist Youth Congress,Maharashtra
State. (© Pruthviraj Patil Official Page)

29/11/2018

1988 साली पवार साहेब राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तेंव्हा देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा 25% होता. तर याच क्षेत्रात एकूण देशाच्या तुलनेत 16% रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या.
1988 साली साहेबांनी या रोजगार निर्मितीला गती दिली.त्यासाठी त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.लहान सहान उद्योगधंद्यांना सवलती दिल्या.परिणामी, 1990 पर्यंतच,म्हणजे 1अवघ्या 2 वर्षातच तब्बल 32,000 लघुउद्योग,तर 1000 मध्यम आणि मोठे उद्योग राज्यात नोंदवले गेले. हा एक विक्रम आहे.

मुंबई,ठाणे आणि पुणे या 3 भागातच राज्याचा औद्योगिक विकास अडकला होता.राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी त्या अडकलेल्या विकासाला राज्यात चोहोबाजूंनी फिरवण गरजेचं होत.साहेबांनी 1988 सालीच, वरील 3 भागाच्या बाहेर,राज्यात इतरत्र औद्योगिक केंद्र निर्माण व्हावीत म्हणून,देशी आणि परदेशी उद्योजकांना "प्रोत्साहनपर पॅकेज" जाहीर केले. मुंबई,ठाणे आणि पुण्यातच गुंतवणूक न होता राज्यात इतरत्र ही गुंतवणूक व्हावी,आणि त्या त्या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी या गावाजवळच उपलब्ध व्हाव्यात हा त्यामागचा मुख्य हेतू होता.

औद्योगिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विदर्भ आणि मराठवाडा या भागात नवीन उद्योग यावेत,हे धोरण साहेबांनी 1988 सालीच निश्चित केलं होत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत विदर्भात,"बुटामोरी" येथे उभारण्यात आली होती.

सोबतच महाराष्ट्र भरातील 165 ठिकाणांची निवड देखील "ग्रोथ सेंटर्स",म्हणून करण्यात आली होती.आणि या ठिकाणांचा वेगवान विकास व्हावा यासाठी त्यावर,"टास्क फोर्स" ची स्थापना साहेबांनी केली होती.वरील 165 पैकी 94 ठिकांनांना नंतर मान्यता देखील दिली गेली होती. त्याचवेळी मुंबईमध्ये समुद्रात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू सापडला होता.त्यामुळे,त्याला पूरक असे वायुवर आधारित उद्योग कोकणात,रायगड जिल्ह्यात उभे रहावेत यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे आग्रह देखील धरला होता.

नवनव्या उद्योगांवर लक्ष ठेवून पवार साहेबांनी,"सेंटर फॉर डेव्हप्लमेंट ऑफ मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स" आणि "एलकंट्रोनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर" स्थापन करण्याची सुरवात देखील पवार साहेबांनीच केली होती.

या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक मोठमोठे देशी परदेशी उद्योग महाराष्ट्रात आले.आणि महाराष्ट्रभरात पसरले देखील. जनरल मोटर्स,प्याजो,स्कोडा,फॉक्सवॅगन,मर्सडीज,जेसीबी, या मोठ्या परदेशी कंपन्या तर महिंद्रा,बजाज सारख्या देशी कंपन्यांनी राज्यभरात आपलं बस्तान बसवलं.

यातून सुटे भाग रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. केवळ पुणे,नाशिक,औरंगाबाद या तीन ठिकाणीच मिळून 60,000 च्या वर कुशल तांत्रिक रोजगार निर्माण झाला.अकुशल आणि अर्धकुशल कामगारांची संख्या तर लाखोंच्या घरात आहे. शिवाय वरील आलेल्या कंपन्यांना अन्य सेवा पुरवणाऱ्या कितीतरी छोटे मोठे व्यावसायिक आणि पुरवठादार निर्माण झाले.त्यांचीही संख्यां हजारोंच्या घरात आहे.

महाराष्ट्राच आजच आधुनिक रूप,हे साहेबांनी पाहिलेल्या देखण्या स्वप्नांवर आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमावर उभं आहे...!

*साहेबगाथा - 07*

22/09/2018

🌺आज सदिच्छा भेट व अभिनंदन🌺

मार्गदर्शक स्नेही मित्र मा.श्री.रोहित दादा पवार यांची
🇮🇳इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्मा या देशातील खासगी साखर कारखाना समूह यांच्या असोसिएशन 🏭 #अध्यक्षपदी निवड व

🌹दादा आपले मनपूर्वक अभिनंदन💐

05/07/2018
Photos from Rajendra Pawar's post 22/06/2018
Photos from Pruthviraj Patil's post 24/03/2018

*📋NEET Exam-2018 च्या Post Graduation प्रवेशा साठी महाराष्ट्रातील MBBS💉 पासआऊट विद्यार्थ्यांना वर होणाऱ्या अन्याची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्या संदर्भात*

👥मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य) व मा.श्री.अजितदादा पवार (विधिमंडळनेते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांची विधानभवन,मुंबई येथे भेट घेऊन विद्यार्थ्यांना च्या वतीने निवेदन देण्यात आले👥

👥 *दोघांच्याही भेटीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वर अन्याय होऊ नये यासाठी वैद्यकीय मंत्री व वैद्यकीय सचिव,महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून एक नवीन कायदा ज्यात महाराष्ट्रातील रहिवाशी असणाऱ्या MBBS पासआऊट विध्यार्थीनां Post Graduation महाराष्ट्रातच करण्यासाठी 50% जागा महाराष्ट्र डोमसाईल साठीच राखीव ठेवण्यात येतील असे सुतोवाच मिळाले📑*

समवेत स्नेही मित्र
डॉ.विश्वजीत यादव (विद्यार्थी प्रतिनिधी-PG प्रवेश अन्यायीत MBBS पासआऊट विद्यार्थी महाराष्ट्र्र),

डॉ.अनिकेत मवाळ (अध्यक्ष-असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नस),

डॉ.प्रशांत मुंढे (विद्यार्थी प्रतिनिधी-डोमसाईल फॉर स्टेट कोटा फॉर स्टेट डोमसाईल),

डॉ.आकाश भांगे,डॉ.चिन्मय अभ्यंकर व डॉ.अमोल बांगर

22/03/2018
Photos from Pruthviraj Patil's post 09/12/2015

दीपावली निमित शुभेछ्या🌺

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
Pune
411001