District Information Office Pune

Directions Website Contact the organization

District Information Office Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from District Information Office Pune, Government Organization, Ground Floor, New Central Building, Behind Sassoon Hospital, Pune.

Page Designed and Published By District Information Office, Pune
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, पुणे चे अधिकृत, अचूक व वस्तुनिष्ठ शासकीय माहिती देणारे फेसबुक पेज - महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे.
- दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे.
- शासकीय जाहिरातीचे वितरण करणे.
- राज्य शासन त्याचबरोबर पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे.
- राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.

सेवा संकल्प अभियान-आरोग्य शिबिर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत डोणजे यांच्या वतीने आरोग्य...
05/10/2026

सेवा संकल्प अभियान-आरोग्य शिबिर
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत डोणजे यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, खानापूर आणि ग्रामपंचायत डोणजे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवित ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे पुढे नेण्यात येत आहे.

#सेवा_संकल्प_अभियान #सेवा_संकल्प #आरोग्य_शिबिर #आरोग्यसेवा #ग्रामपंचायत_डोणजे #खानापूर #नागरिक_सेवा #जनसेवा

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत सासवड नगर परिषदेचा विविधांगी उपक्रमांना वेगस्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृतीस...
04/10/2026

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत सासवड नगर परिषदेचा विविधांगी उपक्रमांना वेग

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृतीसह नागरिकाभिमुख सेवा देण्यावर भर

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ तसेच १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सासवड नगर परिषदेच्या वतीने शहरात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृती आणि नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न ठेवता नागरिकाभिमुख सेवा तातडीने व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यावरही नगर परिषदेने भर देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली.

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि लोकसेवा यांचा समन्वय साधत ‘स्वच्छ, सुंदर, हरित आणि सक्षम सासवड’ घडविण्याच्या दिशेने सासवड नगर परिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मालमत्ता हस्तांतरण, नवीन नळ जोडणी, जन्म-मृत्यू नोंद प्रमाणपत्र, कर आकारणी, बांधकाम परवाना, झोन दाखला, बचत गट नोंदणी, ना-हरकत प्रमाणपत्र, ८-अ उतारा आदी विविध दाखले व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अभियानाच्या अनुषंगाने शहरातील ६ महत्त्वाच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ व सुंदर सासवडच्या संकल्पनेला बळ देत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत ग्रामीण रुग्णालय, सासवड यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ शहराच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला या उपक्रमातून विशेष प्राधान्य देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची भावना आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न या अभियानांतर्गत करण्यात आला.

याशिवाय सासवड शहरातील बाजारपेठ परिसर आणि व्यापाऱ्यांमध्ये ‘प्लास्टिकमुक्ती अभियान’ राबविण्यात आले. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन नागरिक व व्यापाऱ्यांना करण्यात आले. कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंगबाबत जनजागृती आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याबरोबरच घरच्या घरी कंपोस्टिंग करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले, असेही श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

#सेवा_संकल्प_अभियान #स्वच्छता_ही_सेवा_2026 #सासवड #स्वच्छसासवड #सुंदरसासवड #हरितसासवड #स्वच्छता #पर्यावरणसंवर्धन #प्लास्टिकमुक्ती #कचराव्यवस्थापन #वृक्षारोपण #नागरिकाभिमुखसेवा

महिला आरोग्य, स्वच्छता, रक्तक्षय व पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्नसेवा संकल्प अभियानांतर्गत सेवा दवाखाना, कुरकुं...
04/10/2026

महिला आरोग्य, स्वच्छता, रक्तक्षय व पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, रक्तक्षय व पोषण या विषयांवर जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी सेवा संकल्प योजनेची माहिती देत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

डॉ. ओंकार शेलारे यांनी रक्तक्षय व पोषण या विषयावर सविस्तर माहिती देताना संतुलित आहाराचे महत्त्व, शरीरासाठी आवश्यक विविध पोषक घटक, रक्तक्षयाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच नियमित रक्त तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले.

तसेच वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील स्वच्छता आणि रक्तक्षय याबाबत सोप्या व प्रभावी पद्धतीने जनजागृती करण्यात आली. यासाठी विविध माहितीपूर्ण पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्या माध्यमातून उपस्थित महिलांना दैनंदिन आरोग्यविषयक बाबी अधिक सहजपणे समजून घेता आल्या.

दवाखाना कर्मचाऱ्यांनी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रत्यक्ष नमुने आकर्षक व माहितीपूर्ण पद्धतीने मांडून शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनातून पौष्टिक व संतुलित आहाराची निवड, आवश्यक पोषक घटकांचे महत्त्व तसेच टाळावयाचे अथवा मर्यादित प्रमाणात सेवन करावयाचे पदार्थ याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच “सुदृढ महिला, निरोगी कुटुंब” या संकल्पनेला बळ देणारा व माहितीपूर्ण मार्गदर्शन, दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर आणि पौष्टिक आहाराच्या प्रत्यक्ष प्रदर्शनामुळे कार्यक्रम विशेष उपयुक्त असल्याचे महिलांनी सांगितले.

यावेळी डॉ. जमादार यांनी १३ ऑक्टोबर रोजी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व १५ ऑक्टोबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

#सेवा_संकल्प_अभियान #महिलाआरोग्य #रक्तक्षय #पोषण #वैयक्तिकस्वच्छता #मासिकपाळीस्वच्छता #सुदृढमहिलानिरोगीकुटुंब #आरोग्यजनजागृती #रक्तदान #वृक्षारोपण #कुरकुंभ

‘व्यसनमुक्त समाज – निरोगी समाज’चा संदेश देत कुरकुंभ येथे व्यसनमुक्ती जनजागृती‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वैद्यकीय प्रशा...
04/10/2026

‘व्यसनमुक्त समाज – निरोगी समाज’चा संदेश देत कुरकुंभ येथे व्यसनमुक्ती जनजागृती

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे व्यसनमुक्ती जनजागृती व नशामुक्त जीवनशैली या विषयावर प्रभावी जनजागृती कार्यक्रमातून ‘व्यसनमुक्त समाज – निरोगी समाज’चा संदेश देण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी उपस्थितांना आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा, व्यसनाचा परिणाम केवळ व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर होत नाही, तर त्याचा दूरगामी परिणाम कुटुंब, समाज आणि विशेषतः मुलांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

“आपण केवळ आपल्या आरोग्याची काळजी न घेता आपल्या कुटुंबाची आणि सभोवतालच्या समाजाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती समाजाचा अविभाज्य भाग असून आपल्या सवयी व कृतींचा परिणाम इतरांवरही होत असतो,” असे डॉ. जमादार यांनी नमूद करून डॉ. जमादार यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली. व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासोबतच कुटुंबीय व समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी फार्मासिस्ट ऋषिकेश कोलसे यांनी व्यसनाचे विविध प्रकार, व्यसनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम तसेच व्यसनमुक्त आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. व्यसनापासून दूर राहणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून निरोगी समाजनिर्मितीसाठी आवश्यक असलेली सामाजिक बांधिलकी आहे, हा संदेश यावेळी देण्यात आला.

व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती आणि नशामुक्त जीवनशैली यासंदर्भातील विविध पोस्टर्स व माहितीपर चार्ट्स तयार करून प्रदर्शनातून उपस्थितांना व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने देण्यात आली. कार्यक्रमास वैद्यकीय प्रशासन अधिकारी, विमाधारक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#सेवा_संकल्प_अभियान #व्यसनमुक्ती #नशामुक्तजीवन #व्यसनमुक्तसमाज #निरोगीसमाज #आरोग्यजनजागृती #कुरकुंभ

03/10/2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत दौंड तालुक्यातील सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे नागरिकांना संतुलित आहाराचे महत्त्व विशद करण्यात आले.

#सेवा_संकल्प_अभियान #लोकसहभाग #ग्रामविकास

‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहातवैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या अ...
03/10/2026

‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात

वैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या अंतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी “अवयवदान हे केवळ दान नसून, एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची अमूल्य संधी आहे,” समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी औषध निर्माता अजिंक्य देसाई यांनी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणारे जीवनदान आणि समाजामध्ये अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. अवयवदानाबाबत समाजात असलेल्या विविध गैरसमजुती दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानाची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे जीवनदान याविषयी विविध माहितीपूर्ण पोस्टर्स तयार करून प्रदर्शनीद्वारे माहिती देण्यात आली. या माध्यमातून उपस्थितांना अवयवदानाबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

अधिकारी, कर्मचारी आणि विमाधारकांचा कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अवयवदानाविषयी जनजागृती करताना “अवयवदान – जीवनदान” हा मानवतावादी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

हा उपक्रम वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. रंगदळ, डॉ. तनुजा गवार्ले, डॉ. शुभम मोहोळकर तसेच सेवा दवाखाना, कुरकुंभचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

#सेवा_संकल्प_अभियान #अवयवदान #जीवनदान #अवयवदान_जनजागृती #कुरकुंभ #मानवतावादी_उपक्रम

‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा संदेश; गांधी जयंतीनिमित्त दौंडमध्ये स्वच्छता अभियानराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या ...
03/10/2026

‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा संदेश; गांधी जयंतीनिमित्त दौंडमध्ये स्वच्छता अभियान

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांना कृतीची जोड देत गांधी जयंतीनिमित्त दौंड शहरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत मंडई ते गांधी चौक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.

या उपक्रमात दौंड नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ दौंड, धन निरंकारी सेवा संस्था आणि संस्कार स्कूल यांनी सहभाग घेतला. नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कामगारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यासाठी योगदान दिले.

गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या अभियानातून ‘स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे’, हा प्रभावी संदेश देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास स्वच्छ व सुंदर दौंडची संकल्पना अधिक प्रभावीपणे साकार होऊ शकते, यावर यावेळी भर देण्यात आला.

केवळ स्वच्छता मोहीम राबविण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणांविषयी जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, यासाठी ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येकाने स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

गांधी जयंतीसोबतच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी दौंडच्या निर्मितीसाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

#सेवा_संकल्प_अभियान #माझे_शहर_माझी_जबाबदारी #गांधी_जयंती #स्वच्छता_अभियान #स्वच्छ_दौंड #स्वच्छ_महाराष्ट्र

एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणारनोटीसधारक मतदारांना दिलासा; मतदार यादीत...
02/10/2026

एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार

नोटीसधारक मतदारांना दिलासा; मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्तीची पुन्हा संधी

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती तसेच हरकती नोंदविण्याची पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

मतदार यादीतील नोंदीमध्ये तार्किक विसंगती आढळून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीसाठी तहसील कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी (ईआरओ) किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (एईआरओ) कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. बीएलओ घरी भेट देऊन कागदपत्रे स्वीकारतील. उपलब्ध सुविधेनुसार व्हॉट्सअॅप किंवा ऑनलाइन माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. संबंधित विसंगतीच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रे, बीएलओचा अहवाल किंवा पंचनामा याआधारे प्रकरणाची कार्यवाही करण्यात येईल. कागदपत्रे अपूर्ण असल्यास आवश्यकतेनुसार अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन सुनावणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे
वाढीव कालावधीत कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये संबंधित बीएलओ उपस्थित राहतील. प्रारूप मतदार यादीत नावाची पडताळणी, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना ८ तसेच नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

ऑनलाइन सुविधेचाही लाभ घ्यावा
प्रारूप मतदार यादीतील आपले नाव शोधणे, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरणे तसेच मतदार यादीतील माहितीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना ८ ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘वोटर हेल्पलाइन’ अॅपचा वापर करता येईल. एसआयआर कार्यक्रम, नोटीस, मतदार नोंदणी तसेच विशेष शिबिरांबाबत अधिक माहितीसाठी १९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने आणि विविध संस्थांमधील पात्र नागरिकांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मतदार जागृती व विशेष नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी घाबरून तहसील कार्यालयात गर्दी न करता संबंधित बीएलओशी संपर्क साधावा. विशेष शिबिरे तसेच ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

#मतदारयादी #मतदारनोंदणी #मतदारजागृती

02/10/2026

जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या उपक्रमाच्या माध्यमातून कायापालट. उपचारांच्या आधुनिक सुविधा, स्वच्छ व प्रसन्न वातावरणात सर्वोत्तम सेवा.

Address

Ground Floor, New Central Building, Behind Sassoon Hospital
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to District Information Office Pune:

Shortcuts

Share