03/11/2018
पाटसला जलसंधारणातून ‘गावतळे पाणीदार’
पाटसला जलसंधारणातून ‘गावतळे पाणीदार’ | vsabha
पाटसला जलसंधारणातून ‘गावतळे पाणीदार’ Posted on November 3, 2018 at 2:04 pm by admin / Breaking News, बातम्या2 / 0 पुणे , पावसाने अवकृपा केल्याने राज्यात .....
29/08/2018
youtube चॅनेल व न्युज पोर्टल सध्या असंख्य होत आहेत. रोज एक चॅनेल आणि वेबपोर्टलच्या लिंक पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी पत्रकारांची कमतरता भासत आहे. जाहिरातीद्वारे काम करण्याची संधी दिली जात आहे. मात्र मानधन अथवा पगार देण्यास ते सक्षम नाहीत. जाहिराती गोळा करून कमिशन मिळावा किंवा काम पाहून पगार दिला जाईल असे सांगितले जात आहे. मात्र आमच्या वेबपोर्टल साठी पत्रकार नको आहेत . म्हणजे पगार अथवा मानधनावर काम करणारे नकोत . आपला स्वतःचा व्यवसाय करणारे हवे आहेत. मालक हवे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या वेबपोर्टलच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक विधानसभेसाठी वेबपोर्टल चालवण्यासाठी मालक संपादक हवे आहेत.
www.vsabha.com
अधिक माहिती साठी.
7709906623
[email protected]
vsabha | vidhansabha matadar sangh
25/08/2018
पत्रकारिता हे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे एक महत्वाचे साधन आहे त्याच बरोबर प्रसिद्धीचे एक महत्वाचे माध्यम आहे. विसभा डॉट कॉम हा ऑनलाईन न्युज वेबपोर्टल आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे व यशस्वी लोकांना समाजासमोर आणण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत .
प्रत्येक महसुली गावात पत्रकार नेमून महाराष्ट्रात 1 नंबर ऑनलाईन वेबपोर्टल करण्यासाठी आमचे उद्दिष्ट्य आहे.
याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सर्व व्हाट्सअप्प नंबर आमच्या प्रतिनिधी ना देणार आहोत. जेणेकरून प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा व्हाट्स अँप ग्रुप असेल व त्यावर आम्ही न्युज प्रसारित करू.
आपणास जर आमच्या सोबत पत्रकार म्हणून काम करायचे असेल तर आजच संपर्क करा. अधिकृत प्रेस कार्ड आपणास दिले जाईल. पत्रकारिता बातम्या व लिखाण कसे करावे याचे प्रशिक्षण आमच्याकडून दिले जाईल.त्यासाठी आपणास मानधन हि मिळेल
आजच सहभागी व्हा.
अधिक माहिती साठी.
7709906623
काही शंका असल्यास
व्हाट्स अँप वर संपर्क साधण्यासाठी
7709906623
www.vsabha.com
Mail
[email protected]
vsabha | vidhansabha matadar sangh
16/12/2015
कुसेगावमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची चाचणी
वासुंदे : कुसेगाव (ता. दौंड) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची नुकतीच चाचणी घेण्यात आली. या योजनेसाठी वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून पाईपलाईनने पाणी आणले जाणार आहे. या चाचणीच्या वेळी पूर्ण दाबाने पाणी गावातील टाकीत पोहोचल्याने गावाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावाला भेडसावणार्या पाण्याचा प्रश्नातून तात्पुरत्या स्वरूपात दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, वरवंड तलावातून पाईपलाईनद्वारे आलेल्या पाण्याचे पूजन येथील ग्रामस्थांनी केले. या वेळी कुसेगावचे सरपंच मनोज फडतरे, उपसरपंच कुंडलिक खोमणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रमेश भोसले, दादासाहेब शितोळे, दिलीप शितोळे, विजयराव शितोळे, मानसिंग शितोळे, अंकुश भोसले, दादा सोनवणे, राजू मोरे, नाना गायकवाड, भानुदास सोनवणे, राजू खंडाळे, शरद भोसले, जितेंद्र शितोळे, प्रमोद शितोळे, गणेश शितोळे तसेच ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होता.
गावाच्या भानोबा यात्रेच्या तोंडावर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईवर या पाणीपुरवठा योजनेतून आलेल्या पाण्याने दिलासा मिळणार असला, तरीसुद्धा सदरचे पाणी पिण्यास योग्य नसल्याने ग्रामस्थांनी या पाण्याचा पिण्यासाठी वापर करून नये, असे आवाहन सरपंच मनोज फडतरे यांनी केले आहे.
16/12/2015
पिलाणवाडीत आढळली बिबट्याची दोन पिल्ले
पाटेठाण : पिलाणवाडी (ता. दौंड) येथील एका शेतकर्यांच्या उसाच्या फडात सोमवार (दि. १४) रोजी ऊसतोडणी चालू असताना बिबट्याचे बछडे दिसून आले. यामुळे ऊसतोड कामगार, मजूर महिलांसह स्थानिक शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिलाणवाडी येथील शेतकरी रोहीदास झरांडे यांच्या उसाच्या शेतात तोडणी चालू आहे. सोमवारी दुपारच्या सुमाराला ऊसतोडणी करत असताना मजुरांना उसाच्या पाचटावर बिबट्याचे दोन बछडे नजरेस पडली.
ही बातमी मजुरांनी तत्काळ शेतकरी झरांडे यांना सांगितली. त्यांनी व पोलिस पाटील लक्ष्मण कदम यांनी लगेचच वन विभागाकडे संपर्क साधून याबाबत माहिती दिल्यानंतर वन परिमंडल अधिकारी येळे, वनरक्षक विकास वाघमारे, कर्मचारी सुरेश पवार, विलास होले घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दी व भीतीने दोन्ही बछडे उसात आसरा घेऊन बसली आहे.
यापूर्वी या परिसरात अनेकदा बिबट्यासदृश प्राणी नजरेस पडल्याने वन विभागाकडून या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. परंतु अद्यापही हा वन्य प्राणी पिंर्जयाआड करण्यात वन विभागाला यश आले नाही.
06/12/2015
ट्रॅक्टर ट्रॉली व नांगर चोरणारी पाच जणांची टोळी जेरबंद
■ आभिषेक ऊर्फ आबा संतोष दोरगे (वय ३0 वर्षे, रा. पिंपळाची वाडी, यवत, ता. दौंड) भानुदास गोविंद थोरात (वय ३0 वर्षे, रा. खुटबाव, ता. दौंड), दीपक संपत घिगे (वय २४ वर्षे, रा.दुधाणे चौक, यवत, ता. दौंड) रविराज ऊर्फ आण्णा चंद्रकांत वाबळे (वय २२ वर्षे, रा. यवत स्टेशन, ता. दौंड) व परमेश्वर बालाजी शिंदे (वय २३ वर्षे, रा. कासुर्डी, ता. दौंड) या पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. लोणी काळभोर : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या ट्रॉली व नांगर चोरणार्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, हवालदार बाळासाहेब सकाटे, व्ही. डी. मुत्तेमवार, महेश गायकवाड, संदीप सपकाळ, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, पेंदाम व वाघ या पोलीस पथकाला खबर्यामार्फत माहिती मिळाली होती.
त्या नुसार या पोलीस पथकाने पाचही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या कडे चौकशी केली असता श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काष्टी, श्रीगोंदा, व अहमदनगर येथील चोरलेल्या दोन , यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाथाचीवाडी, खुटबाव, पाटस, वरवंड व डाळींब या ठिकाणी चोरलेल्या ट्रॉली व एक नांगर, लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलवडी व लोणी कंद येथे चोरलेल्या दोन ट्रॉली व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळेकर वाडी येथे चोरलेली एक ट्रॉली असा ट्रॅक्टरच्या नऊ ट्रॉली व एक नांगर असा तब्बल आठ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील पाचही जणांनी या नऊ ट्रॉली व एक नांगर दौंड तालुक्यातील दहिटणे, टेळेवाडी, कासुर्डी येथे व पुरंदर तालुक्यातील झेंडे वाडी, बोपगाव येथे तसेच हवेली तालुक्यातील केसनंद, शिंदवणे येथे अतिशय कमी किमतीत विकले होते. पोलीस पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राम जाधव यांनी सांगितली. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
06/12/2015
तर मुख्याधिकारीही ठेकेदारीनेच आणावा
दौंड : दौंड नगर परिषद सर्वच कामे ठेकेदारी पद्धतीने देणार असेल, तर मुख्याधिकारीदेखील ठेकेदारी पद्धतीने आणावा लागेल, असा थेट आरोप नगरसेवक अनिल साळवे यांनी आज दौंड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. आरोप-प्रत्यारोप आणि मुख्य रस्त्यावरून गदारोळ होत परस्परांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
गरमागरम वातावरणात दौंड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झाली. सर्वच आपापसांत वाटून घेतात, असे वक्तव्य नगरसेवक गुरुमुख नारंग यांनी केल्यानंतर, एकच गदारोळ झाला. दरम्यान, कोण कोण आपसांत वाटून घेतात त्यांची नावे जोपर्यंत नारंग सांगत नाहीत, तोपर्यंत सभेचे कामकाज पुढे सुरू राहणार नाही, या मतावर नगरसेवक राजू बारवकर ठाम होते. दरम्यान, नगरसेवक गुरुमुख नारंग आणि नगरसेवक नंदू पवार या दोघांनीही सभात्याग केला. विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक ५ अंतर्गत जलशुद्धीकरण चालविण्याचे काम ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. यावर अनिल साळवे म्हणाले, सर्वच काही ठेकेदार पद्धतीने देणार असेल, तर नगर परिषदेचे कर्मचारी नेमके करतील काय? आणि त्यांना काम राहणार तरी काय? भविष्यात मुख्याधिकारीदेखील ठेकेदारी पद्धतीने ठेवावा लागेल, असे अनिल साळवे म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
हिंद टॉकीज समोरील मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे कामकाज सुरू आहे. या रस्त्यातून काळीमाती काढावी लागली, त्याऐवजी मुरुमाची भर टाकण्यात आली आहे. परिणामी या रस्त्याचे वाढीव अंदाजपत्रक करण्यात आले असून, त्यामुळे संबंधित ठेकेदाराला वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे, असा प्रस्ताव पुढे येताच नगरसेवक गुरुमुख नारंग म्हणाले की, सदरचे अंदाजपत्रक सदोष असून, यामुळे नगर परिषदेचे नुकसान होणार आहे. तेव्हा अंदाजपत्रक तयार करणार्या अधिकार्याची चौकशी झाली पाहिजे. तसेच, या रस्त्यावर काळीमाती जर निघाली असेल, तर मी आज माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर राजू बारवकर म्हणाले, कोण आपापसांत वाटून घेतं याचे नावे सांगा, जर यात तथ्य निघाले तर मी तुमच्या पाठीशी राहीन, मात्र सर्वच आपापसांत वाटून घेतात, असा आरोप करून तुम्ही सभाभंग केला आहे, असे बारवकर म्हणाले. त्यावरून नारंग आणि बारवकर यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर नारंग म्हणाले की, जर मी चुकून काही बोललो असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो.
नगरसेवक बबन सरनोत, नगरसेवक जब्बार शेख, नगरसेवक प्रमोद देशमुख यांनीदेखील सभेच्या कामकाजात झालेल्या चर्चेत भाग घेतला. एकंदरीतच शहराच्या विकासासाठी योग्य ते नियोजन केले जात असून, याकामी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया यांनी सांगितले, तर मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
20/09/2015
सुवर्णसंधी
साप्ताहिकांच्या मालक अथवा संपादकांनासाठी सुवर्णसंधी
आपले प्रत्येक आठवड्याचे अंक आम्ही प्रसिध्द करू अथवा आपल्या संकेतस्थळाची लिंक प्रसिध्द करू
आपले अंक [email protected] मध्ये मेल करा
अथवा संपर्क .7709906623
31/07/2015
या परिसरातील आपल्या व्यवसायाची माहित द्या आणि आपला व्यवसाय वाढवा.
http://daund.vsabha.com/search_cpt/
Search Form | Daund
13/07/2015
दौंड तालुक्याचा बुलंद आवाज राष्ट्रवादी कॉग्रेस चे युवा नेते मा.श्री.राजाभाऊ तांबे दौंड तालुक्यात वारकर्यांचे स्वागत केले तो क्षण
29/06/2015
खामगाव येथील दुकानदाराने केले ज्येष्ठाचे पाच हजार परत
यवत - खामगाव (ता. दौंड) येथील किराणा दुकानदार विठ्ठल बर्वे यांनी दुकानात विसरलेले पाच हजार रघुनाथ बहिरट (वय 75) या ज्येष्ठास परत केले.
खामगाव येथील गाडीमोडी चौकात विठ्ठल बर्वे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात साहित्य घेऊन गेलेल्या रघुनाथ बहिरट या ज्येष्ठाचे पाच हजार रुपये असलेले पाकीट दुकानाच्या काउंटरवर राहिले. त्या वेळी ते लक्षात आले नाही. बहिरट तेथून निघूनही गेले. काही वेळाने काउंटरवर कोणाचे तरी पाकीट विसरले आहे, हे बर्वे यांच्या लक्षात आले. त्यांनी ते पाकीट उघडून पाहिले असता त्यात पाच हजार रुपये, त्या ज्येष्ठाचा फोटो व फोन क्रमांक असलेली डायरी मिळाली. त्यावरून बर्वे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना दुकानात बोलावून घेतले. पाकीट त्यांचीच असल्याची खात्री करून त्यांना ते परत केले. बर्वे यांच्या प्रामाणिकपणामुळे रघुनाथ बहिरट सद्गदित झाले होते.
21/06/2015
एक विशिष्ठ भूमिकेतून आम्ही हे संकेत-स्थळ निर्माण केले आहे. मागील काळात घडलेल्या काही घटना,आंदोलनांनी समाजाची राजकारणाकडे पाहण्याची भावना बदली आहे.ती बदल्यांच्या दृष्टीनेआपल्या लोकप्रतिनिधींची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचावी राजकारणाचे विविध पैलू,राजकारण्यासाठी एक व्यासपीठ आणि मतदारांनी मतदान करण्याच्या उद्देशाने ह्यासंकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली असून राजकारणाचे पाया असणारया सामान्य जनता,विविध पक्ष,प्रतिनिधी आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करून या संकेतस्थळाची बांधणी करण्यात आली आहे.या संकेतस्थळावर सर्व पक्ष संघटना, नेते आणि लोकप्रतिनिधींची माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून….यातून सामान्य जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्यास मदत होईल.मतदान वाढण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.तसेच माहितीचा अधिकार, जनलोकपाल विधेयक,दैनदिन राजकीय घडामोडींची माहिती देखील आपणास या संकेत-स्थळावर मिळेल.लोकप्रतिनिधी यावर आपली सर्व माहिती,कार्यक्रम,जाहीरनामा देऊ शकतील तसेच निवडणुकीच्या दृष्टीने आवशक सर्व माहिती, विविध प्रकारचे फॉर्म्स,आचारसंहिता विषयक माहिती, मागील निवडणुकींचा आढावा देखील लोक-प्रतिनिधीना उपयुक्त ठरेल.
श्रीनाथ प्रकाशन,
शॉप न.२, सहारा प्रेस्टीज ; भेकराई नगर; फुरसुंगी- ४१२३०८ यावर पाठवू शकता.
mo-7709906623