09/01/2020
नागपूर, ता. ६: - नागपूर शहरातील रस्त्यांवरील होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेता, शहरातील खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची व्यवस्था शहराबाहेर करणेबाबतचे धोरण निश्चित करण्यास्तव महापौर संदीप जोशी यांनी माजी महापौर प्रविण दटके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केलेली आहे. नागपूर शहरातील खाजगी बस व्यवस्था ही नागपूर शहरातील नागरिकांच्या सोयी/सुविधांशी निगडीत असल्याने हि व्यवस्था शहराबाहेर करणेबाबत नागरिकांचे मत, सुझाव, उपाययोजना मागविण्यात येत आहे. जेणेकरुन प्राप्त सुचनांची दखल घेवून नागपूर शहराकरीता उक्त प्रस्तावित धोरण योग्यरित्या निश्चित करता येईल. यासंबंधी नागरिक आपले लेखी मत खालील ठिकाणी दिनांक ७/०१/२०२० ते १३/०१/२०२० या दरम्यान सादर करु शकतात.
१) कार्यकारी अभियंता (वाहतुक), सिव्हील कार्यालय, म.न.पा.नागपूर
२) सहा.आयुक्त, म.न.पा.झोनल कार्यालय, झोन क्र.१ ते १० मनपा, नागपूर
३) वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतुक परिमंडळ १ ते १० नागपूर शहर
४) नागरीक आपले ऑनलाईन मत महानगरपालिकेच्या वेबसाईट www.nmcnagpur.gov.in वर क्लीक करुन "खाजगी बस सेवा शहराबाहेर करण्याबाबत मत नोंदणी" या Link वर नोंदवू शकतात. असे अपर आयुक्त राम जोशी यांनी सूचीत केले आहे.
:: Nagpur Municipal Corporation | नागपूर महानगरपालिका कार्यशाळा आणि नागपूरमधील एनएमसी अधिकाऱ्यांसह भागधारकांच्या असंख्य सल्लागारांमुळे नागपूरचा दृष्टीकोन पुढीलप.....

08/08/2018
09/11/2017
31/03/2017
21/01/2017