Pune Metropolitan Region Development Authority

Call Directions Website Contact the organization

Pune Metropolitan Region Development Authority The Planning and Development Authority for the Pune Metropolitan Region. The promise of win-win for the investors as well as the region is undeniable.

Over the last three decades, Pune city has developed as one of the prominent urban agglomerates. It is reckoned as an educational centre providing skilled manpower & talent to several industries/sectors, transcending the boundaries of the states and the country. Consequently, it has rapidly grown into a contemporary industrial hub and is identified today as a growing metropolis with tremendous potential. This evolution has positioned Pune Region as a major growth centre and an attractive investment destination. The region enjoys a magnetic pull for multinational companies around the globe to set shop & expand existing businesses in-keeping with the promising future.

📍 हिंजवडी फेज-२, पुणेपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी मा...
02/09/2026

📍 हिंजवडी फेज-२, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन-३ च्या PMR -5 स्थानकाच्या कामाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि प्रगतीचा संपूर्ण आढावा घेतला.

दररोज प्रवास करणारे आयटीयन्स आणि नागरिकांची संभाव्य गर्दी तसेच प्रवाशांची संख्या गृहीत धरून, या पाहणीदरम्यान प्रामुख्याने पुढील बाबींची तपासणी करण्यात आली.

✅ प्रवाशांसाठी सुविधा आणि अद्ययावत तिकीट प्रणाली
✅ आयटीयन्सना कंपन्यांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी सक्षम ‘फिडर लास्ट-माईल सेवा’
✅ प्रवाशांसाठी आधुनिक आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा

या प्रकल्पाचे काम प्रवाशांच्या सुविधा आणि सुलभतेच्या दृष्टीने अधिक दर्जेदारपणे पूर्ण करण्यासाठी ‘पीआयटीसीएमआरएल’ (PITCMRL)ला महत्त्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प विभाग) रिनाज पठाण, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमान भोसले, तसेच पीएमआरडीए, टाटा प्रोजेक्ट्सचे वरिष्ठ अधिकारी आणि इंडिपेंडंट इंजिनिअर्स उपस्थित होते.



(Urban Mobility, Smart City Pune, Public Transport)

📢 E-Tender Noticeपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्स, फ्लेक्स बोर्ड आणि जाहि...
02/09/2026

📢 E-Tender Notice

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्स, फ्लेक्स बोर्ड आणि जाहिरात फलक हटवणे, तसेच जमा झालेल्या स्क्रॅप मालाची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदारांची एम्पॅनलमेंट (Empanelment) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महत्त्वाचा तपशील:
🔹 निविदा सूचना: E-Tender Notice No.02 (FY 2026-27, 2nd call)
🔹 अर्ज डाऊनलोड सुरू: ३१ ऑगस्ट २०२६ (दुपारी ३.०० वाजेपासून)
🔹 अंतिम मुदत: ०७ सप्टेंबर २०२६ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
🔹 वेबसाइट: www.mahatenders.gov.in
📧 संपर्क / ईमेल: [email protected]

इच्छुक व पात्र कंत्राटदारांनी मुदतीत आपल्या निविदा सादर कराव्यात.

02/09/2026

📍 मोशी, पुणे | PIECC

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत ९४.८७ हेक्टर जागेवर साकारत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) प्रकल्पाची महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

🔹 आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकासासाठी आवश्यक कार्यवाहीला गती
🔹 VIP लाउंज, स्वच्छतागृहे व आगामी IMTMA प्रदर्शनस्थळाची पाहणी
🔹 देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना
🔹 नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्याचे आदेश

🚀 पुण्याच्या विकासाला नवी दिशा… आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे नवे केंद्र!

📍 पीआयईसीसी (मोशी), पुणेपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत ९४.८७ हेक्टर जागेवर आकार घेत असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास...
01/09/2026

📍 पीआयईसीसी (मोशी), पुणे

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत ९४.८७ हेक्टर जागेवर आकार घेत असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ (PIECC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

🔹 आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने तातडीची पावले उचलली असून, त्या दृष्टीने महानगर आयुक्तांनी ‘लँड मॉनिटायझेशन सेल’ला पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

🔹 व्हीआयपी लाउंज, स्वच्छतागृहे तसेच आगामी ‘Indian Machine Tool Manufacturers’ Association’ (IMTMA)च्या प्रदर्शनस्थळाची पाहणी करून उर्वरित देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महानगर आयुक्तांनी दिल्या. तसेच, नागरिकांच्या व उपस्थितांच्या सुरक्षेसाठी तातडीने अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्याचे आदेश दिले.

या पाहणीदरम्यान ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, उपायुक्त (जमीन व मालमत्ता) हिम्मत खराडे, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमान भोसले, उपअभियंता शंकर कोळेकर आणि ‘लँड मॉनिटायझेशन सेल’चे सल्लागार उपस्थित होते.



(Infrastructure, Maharashtra, Convention Center, Exhibition Center)

📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणेपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘सं...
01/09/2026

📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘संरचना योजने’च्या (स्ट्रक्चरल प्लॅन) अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आज, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद, एमआयडीसी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔹 संरचना योजनेत अचूक माहितीचा समावेश करता यावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपली सविस्तर माहिती आणि भविष्यातील नियोजन येत्या आठ दिवसांच्या आत ‘पीएमआरडीए’च्या नियोजन विभागाकडे सादर करावे, अशा स्पष्ट सूचना महानगर आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिल्या.

🔸 या बैठकीत स्ट्रक्चरल प्लॅनच्या रूपरेषेवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. तसेच, विविध विभागांमधील परस्पर समन्वय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. सर्व विभागप्रमुखांनी मांडलेल्या सूचना आणि माहिती ऐकून घेतल्यानंतर महानगर आयुक्तांनी नियोजन विभागाला त्यानुषंगाने आवश्यक ते बदल करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

🏙️ सदर संरचना योजना ‘पीएमआरडीए’ क्षेत्राच्या शाश्वत आणि सुनियोजित विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, सर्व शासकीय संस्थांच्या एकत्रित समन्वयातून ही योजना अधिक परिपूर्ण करण्यावर ‘पीएमआरडीए’चा भर आहे.



(Urban Development, Government Of Maharashtra, Maharashtra, पुणे, पीएमआरडीए, विकासकामे)

🗺️ PMRDA GIS पोर्टल — नियोजनाची माहिती, आता एका क्लिकवर!पुणे महानगर प्रदेशातील विविध GIS Layers च्या माध्यमातून नागरिकां...
31/08/2026

🗺️ PMRDA GIS पोर्टल — नियोजनाची माहिती, आता एका क्लिकवर!

पुणे महानगर प्रदेशातील विविध GIS Layers च्या माध्यमातून नागरिकांना नियोजन व विकासाशी संबंधित महत्त्वाची माहिती अधिक सुलभतेने पाहता येणार आहे.

प्रादेशिक योजना, गाव व प्रशासकीय सीमा, रस्ते, मेट्रो व रेल्वे मार्ग, TOD झोन, संरक्षण क्षेत्र, पूररेषा आणि इतर नियोजनविषयक माहिती आता GIS आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध! 🌐

🔎 नकाशावर माहिती शोधा • नियोजन समजून घ्या • नागरिकाभिमुख सेवेचा लाभ घ्या

👉 अधिक माहितीसाठी भेट द्या: gis.pmrda.gov.in

28/08/2026

From a thriving city to a global investment destination. 🌍📈

How will PMRDA's Growth Hub Plan position the Pune Metropolitan Region on the global investment map?

Watch PMRDA Metropolitan Commissioner, Dr. Abhijeet Chaudhari (IAS), share the vision behind creating world-class growth hubs that will attract investments, generate employment, and drive sustainable economic growth.

🧑‍🚒🎀 सुरक्षेच्या रक्षकांना कृतज्ञतेची राखी! 🎀🧑‍🚒पीएमआरडीए (PMRDA) अग्निशामक दलाच्या मारुंजी, नांदेड सिटी आणि वाघोली या त...
28/08/2026

🧑‍🚒🎀 सुरक्षेच्या रक्षकांना कृतज्ञतेची राखी! 🎀🧑‍🚒

पीएमआरडीए (PMRDA) अग्निशामक दलाच्या मारुंजी, नांदेड सिटी आणि वाघोली या तिन्ही फायर स्टेशनवर आज रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आपल्या प्राणाची बाजी लावून जनतेचे रक्षण करणाऱ्या अग्निशामक जवानांना मानाची राखी बांधण्यासाठी INNOVATIVE WORLD SCHOOL (किवळे), Snuggles World Preschool And Daycare आणि C.P. Goenka school wagholi मधील लहानग्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तसेच, मलबार गोल्ड अँड डायमंड्स (फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर) येथील महिला कर्मचाऱ्यांनीही जवानांना राखी बांधून त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.

जनतेच्या रक्षकांचे आभार मानणारा हा अनोखा सोहळा सर्वांच्याच मनात घर करून गेला!

नात्यांचा गोडवा, प्रेमाची ऊब आणि आठवणींची सुंदर वीण… ✨भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजे रक्...
28/08/2026

नात्यांचा गोडवा, प्रेमाची ऊब आणि आठवणींची सुंदर वीण… ✨

भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजे रक्षाबंधन! 🥰🎀
या पवित्र नात्याच्या धाग्याला सदैव प्रेम, आपुलकी आणि आनंदाची साथ लाभो. 🌸💫

रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

#रक्षाबंधन #राखी #भाऊबहिणीचेनाते

Address

Pune Metropolitan Region Development Authority, , New Administrative Building, , Opposite Akurdi Railway Station, , Akurdi, Pune :
Pune
411044

Opening Hours

Monday 10am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm
Saturday 10am - 5:45pm

Telephone

+912025933344

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Metropolitan Region Development Authority posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pune Metropolitan Region Development Authority:

Shortcuts

Share