Yuvasena Pimpri Chinchwad - युवासेना पिंपरी चिंचवड

Yuvasena Pimpri Chinchwad - युवासेना पिंपरी चिंचवड

Share

Welcome to the official page of Yuvasena-Pimpri Chinchwad City, the youth wing of Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)

28/01/2025

प्रजासत्ताक भारत देशाची पंच्याहत्तरी पुर्ण होत असताना

वंदनीय बाळासाहेबांचे निष्ठावंत शिलेदार, राज्याचे माजी तथा शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, लोकसभा सभापती स्वर्गीय मनोहर जोशी साहेबांना मरणोत्तर "पद्मभूषण पुरस्कार" जाहीर झाला आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक, उद्योजक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील कार्याची केंद्रीय संघराज्य शासनाने दखल घेऊन एका शिवसैनिकाचा केलेला हा गौरव आमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद क्षण आहे.

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे

Balasaheb Thackeray

MumbaiLoksabha #पद्मभूषण

28/01/2025

महान क्रांतिकारक पंजाब केसरी,
लाला लजपतराय.
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Photos from Yuvasena Pimpri Chinchwad - युवासेना पिंपरी चिंचवड's post 23/01/2025

स्वर्गीय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना एक कानमंत्र दिला, तो म्हणजे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण. स्वर्गीय बाळासाहेबांचा तोच विचार घेऊन आज त्यांच्या जयंतीनिमित्त युवासेनेतर्फे वृक्षारोपण करून शिवसेना भवन आकुर्डी आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मावळ लोकसभा संघटक श्री. संजोग वाघेरे, माजी आमदार श्री.गौतम चाबुकस्वार, पिपंरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभा उपशहर प्रमुख हरीश आबा नखाते, माणियार दस्तगिरी, युवसेना उपशहर प्रमुख निखिल दळवी, प्रविण पाटील, गोविंद शिंदे, आकुर्डी विभाग प्रमुख सतीश मरळ, निगडी विभाग महिला आघाडीच्या वैभवी घोडके आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

21/01/2025

जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व, स्पष्ट दिसतंय विकासाच कर्तुत्व!

20/01/2025

पहिल्या खो खो महिला विश्वचषकावर भारताचे नाव...

महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या भारतीय महिला खो खो संघाने विजय मिळवत विश्व चषक स्पर्धेत इतिहास रचला. या भारतीय संघामध्ये आपल्या महाराष्ट्रातील प्रियांका इंगळे सह अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड याही सहभागी होत्या. भारतीय संपूर्ण संघाचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन...


19/01/2025

इतिहासातील महापराक्रमी वीर,
उदयपूर, मेवाडच्या शिसोदिया राजवंशाचे राजे.

महाराणा प्रताप यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

Photos from Yuvasena Pimpri Chinchwad - युवासेना पिंपरी चिंचवड's post 16/01/2025

आई राजा उधो उधो!
आज दिनांक 16 जानेवारी 2025
ताथवडे व पुनावळे परिसरातील श्रद्धाळू भाविकांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र दर्शन घेण्याचा योग आला. या मंगल दर्शनामुळे प्रत्येक भाविकांच्या मनात भक्तीचे तेज उजळले आणि नवचैतन्याने मन प्रफुल्लित झाले. ही तीर्थयात्रा म्हणजे फक्त प्रवास नव्हे, तर भक्तीचा जागर आहे!

Photos from Yuvasena Pimpri Chinchwad - युवासेना पिंपरी चिंचवड's post 16/01/2025

आज, दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ५ वाजता,
चेतन (आण्णा) पवार मित्र परिवार आणि अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ताथवडे व पुनावळे परिसरातील नागरिकांसाठी
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तुळजापूर तीर्थक्षेत्र यात्रेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती:

शिवसेना उपनेत्या मा. सुषमाताई अंधारे
शिवसेना संघटक मा. संजोग वाघिरे
मा. नगरसेवक बाळासाहेब तरस
अ‍ॅड. मा. रुपालीताई ठोंबरे

तसेच ताथवडे आणि पुनावळे परिसरातील शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये शिवसेना उपनेत्या मा. सुषमाताई अंधारे यांनी यात्रेच्या बसला हिरवा झेंडा दाखवला, आणि 2000 भाविकांचा समावेश असलेल्या बस तुळजाभवानी दर्शनासाठी तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pimpri Chinchwad
Pune
411033