28/01/2026
भावपूर्ण श्रद्धांजली…
महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने मन अत्यंत व्यथित झाले आहे.
प्रशासनावर मजबूत पकड, अर्थकारणाचा सखोल अभ्यास आणि जनहिताला प्राधान्य देणारे त्यांचे नेतृत्व सदैव स्मरणात राहील. त्यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी अपूरणीय हानी आहे.
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो व पवार कुटुंबीयांसह सर्वांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
#भावपूर्ण_श्रद्धांजली
15/01/2026
सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार..!
लोकशाहीचा आदर करत सर्वांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले याबद्दल सर्व मतदार बंधू व भगिनी यांचे मनःपूर्वक आभार ! त्याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबवणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे व पोलिस प्रशासनाचेही शतशः आभार !
12/01/2026
प्रभाग ५ मध्ये परिवर्तनाचा निर्धार ..चौक सभेतून विकासाचा एल्गार!
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५, वडगाव शेरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य चौक सभा उत्साहात पार पडली. नागरिकांची मोठी उपस्थिती, कार्यकर्त्यांचा जोश आणि परिवर्तनाची आस यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.
या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी सडेतोड मार्गदर्शन केले. त्यांच्या स्पष्ट, ठाम आणि विकासाभिमुख विचारांनी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये नव्या आशेचा, विश्वासाचा आणि लढ्याच्या आत्मविश्वासाचा संचार झाला. ही सभा केवळ भाषणांची नव्हे, तर लोकांच्या प्रश्नांना थेट ऐकून घेणारी, त्यांच्या अपेक्षांना वाचा फोडणारी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ठोस दिशा ठरवणारी ठरली. पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व सुरक्षितता या मूलभूत प्रश्नांवर पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची ग्वाही देण्यात आली.
मशाल आणि हाताचा पंजा या चिन्हांना मतदान करून प्रभाग क्रमांक ५ मध्ये परिवर्तन घडवा.
विकास, पारदर्शकता आणि लोकांच्या हितासाठी एकजुटीने पुढे चला, असे भावनिक व ठाम आवाहन यावेळी करण्यात आले.
Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude
🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५
10/01/2026
चौक सभा..जनतेशी थेट संवाद!
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५, वडगाव शेरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ चौक सभेचे आयोजन!
Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude
🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५
09/01/2026
परिवर्तन अटळ आहेत..
प्रभाग_०५
वडगाव शेरी
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मधील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र शिरसाठ तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार सौ. सविता राऊत आणि ऍड.सतीश (आप्पा ) मुळीक यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला मा. गृह राज्य मंत्री तथा आमदार ऍड. सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude
🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५