🪴अक्षर मानव कायदा शिकवणी वर्ग 🪴
🌹हमुराबीच्या संहिते पासून सुरू होणारा कायद्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि संविधानातून आपले हक्क आणि कर्तव्य समजून घेण्यासाठी तसेच इतर अनेक कायदे व आपल्या रोजच्या आयुष्यात उपयोगी असणारे कायदे सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी आजच कायद्याच्या शिकवणी वर्गाला ऍडमिशन घ्या आणि कायद्याचं ज्ञान मिळवून जागरूक नागरिक बना.
कालावधी..3 महिने
Fees..... 1 thousand per month.
Contact..+919527212233.
अक्षर मानव समूह Akshar Manav Samuh
Our channel:https://youtube.com/@aksharmanav?si=tJtrravjCj_8tw7N
अक्षर मानव ..... माणसांची संघटना
अक्षर मानव हे माणसांचं अवाढव्य कुटुंब बनवायचा आणि माणसं एकमेकांच्या उपयोगी पडावीत याचा प्रयत्न आहे. मानवी साखळी जोडून एका माणसाला अनेक ओळखी मिळवून देण्याच्या या प्रयत्नात आपणही सहभागी व्हा...
आवाहन
शाळांमधल्या शिक्षणाची फी आणि शाळांबाहेर चालणाऱ्या खाजगी शिकवण्यांची फी भरमसाठ आहे.
मला काही संदर्भ मिळालेत. पण तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहता. तर तुमच्या गावांमध्ये या दोन्ही प्रकाराच्या फियांची अवस्था काय आहे, फिया किती आहेत, हे जरुर कळवा. तुमचे स्वतःचे काय अनुभव आहेत, तेही जमले तर कळवा. इथे नाही कळवता आले तर 9552907898 या क्रमांकावर मेसेज करून कळवा.
फार बिकट अवस्था आहे आणि फार लूटमार चालू आहे आणि सरकारचे यावर काहीच नियंत्रण नाही असे लक्षात येते आहे.
यावर rajankhandialogue या चॅनेलवर व्हिडिओ तर करतोच, पण रस्त्यावर उतरून काही काम करता येते का, याचेही नियोजन करतो.
महाराष्ट्रभर हे निवेदन पाठवा.
काही मार्ग काढावा लागेल.
31/03/2026
लिंक कमेंट्समध्ये
31/03/2026
दूध या पदार्थाचा संबंध नाही, असा एकही मनुष्य पृथ्वीवर नाही. दूध कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या आयुष्यात येतेच. आणि त्याच्याबद्दल समज गैरसमजही खूप आहेत. दुधाचे चांगले परिणाम आणि वाईट परिणामही खूप आहेत. माणसाच्या आणि माणसाच्या कुटुंबाच्या आरोग्याशी आणि अनारोग्याशी त्याचा घट्ट संबंध आहे.
तर दुधाबद्दल भरपूर काही जाणून घेऊ. ज्ञानी होऊ. त्यासाठी कार्यशाळेत या.
फी मुद्दामच अल्प ठेवली आहे. आणि सर्वांना प्रवेश आहे. मस्त गावरान सहलही होईल, गावरान अस्सल राहणेही होईल. गावरान जेवणही मिळेल. एकत्र राहण्याचा आनंदही मिळेल.
अशी कार्यशाळा पहिल्यांदाच होते आहे. या.
सहभागी व्हा.
23/03/2026
अक्षर मानव आयोजित
|| अक्षर मानव संवाद सहवास : २३ ||
जमिनीतून उगवून कर्तबगारीच्या सुंदर झेपा घेणारी दोन अवलिया माणसं.
दोन माणसांसोबत एकाच वेळी भन्नाट आणि कर्तबगारीच्या कोणतीही क्षेत्रात उभारी देणारा संवाद सहवास.
शेतीमाती, कला, साहित्य, नाटक, चित्रपट क्षेत्राची भरारी घेणारी आणि मातीशी कायम नाळ जुळवून ठेवून जगणारी दोन कष्टाळू माणसं, अरविंद जगताप आणि राजकुमार तांगडे यांच्याशी संवाद सहवास.
समाजात राबलेल्या, राबत असलेल्या आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या माणसांना बोलवावं आणि सलग त्यांच्या संगतीत राहावं, त्यांना, त्यांच्या कामाला समजून घ्यावं. त्यांना ऐकावं, मनमोकळ्या गप्पा माराव्यात त्यांच्याशी आणि आपल्या स्वतःच्या जगण्यासाठी, स्वतःसोबत आपला समाज उन्नत होण्यासाठी काही धागे सापडतात का ते शोधावं, असा एक 'संवाद सहवास' नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो.
या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके, संजय आवटे, डॉ. कुमार सप्तर्षी, सयाजी शिंदे, डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे, निरंजन टकले, ॲड. असीम सरोदे, विवेक सावंत, राजू परुळेकर, सौंदाळा गाव यांच्याशी झाले. आता संवाद सहवास होतोय आपापल्या कलांच्या आणि जगण्याच्या भूमिकांच्या स्वतःच्या वाटा स्वतः तयार केलेली दोन निर्मळ आणि साधी माणसं, अरविंद जगताप आणि राजकुमार तांगडे यांच्याशी.
निवांत, शांत ठिकाणी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे.
दिनांक : २५ आणि २६ एप्रिल २०२६ (दोन दिवस)
वेळ : पहिल्या सकाळी १० पासून दुसऱ्या संध्याकाळी ६ पर्यंत.
स्थळ : जालना
बाहेरगावाहून येणारांची राहण्याजेवणाची सोय आहे.
फी : ५०० रुपये : अक्षर मानव आजीव सदस्यांना ३०० रुपये.
नावनोंदणी संपर्क
फक्त वाट्स अप मेसेज :
राजेश गवई : +919595181884
प्रा. यशवंत सोनुने : +919422725330
विनोद वाघ : +919975137558
*अक्षर मानव कायदा ऑनलाईन शिकवणीवर्ग*
📘 *Basic Law Course Syllabus (मराठीत) -*
Basic Law Course (कायदा मूलतत्त्वे) चा सविस्तर अभ्यासक्रम मराठीत दिला आहे. हा अभ्यासक्रम सामान्य नागरिकांसाठी कायद्याची मूलभूत माहिती यासाठी उपयुक्त आहे.
1️⃣ कायद्याची ओळख (Introduction to Law)
कायदा म्हणजे काय?
कायद्याची गरज व उद्दिष्टे
कायद्याचे कार्य
कायदा आणि नैतिकता यातील फरक
2️⃣ कायदेशीर जागरूकता (Legal Awareness)
सामान्य नागरिकांचे हक्क
पोलिस व नागरिक
RTI कायदा
महिलांचे कायदे
बाल संरक्षण कायदे
3️⃣ भारतीय संविधान (Indian Constitution – Basics)
संविधानाची ओळख
संविधानाची वैशिष्ट्ये
मूलभूत अधिकार (Fundamental Rights)
राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे (DPSP)
मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties)
4️⃣ कायद्याचे प्रकार (Types of Law)
नागरी कायदा (Civil Law)
फौजदारी कायदा (Criminal Law)
घटनात्मक कायदा (Constitutional Law)
वैयक्तिक कायदे (Personal Laws)
हिंदू कायदा
मुस्लिम कायदा
ख्रिश्चन कायदा
5️⃣ न्यायव्यवस्था (Judicial System in India)
भारतीय न्यायालयांची रचना
सर्वोच्च न्यायालय
उच्च न्यायालय
जिल्हा व सत्र न्यायालय
न्यायाधीशांची भूमिका
6️⃣ नागरी कायद्याची मूलतत्त्वे (Basics of Civil Law)
नागरी वाद म्हणजे काय?
मालमत्ता वाद
करार कायद्याची ओळख
नुकसानभरपाई (Compensation)
7️⃣ करार कायदा (Indian Contract Act – Basics)
कराराची व्याख्या
वैध कराराची तत्त्वे
कराराचे प्रकार
करारभंग (Breach of Contract)
8️⃣ कौटुंबिक कायदे (Family Laws – Basics)
विवाह
घटस्फोट
पोटगी
वारसा हक्क
मृत्युपत्र (Will) ची ओळख
9️⃣ मानवाधिकार व ग्राहक संरक्षण
मानवाधिकारांची संकल्पना
ग्राहक हक्क
ग्राहक संरक्षण कायदा
ग्राहक तक्रार प्रक्रिया
🔟 फौजदारी कायद्याची मूलतत्त्वे (Basics of Criminal Law)
गुन्हा म्हणजे काय?
IPC (भारतीय दंड संहिता) ची ओळख
दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे
जामीन, FIR, अटक यांची माहिती.
*अक्षर मानव कायदा ऑनलाईन शिकवणीवर्ग*
कायदा शिक्षण हा बेसिक कोर्स सुरू करतो आहोत.
(कोर्स करण्यासाठी शिक्षणाची अट नाही, पण लिहिता, वाचता आणि ऐकता यावं इतकंच. तसेच ज्यांना या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण हवं असेल त्यांना सुद्धा उपयुक्त)
- कोर्स सुरू होण्याची तारीख ६ मार्च २०२६
- वार - शुक्रवार, शनिवार, रविवार
- वेळ रात्री ८.३० ते ९.३०
- शिक्षक - ऍड. रेहाना खान.
- Law Professor, BSc. D.C.M.,B.Ed.(Gold medal),M.Ed.,M.Phil.(Sociology),M.A.(Psychology),LL.M., Students councellor, Philosopher.
*वैशिष्ट्ये -*
- CET साठी उपयुक्त ज्ञान.
- कोणत्याही क्लासेसपेक्षा खूपच कमी फी.
- बेसिक कोर्स कालावधी ३ महिने.
- दर आठवड्याला ३ तासिका.
- बेसिक कोर्स एकूण फी फक्त ३००० रुपये.
- pdf स्वरूपात नोट्स दिल्या जातील.
- टेस्ट घेतल्या जातील.
- अनुभवी व कृतिशील शिक्षकवर्ग.
- ऑनलाईन गप्पांमधून विषयाचे आकलन.
- नियमित तासिका पद्धत.
- प्रश्नोत्तरे व चर्चा सत्रांचे आयोजन.
- लेखन , वाचन आणि संवाद यातून शिक्षण.
- शुक्रवार ६ मार्च पासून गुगल मीट लिंक उपलब्ध होईल.
कायदा शिकण्याची आवड असणाऱ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर आपली पूर्ण ३००० रुपये फी भरून नावनोंदणी करावी.
9527212233
(वॉट्सअप्प मेसेज फक्त)
-- सुजित चव्हाण
(समन्वयक, अक्षर मानव शिकवणीवर्ग).
17/02/2026
निमंत्रण #अक्षर_मानव
एक सुंदर, उपयुक्त असा कार्यक्रम आपण आपल्या घरात, गल्लीत, गावात, उपनगरात आयोजित करू शकता. तोही अगदी बिन खर्चात.
अक्षर मानव संवाद सहवास.
माणसांचे आयुष्य कोणत्याही काळात अस्थिर असते. त्यात अनेक चिंता, काळज्या, समस्या, स्पर्धा, भीती असतात.
माणूस सतत घाबरलेला असतो आणि सतत विश्वासात असतो. अनेकदा अज्ञानात असतो.
तर माणसांनी एकमेकांना दिलासा यावा, जगण्याचे बळ यावे, आधार यावा, मार्ग मिळावा यासाठी शोधलेला सोपा उपाय म्हणजे बोलणे आणि ऐकणे.
तर हाच बोलण्याचा आणि ऐकण्याचा उपक्रम आपण आपल्या ठिकाणी जिथे असाल तिथे सुरू करू शकता. संवादाचा सहवास असेल तर जगण्याचे उत्तम मार्ग आणि पर्याय मिळून जातील. संवाद मात्र नियमित हवा.
आपण आपल्या ठिकाणी आठवड्यातून एकदा, पंधरा दिवसांतून एकदा किंवा महिन्यातून एकदासुद्धा हा कार्यक्रम घेऊ शकता.
सर्वांच्या सुट्टीचा एक दिवस, एक संध्याकाळ ठरवा आणि त्यात मोजून दोन तास एकमेकांच्या संगतीत बसा.
परिसरातली कोणत्याही एका क्षेत्राची व्यक्ती बोलवा. दोन, पाच, दहा, पन्नास अशी तुम्हाला जमतील तेव्हढी माणसे जमा करा. त्या व्यक्तीचे अनुभव ऐका. आणि त्यावर सर्वांनी चर्चा करा. प्रश्नोत्तरे करा. (पण आडवे लावणे आणि वाद घालणे टाळा.)
भोवताली हजारो क्षेत्रे आहेत आणि त्यात राबणारी हजारो माणसे आहेत. त्यातल्या कुणाही एका व्यक्तीला बोलवा आणि संवाद करा.
आणि हा संवाद थेटच करा. मस्त जमिनीवर बसून करा. यासाठी कुणाचे घरसुद्धा चालेल. त्यासाठी सभागृह नको, बैठक नको, सजावट नको. आणि कसली औपचारिकता, मानपान, आगतस्वागत नको, हारतुरे नकोत, मुळात कुठलाही उपचार नको. थेट गप्पा. मनमोकळ्या गप्पा. आनंदी संवाद.
माणसे एकमेकांपासून तुटली म्हणतात. संवादाने ती जोडली जातील.
हा उपक्रम आपण आपल्याकडे घेणार असाल, तर त्याची अधिक माहिती, अधिक मार्गदर्शन हवे असेल तर खालील ग्रुपवर जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/EPhb8xAt4ER2JA26mFEdMa?mode=gi_t
निमंत्रण
नववे राज्यस्तरीय
अक्षर मानव साहित्य संमेलन
६, ७, ८ फेब्रुवारी २०२६
दाभाडी, जिल्हा नाशिक
कार्यक्रमपत्रिका :
६ फेब्रुवारी शुक्रवार : संध्याकाळी ४ ते ६ : प्रारंभ : पहिले सत्र
माजी अध्यक्ष : अशोक थोरात
अध्यक्ष : प्रकाश होळकर
संयोजक : तुषार अहिरे
संध्याकाळी ६ ते ७ : चहापान | ७ ते ९ : दुसरे सत्र | ९ ते १० : जेवण | रात्री १० ते १२ : तिसरे सत्र
७ फेब्रुवारी शनिवार : सकाळी ७ ते ९ : परिसर सहल | ९ ते १० : चहा, नाश्ता | १० ते १२ : चौथे सत्र | १२ ते १ : पाचवे सत्र | १ ते २ : जेवण | २ ते ४ : सहावे सत्र | ४ ते ४.१५ : चहा | ४.१५ ते ६.१५ : सातवे सत्र | ६.१५ ते ७ : पाय मोकळे करणे | ७ ते ९ : आठवे सत्र | ९ ते १० जेवण | १० ते १२ : कवी संमेलन
८ फेब्रुवारी रविवार : ७ ते ९ चहा नाश्ता, गप्पा | ९ ते ११ : नववे सत्र | ११ ते १ : दहावे सत्र | १ ते २ : जेवण | २ ते ४ : सहावे सत्र समारोप
विषय : मराठी भाषेचे भविष्य | पुस्तक प्रदर्शन व विक्री | दाभाडीचा इतिहास | खान्देशची साहित्य परंपरा | खानदेशी बोलींचे प्रकार | नाट्यप्रयोग | कथाकथन | कविसंमेलन | चित्रप्रदर्शन | तीन मिनिटांत गोष्ट सांगण्याची स्पर्धा व पुरस्कार | नाशिक जिल्ह्यात पाहण्याच्या ठिकाणांची माहिती | टवाळक्या | वारी समजून घेताना | चित्रपट आणि मराठी साहित्य
सर्वांना मुक्त प्रवेश. कसलीही फी नाही. राहण्याजेवणाची मोफत व्यवस्था. योग्य व्यवस्था करण्यासाठी आगाऊ नावनोंदणी मात्र आवश्यक.
निमंत्रक व नावनोंदणी संपर्क :
+917588832235 तुषार अहिरे, संचालक अक्षर मानव महाराष्ट्र,
+91 94203 62195, संगीता फुके, अध्यक्ष, नाशिक जिल्हा अक्षर मानव
+919762245921 राणी मोरे, अक्षर मानव साहित्य विभाग अध्यक्ष महाराष्ट्र
+919082646494 कल्पना मापुस्कर, अक्षर मानव कविता विभाग अध्यक्ष महाराष्ट्र
+919975326210 आझाद खान, संचालक, अक्षर मानव महाराष्ट्र
+918652662846 दीपेश मोहिते, उपाध्यक्ष, अक्षर मानव महाराष्ट्र व नियंत्रक साहित्य व कविता विभाग महाराष्ट्र
+918600421256 प्रा. बालाजी सूर्यवंशी, संचालक, कविता व साहित्य विभाग महाराष्ट्र
16/01/2026
अक्षर मानव बारामती आयोजित
|| निसर्ग संमेलन सोबत हुरडा संमेलन ||
दिनांक २५ जानेवारी २०२६
दुपारी ४ ते दुसऱ्या सकाळी १०.
एकत्र जमणं.
कार्यक्रम :
संध्याकाळी ४ वाजता
टवाळक्या : सादरकर्ते नितिन अदवंत
६ ते ७
विसावा, चहा, माळावर फिरणं.
संध्याकाळी ७ वाजता
अनवट कार्यक्रम : वारी समजून घेताना
सादरकर्ते : संदेश भंडारे
९ ते १० : हुरडा पार्टी, मस्त जेवण.
रात्री १० ते १२ गाणी, स्किट्स, कविता, नृत्य, शेकोटी.
रात्री मुक्काम.
२६ जानेवारी
सकाळी : ७ ते ९ माळावर भटकंती, हरणं, पक्षी पाहणं, दवबिंदू अनुभवणं.
९ वाजता : ध्वजवंदन.
९ ते १० नाश्ता.
१० वाजता : परती.
ठिकाण : अक्षर मानव झाड, यशवंतराव मोरे आश्रमशाळा, मुराटी मोढवे, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
महिलांची स्वतंत्र व्यवस्था.
ज्यांना जमेल त्यांनी येताजाताना मोरगावचा गणपती आणि जेजुरीचा खंडोबा आणि सोमाईचे करंजे पाहणं.
फी : प्रत्येकी ८०० रुपये.
अक्षर मानवच्या आजीव सदस्यांना ५०० रुपये.
नावनोंदणी : फक्त वॉटसॲप मेसेज :
9552907898
नावनोंदणीची शेवटची तारीख २० जानेवारी २०२६.
नाव नोंदवल्यावर ग्रुपवर घेऊन अधिक माहिती व मार्गदर्शन केलं जाईल.
मऊ थंडी, गरम शेकोटी, उबदार पांघरूण, हुळहुळता हुळा, चांदण्यात मोकळ्या गप्पा, गाणी.
अक्षर मानव भाषा ऑनलाईन शिकवणी वर्ग
सोमवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ पासून.
(सर्व वयोगटांसाठी प्रवेश खुला)
*भाषा विषय - जपानी भाषा*
- बेसिक कोर्स कालावधी - ३ महिने.
- बेसिक कोर्स फी ९०० रुपये.
(एकाच टप्प्यात पूर्ण फी भरावी.)
- प्रत्येक आठवड्यात २ दिवस (सोमवार व गुरुवार) प्रत्येकी १ तास.
- वेळ रात्री ०८.०० ते ०९.००
- अनुभवी व कृतिशील शिक्षक वर्ग.
- ऑनलाईन गप्पांमधून भाषेचे आकलन.
- नियमित तासिका पद्धत.
- प्रश्नोत्तरे व चर्चा सत्रांचे आयोजन.
- लेखन, वाचन आणि संवाद यातून शिक्षण.
- सोमवार ०२ फेब्रुवारी २०२६ पासून गुगल मीट लिंक उपलब्ध होईल.
- वर नमूद केलेल्या भाषा शिकण्याची आवड असणाऱ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर नावनोंदणी करावी.
- प्रा. सुजित चव्हाण (समन्वयक)
9527212233
(वॉट्सअप मेसेज फक्त.)
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Pune
