29/05/2020
Menstrual Hygiene Day & Red Dot Movement!!! | Progno Health Solutions India Pvt ltd
International Menstrual Hygiene Day is a celebration on 28th May every year, It is a day to create awareness about good menstrual hygiene practices. Corporate Health Checkup | Annual Health Checkup | Pre Employment Health checkup | Full Body Health Checkup
02/05/2020
Health Benefits of Herbal Tea | Progno Health Solutions India Pvt ltd
Health Benefits of Herbal Tea | Corporate Health Checkup | Pre Employment Health Checkup | Annual Health Checkup
16/04/2020
6 Health Benefits of Drinking Warm Water.
Warm water eliminates fat deposits in the body. The toxins are flushed out which are circulating throughout the body thus enhancing blood circulation.
19/12/2015
भीमथडी जत्रेमध्ये यंदा सायन्स पार्क
पुणे - सायन्स पार्क, महाराष्ट्रातील खाद्य व वाद्य संस्कृती अन् पारंपरिक खेळांचा सहभाग असलेली "भीमथडी जत्रा‘ 24 ते 27 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. पारंपरिकतेच्या जोडीला आधुनिकतेची जोड देत या वर्षी जत्रेत शालेय विद्यार्थ्यांना सायन्स पार्कची अनोखी सफर करता येणार आहे. तर महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आणि खाद्यजत्रेतील शाकाहारी व मांसाहरी खाद्यपदार्थ खवय्यांना चाखता येणार आहेत. 12 राज्यांतील आणि महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांतील बचतगटांचे 300 स्टॉल्स या जत्रेत पाहायला मिळतील.
बारामती येथील "ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट‘च्या शारदा महिला संघातर्फे ही जत्रा आयोजित केली आहे. संघाच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जत्रेचे हे दहावे वर्ष असून, दशकपूर्तीनिमित्त "सामर्थ्य महाराष्ट्राचे‘ उपक्रमांतर्गत कोकणातील संस्कृतीचा व खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. खाद्याबरोबरच, कोकणी नृत्य आणि कोकणी संगीताचा आनंदही पुणेकरांना लुटता येईल. सायन्स पार्कमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, शालेय मुलांसाठी वैज्ञानिक उपक्रम आणि खेळांचा समावेश असेल. ग्रामीण भागातील निवडक कलाकार, देखावे, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती व त्यांची उत्पादनेही येथे पाहता येतील. या जत्रेचे उद्घाटन बचत गटांतील महिलांच्या हस्ते होणार असून, यंदा "भीमथडी‘ जत्रेच्या ऍप्लिकेशनमधून लोकांना जत्रेविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. हस्तकलेच्या वस्तू, हॅण्डलूम, लाकडी वस्तू, विणकाम, उन्हाळी उत्पादने, दागिने यांसह शाकाहारी व मांसाहरी जेवणाचे अनेक पर्याय येथे पाहता येणार आहेत. ही जत्रा रेंजहिल्स येथील (सिंचननगर जवळील) कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत पाहावयास खुले राहील.
13/06/2015
शालेय पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे!
पुणे - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे, या मागणीसाठी बचत गटांतील महिलांनी शुक्रवारी शिक्षण मंडळासमोर आंदोलन केले. हे काम बचत गटांना देण्याऐवजी प्रशासनाने विशिष्ट कंत्राटदाराला दिल्याचा आरोप या वेळी महिलांनी केला.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत पोषण आहार पुरविण्यात येतो. आतापर्यंत हे काम सावित्री महिला बचत गट महासंघातील महिलांना देण्यात येत होते. मात्र, पोषण आहार पुरविण्याचे काम नुकतेच कंत्राटदाराला देण्यात आले. बचत गट महासंघाला हे काम न दिल्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच बचत गटांतील सुमारे शंभर महिलांनी शिक्षण मंडळाच्या कार्यालयात धरणे धरले होते. बचत गटांनी पुरविलेल्या पोषण आहाराचा दर्जा उत्तम असतानाही आणि अतिरिक्त आयुक्तांनी हे काम बचत गटांच्या महिलांनाच देण्यास सांगितले असतानाही कंत्राटदाराला काम दिल्याचा आरोप करण्यात आला. बचत गटांतील महिला या विधवा, परित्यक्ता असून, त्यांनी रोजगारासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. अशा परिस्थितीत मंडळाने हे काम बचत गटांकडून काढून घेऊन अन्याय केल्याचा आरोप राजश्री देवळाणकर, संध्या खैरे, सदिया शेख, अक्षया गोखले, विजयालक्ष्मी बायर यांनी केला. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. बचत गटांच्या महिलांच्या हातून हे काम काढून घेतल्यामुळे सुमारे 200 महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे काम त्वरित बचत गटांकडे पूर्ववत देण्याची मागणी महासंघाच्या अध्यक्षा जयश्री ढोबळे यांनी केली आहे.
या संदर्भात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता, पोषण आहार पुरविण्याचे काम बचत गटांच्या महिलांनाच देण्यात यावे, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी केली होती, अशी माहिती त्यांनी दिली; तर शिक्षण मंडळाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
11/12/2014
भीमथडी जत्रा बुधवारी
290 बचत गटांचा सहभाग; प्लॅस्टिक पिशव्या टाळणार
पुणे- लोककला, हस्तकला आणि खाद्यमहोत्सव यांचा संगम असलेली आणि शहरात राहूनही खेडेगावाची अनुभूती देणारी "भीमथडी जत्रा‘ पुणेकरांच्या भेटीला येत आहे. यात 290हून अधिक बचत गटांनी सहभाग नोंदवला असून, प्लॅस्टिक पिशव्या टाळण्यावर यंदा भर देण्यात आला आहे.
ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर 10 ते 14 डिसेंबर दरम्यान ही जत्रा भरणार आहे. याचे उद्घाटन बचत गटातील महिलांच्या हस्ते होणार आहे. कला आणि लज्जतदार खाद्य पर्थांबरोबरच नवीन प्रकारची सजावट, अधिक प्रशस्त रचना याला महत्त्व देत जत्रा सुरू होईल, असे संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्या म्हणाल्या, ""लोप पावत असलेले विविध खाद्यपदार्थ, ग्रामीण भागाची खासियत असलेले मांडे-पुरणपोळी, गव्हाची खीर अशा पदार्थांपासून मांसाहारी पदार्थांची चव येथे चाखता येईल. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी विविध खेळ-कला, बारा बलुतेदारही जत्रेत पाहायला मिळतील. याच्या जोडीला बचत गटांची विविध उत्पादनेही येथे ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी 272 स्टॉल्स सुरू करण्यात येणार आहेत.‘‘ दरवर्षी दीड लाखाहून अधिक जण जत्रेला भेट देतात. त्यामुळे सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. आगीच्या घटना होऊ नयेत म्हणून कापडी मांडव यंदा टाळण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही वाढविण्यात आले आहेत. पुणेकरांना सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत जत्रेचा आनंद घेता येईल, असे त्या म्हणाल्या.
जत्रेतील आकर्षण
- चुलीवरची भाकरी, खानदेशी मांडे, कोल्हापुरी रस्सा.
- धनगरी नृत्य, लमाणी नृत्य, आदिवासी नृत्य.
- तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब अशा मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके
- जात्यावरच्या ओव्या, भारूड, पथनाट्य गोंधळ अशा विविध लोककलांचा आस्वाद
21/01/2014
'भीमथडी जत्रे'मध्ये एक कोटीची उलाढाल!!!!
पुणे - 'भीमथडी जत्रे'ला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, गेल्या चार दिवसांत एक लाखावर लोकांनी भेट दिली. एक कोटी 80 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती जत्रेचे समन्वयक प्रल्हाद जाधव यांनी दिली. सोमवारी जत्रेचा समारोप झाला.
बारामती येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा शारदा महिला संघ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जत्रेचे आयोजन केले. महिला बचत गटांची लोणची, पापड, चटण्या, सरबत, सेंद्रिय शेती उत्पादनांची लोकांनी सोमवारीही मनसोक्त खरेदी केली. महिलांना उद्योजक बनविण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचा जत्रेचा हेतू होता. पैठण्या, साड्या, बांधणीचे ड्रेस मटेरिअल, शॉल, स्वेटर आणि खादीच्या कपड्यांना मागणी होती. परराज्यातील कलाकारांनी तर्कशी आर्ट, कॅलिग्राफी, क्लेमॉडेलिंग सादर केले. खाद्यपदार्थांची रेलचेल जत्रेचे वैशिष्ट होते. पिठलं-भाकरी ते पांढरा-तांबडा रश्शापर्यंतच्या अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद लोकांनी घेतला. बैलगाडीचा प्रवास, पारंपरिक लोकगीते, लोकनृत्य आणि पथनाट्ये कलाकारांनी सादर केली. दिशा आय बॅंक व दिशा ग्रुपने नेत्रदानाचे आवाहन केले. नागरिकांनी अर्ज भरून त्याला प्रतिसाद दिला.
17/01/2014
शहरी ग्रामीण भागाची नाळ जोडणाऱ्या भीमथडी जत्रेला दिमाखात सुरवात
पुणे- केळीचे खांब, बैलगाडी, तुतारीवाले असे ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारे प्रवेशद्वार, सनई चौघड्याचे मंजूळ सूर, हलगीचा कडकडाट अशा आगळ्यावेगळ्या उत्साही वातावरणात भीमथडी जत्रेचे गुरुवारी उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, लोककलांच्या दर्शनाबरोबरच अन्य सहा राज्यांतील कलाकारांच्या कलांचे प्रात्यक्षिक यंदा प्रथमच सुरू केलेल्या कलाग्राम दालनात होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, तसेच महिला बचत गटांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या महिलांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून भीमथडी जत्रेचे उद्घाटन कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. भीमथडी जत्रेच्या संयोजिका सुनंदा पवार या वेळी उपस्थित होत्या. बचत गटांच्या अरुणा टेके (वडगाव काशिंबे, मंचर), आशा नवले (माळेगाव बुद्रुक), रेश्मा शिंदे (सासवड), पद्मा चव्हाण (येवलेवाडी, कोंढवा), विजयमाला शिंदे (राजगुरुनगर), दीपाली शिरोडकर (पुणे) या वेळी उपस्थित होत्या.
बारामती येथील ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा शारदा महिला संघ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित जत्रेचे हे आठवे वर्ष आहे. 16 ते 19 जानेवारीपर्यंत रोज सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत ही जत्रा सुरू असेल. राज्याच्या विविध भागांतील तसेच पश्चिम बंगाल, पंजाब, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू या राज्यांतील बचत गटांनीही त्यांची उत्पादने व खाद्यपदार्थ या जत्रेत ठेवली आहेत.
शहरी व ग्रामीण भागाचा दुवा ठरलेल्या या जत्रेत महिलांच्या पारंपरिक खेळांचा स्वतंत्र विभाग आहे. जत्रा सुरू झाल्यानंतर तेथे वाघ्यामुरळीचा कार्यक्रम झाला. नंदीबैल लोकांमधून फिरू लागला. तसेच पारंपरिक स्वरूपातील गजनृत्य, पिंगळा, वासुदेव, पोतराज, भारूड, पथनाट्य हेही या जत्रेत पाहण्यास मिळतील. खेड्याचा जिवंत देखावा उभारण्यात आला असून, बारा बलुतेदारांची व्यावसायिक व राहणीमानाची पद्धत यांचा यात समावेश आहे. लगोर, सागरगोटे, काचकवड्या, जिबल्या, बिट्ट्या, भोवरे आदी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल.
भीमथडी कलाग्राममध्ये जरदोशी वर्क, वायर आर्ट, ब्लॉक प्रिंटिंग, कॅरीकेचर आर्ट, मधुबनी आर्ट, धागा आर्ट, लाख आर्ट, वारली पेंटिंग, क्ले मॉडेलिंग अशा विविध कला उत्पादनांचा समावेश आहे.
सुनंदा पवार म्हणाल्या, ""कलादालन यंदा प्रथमच सुरू केले आहे. कलाकारांच्या कलाकृती व कलात्मक वस्तू या ठिकाणी मिळतील. दरवर्षीप्रमाणे बारा बलुतेदार, हलगी वाजविणारे कलाकार, आदिवासी भागातील महिलांचा गटही यंदा आहे. नेत्रदानाविषयी जनजागृती करणार आहोत.''
महिला उद्योजकांचे 50 स्टॉल, महिला बचत गटांचे 100 स्टॉल, सेंद्रिय शेतीचे 50 स्टॉल, खाद्यपदार्थांचे 90 स्टॉल तसेच अन्यही काही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने भीमथडी जत्रेतील खाद्यपदार्थांचे दालनही दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
15/01/2014
अनेकांच्या संसाराला बचत गटांकाडून मिळाला आधार
म. टा. वृत्तसेवा, अमळनेर
बचतगटांची उत्पादने म्हणजे खाद्य पदार्थ असे हमखास समीकरण असते. मात्र या गोष्टीला फाटा देत काही बचत गट वेगळ्या वाटेने आपला मार्ग सुरू करतात आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन येत जाते. नेमके असेच काही बचत गट येथे सुरू असलेल्या अमळनेर फेस्टिव्हलमध्ये इतरांसाठी आदर्श ठरत आहेत.
कसाबसा रेटत होतो
या बचत गटातील पाच महिला आधी दुसरी उत्पादने विकत घेऊन त्यांनी विक्री करत. यातून या महिलांना दोन पैसे मिळत. मात्र खरी कमाई मूळ मालकाची होत होती आणि यांची परिस्थिती आहे तशीच राहत होती. उसनवारी करून संसाराचा गाडा कसाबसा त्या रेटत होत्या. शेवटी नीता सोनार, दिपाली सोनार, आशा जाधव, संगीता महाजन, आणि सुमन गुरव या महिलांनी एकत्र येण्याचा निर्णय घेऊन ' प्रेरणा बचत गट ' स्थापन केला. त्यानंतर त्यांनी सर्व प्रकारची लोणचे बनवले. यात आवळा, मिरची, लिंबू, कैरी आणि ओली हळद ही लोणचे लोकप्रिय झाली. यामुळे त्यांना बऱ्यापैंकी पैसाही मिळू लागला. या बचत गटाला ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती झालेल्या महिलांना जेवणाचा डब्बा पुरवण्याची आर्डर मिळाली आहे.
आयुर्वेदीक उत्पादनांनी तारले
नव्यानेच बचत गट स्थापन करून आयुर्वेदीक उत्पादने निर्माण करणारा हा गट आहे. आयुर्वेदीक उत्पादनांना बाजारात प्रचंड मागणी आहे, हे हेरून या गटाने त्यांचे उत्पादन करायचा निर्णय घेतला. या बचत गटात रत्ना पाटील, लताबाई पवार, शिल्पा चौधरी, शीतल चौधरी आणि उषा पाटील सदस्या आहेत. रत्ना पाटील यांनी डॉ तुषार जोगी यांच्या मदतीने आयुर्वेदीक उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आवळा च्यवनप्राश, केशतेल, मसाज तेल, सुगंधी उठणे, फेसपॅक आणि अल्वेरा ज्यूस आदी उत्पादने ते तयार करतात. डॉ. जोगी यांच्या मदतीनेच त्या उत्पादने विकतात.
बचत गट स्थापन करण्याअगोदर घरोघरी जाऊन वस्तू विकायची. स्वयंपाकाची कामे करायची. रोजंदारीने काम करून संसार सुरु होता. मात्र बचत गटाच्या माध्यमातून आज स्वतःचे घर झाले आहे.
- नीता सोनार, प्रेरणा बचतगट
बचत गट म्हटलं की उत्पादनं ठरलेली होती. आम्ही मात्र वेगळी वाट धरली. आयुर्वेदीक उत्पादनांना प्रतीसाद मिळेल की नाही असे वाटत होते. मात्र उज्वला पाटील यांनी आत्मविश्वास निर्माण करून या उत्पादनाचे दुकान फेस्टिवलमध्ये लावण्यास उद्युक्त केले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- रत्ना पाटील, श्री सदगुरू बचतगट
महिलांना संधी मिळाल्यास त्या खूप काही करू शकतात याचे हे उत्तम उदाहरणे आहेत. मी फक्त त्यांना दिशा दाखवली त्यांच्या कर्तुत्वाने त्यांना आज चांगले दिवस आले आहेत. मी फक्त पालिकेच्या माध्यमातून त्यांना कर्ज कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला आहे.
- उज्ज्वला पाटील
12/01/2014
बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनास प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिलांच्या उपजत कलागुणांना उपयुक्त व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महिलांच्या बचतगट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून तीन दिवसांचे प्रदर्शन कलश मंगल कार्यालयात सुरू आहे. शहरात सध्या महिला व्यावसायिक, बचतगट व गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांकरता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रदर्शनाचा शनिवारी समारोप आहे.
प्रदर्शनात ६६ स्टॉल लावण्यात आले आहेत. डोणगाव, घारेगाव, जामगाव, वाहेगाव, सोजूळ,महालगाव या ग्रामीण भागातील बचतगटांनी तूर, उडीद, मसूर डाळी, तीळ, चटण्या, सुकामेवा यांसोबत भाजीपालाही प्रदर्शनात विक्रीस आहे. चटण्या, वाळवलेली मेथीची भाजी, गावरान बोर, वालाच्या शेंगा व अशाच खेड्याची आठवण करून देणाऱ्या वस्तूंची प्रदर्शनात रेलचेल आहे. शहरी बचतगटांनी संक्रातींच्या अनुषंगाने शिफॉन, कॉटनच्या साड्या, ट्युनिक्स व ड्रेस मटेरियल, तीळगूळ, सजावटीच्या वस्तू व वाणाचे सामानही होते. खाद्यजिन्नसांचे स्टॉलही तितकीच गर्दी खेचत होती.
अगदी खानदेशी भरीत, कळण्याची भाकरी व खानदेशी मांडे पाहिल्यावर लोकांची या स्टॉलवर गर्दी होती. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून महिला आर्थिक
विकास महामंडळ व जागृती मंच यांचा हा संयुक्त उपक्रम होता. प्रदर्शनाचा शनिवार शेवटचा दिवस आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माविमचे विभागीय समन्वयक उमेश कहाते, जागृती मंचच्या संस्थापक अध्यक्ष ताराबाई बसोले,अध्यक्ष भारती भांडेकर आदींनी केले आहे.
04/03/2013
Coming Up new improved version of your popular weekly.
Keep watching this space.....