Sarthi Pune

Sarthi Pune

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sarthi Pune, Balchitravani, C T Survey 173, Gopal Ganesh Agarkar Road, Pune.

Chhatrapati Shahu Maharaj Research Training & Human Development Institute (SARTHI), Pune is registered under Company Act, 2013 under Section 8 as Non-Profit government company for Maratha,Maratha-Kunbi,Kunbi-Maratha,Kunbi community in Maharashtra State मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी २५ जून २०१८ रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण

18/05/2026

✨ सारथीच्या माध्यमातून स्वप्नांना मिळतेय नवी दिशा! ✨

“सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास (इन्क्युबेशन) प्रशिक्षण उपक्रम” अंतर्गत श्री. करण चव्हाण यांनी आपल्या कल्पनांना व्यवसायाचे रूप देत यशाची नवी वाट निर्माण केली आहे. 🚀

तरुणांना उद्योग, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रेरित करणारा हा उपक्रम महाराष्ट्र शासन आणि सारथी संस्थेचा एक प्रभावी प्रयत्न आहे. 💼🌱

17/05/2026

🎓 संघर्षातून यशाकडे… प्रेरणादायी प्रवास! ✨

सारथी संस्थेच्या मार्गदर्शनामुळे मधुरा जनार्दन खताळे यांनी शिक्षण व करिअरच्या वाटचालीत यश संपादन केले. कठीण परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 💫

ही यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे.
युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वास देण्याचे कार्य सारथी संस्था सातत्याने करत आहे. 🚀

16/05/2026

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी SARTHI संस्थेमार्फत विविध प्रशिक्षण व उद्योजकता विकास उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सारथी लाभार्थी श्रीमती पूनम राजेंद्र साटम यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय उभारला आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला.

हा प्रेरणादायी प्रवास अनेक महिला आणि युवकांसाठी नवी दिशा देणारा आहे.

📍 महिला सक्षमीकरण | स्वयंरोजगार | उद्योजकता विकास

#सारथी #महिलासक्षमीकरण #उद्योजकता

Photos from Sarthi Pune's post 06/05/2026
04/04/2026

सारथी संस्थेच्या खारघर (नवी मुंबई) येथील विभागीय कार्यालय व वसतीगृह बांधकामाचा आढावा

महाराष्ट्र शासनाच्या 'सारथी' संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील खारघर येथे विभागीय कार्यालय आणि भव्य वसतीगृहाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश पाटील (भा.प्र.से.) यांनी दि. १ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष बांधकाम स्थळाला भेट दिली.

यावेळी त्यांनी बांधकामाच्या गुणवत्तेची पाहणी केली आणि संबंधित यंत्रणेला हे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

17/03/2026

🎯 संधी हुकवू नका! सारथी शिष्यवृत्ती २०२५-२६ मुदतवाढ

उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची सुवर्णसंधी! 'सारथी' संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढली आहे.

📍 पात्रता: मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थी.
🏢 व्याप्ती: देशातील २०० नामांकित संस्थांमधील प्रवेश.
📅 अंतिम तारीख: ३० मार्च २०२६ (सायंकाळी ६:१५ पर्यंत).

लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून हार्डकॉपी सादर करा!

👉 अधिक माहितीसाठी भेट द्या: https://sarthi.maharashtra.gov.in/

10/03/2026

कौशल्य विकासातून यशाचे शिखर! 🚀

सारथी संस्था आणि IGTR, छत्रपती संभाजीनगर यांच्या 'श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण' उपक्रमातून नागपूरच्या कुणाल खुशाल निमकर यांनी आपले स्वप्न साकार केले आहे.

'Post Diploma in Tool Design (CAD–CAM)' हा १२ महिन्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, कुणाल यांची पुणे येथील Triveni Turbines Co. मध्ये Graduate Engineer Trainee या पदावर निवड झाली आहे. सध्या ते 35,000/- रुपये प्रतिमहा वेतनावर कार्यरत आहेत.

सारथीच्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे कुणाल यांच्या तांत्रिक कौशल्यात मोलाची भर पडली असून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे.

#यशगाथा #सारथी #कौशल्यविकास

10/03/2026

🎯 जिद्द, चिकाटी आणि 'सारथी'ची साथ! 🎯

भारतीय प्रशासकीय सेवा (UPSC CSE) २०२५-२६ च्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घेऊन या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.

आपल्या या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आपल्या पुढील वाटचालीस 'सारथी' परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा! 💐

26/02/2026

Pune’s Biggest Business International Expo Is Here — And Everyone’s Invited! Bring Your Friends & Family And Experience Business Festival In Town!

🗓️ 27, 28 February & 1 March 2026
📍 Agriculture Ground, Sinchan Nagar, Pune

Register FREE For MEA Business Expo : https://registerexpo26.mahamea.in/registration

🌐 Website: https://meainternationalexpo.com/

📞 Contact: +91 90110 08238

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Balchitravani, C T Survey 173, Gopal Ganesh Agarkar Road
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 5:30pm
Wednesday 10am - 5:30pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6:15pm
Saturday 10am - 5:30pm