गुन्हेगारीविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध थेट लढा! बाणेर पोलीस स्टेशन ते CP ऑफिसपर्यंतचा हा मोर्चा केवळ एक निषेध नाही, तर ढिम्म प्रशासनाला जागे करण्यासाठी एका तरुणाने पुकारलेला एल्गार आहे. सामान्य माणसाची तक्रार घेतली जात नसेल, तर न्याय मागायचा कुठे? मी गप्प बसणार नाही... माझं पुणे मला वाचवायचं आहे!"
Raviraj Kale
प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी, युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य
02/06/2026
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे जेष्ठ नेते व OBC नेते, मा. सुरेश काका गायकवाड व पक्षाचे पिंपरी चिंचवड मुख्य प्रवक्ता मा. प्रकाश हगवणे साहेब व आपल्या पक्षाचे रिक्षा आघाडी अध्यक्ष मा.अंगत मुंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी व त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
दोन जीव घेतले, दोन संसार उद्ध्वस्त केले... आणि हा कसला निर्लज्ज आनंदोत्सव?! 😡
पुण्यातील कल्याणीनगर अपघातात दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला. मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलण्यासारख्या नीच थरापर्यंत जाऊन जेलची हवा खावी लागली. आणि आज जेलमधून सुटून आल्यावर विशाल अग्रवाल आणि त्यांचे कुटुंब जसं काही खूप मोठं पराक्रमाचं काम केल्यासारखं नाचत आहेत, पार्टी करत आहेत!
अहो अग्रवाल, पैशाच्या जोरावर कायदा आणि जामीन विकत घेता येईलही, पण त्या निष्पाप मुलांच्या आई-वडिलांचे अश्रू आणि त्यांचा तळतळाट कसा विकत घेणार? हा डान्स म्हणजे माणुसकीचा आणि न्यायव्यवस्थेचा क्रूर अपमान आहे. लाज वाटली पाहिजे, लाज! 👎
🚨 पुणे महानगरपालिका बोगस भरती घोटाळा! 🚨
पुणे महानगरपालिकेतील कथित बोगस भरतीमुळे महाराष्ट्रातील शेकडो उच्चशिक्षित तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. हा भ्रष्टाचार अत्यंत गंभीर असून याची व्याप्ती मोठी आहे.
माझे राज्यातील सर्व फसवणूक झालेल्या तरुणांना आवाहन आहे: घाबरू नका, पुढे या! तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. न्याय मिळवण्यासाठी एकत्र येऊया
📞 संपर्क: ९६७३२६८४८५
MaharashtraPolitics YouthVoice
25/05/2026
गाड्या चालवायला खिशात पैसे नाहीत, म्हणून आज थेट बैलगाडी रस्त्यावर आणली! 🚗❌🐂✅
महागाई कमी करण्याऐवजी जनतेलाच 'कमी वापर' करण्याचे सल्ले देणाऱ्या भाजप सरकारच्या नौटंकीविरोधात 'आम आदमी पार्टी'चे तीव्र आंदोलन! नियम आधी नेते आणि अधिकाऱ्यांना लागू करा, मग जनतेला सांगा!
देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई आहे, गगनाला भिडणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे आणि तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत! पण आपले पंतप्रधान देशातल्या समस्या वाऱ्यावर सोडून परदेशात 'Melodi' सोबत मेलोडी खाण्यात आणि रील बनवण्यात व्यस्त आहेत.
17/05/2026
"हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक होणे गरजेचे आहे."
#बोगस_भरती
15/05/2026
पुणे महानगरपालिकेतील कथित 'बोगस भरती' आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्या साठी सामान्य पार्टी युवा आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली.
#बोगस
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Telephone
Website
Address
Pune
