Jagdish Mulik

Jagdish Mulik

Share

Ex President - BJP Pune City
Ex-MLA Wadgoansheri

Photos from Jagdish Mulik's post 01/06/2026

वाढदिवस कार्यक्रमांस उपस्थिती!

📍वडगावशेरी

वडगावशेरी परिसरातील विविध सहकारी व पदाधिकाऱ्यांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम नगरसेवक योगेश मुळीक यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. तसेच नगरसेविका श्वेता मुकुंद गलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

यावेळी उपस्थित सर्वांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

#वडगावशेरी #वाढदिवस #शुभेच्छा #जनसंपर्क

01/06/2026

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, आई!

माणूस कितीही मोठा झाला, कितीही जबाबदाऱ्या सांभाळू लागला तरी त्याच्या आयुष्याचा सर्वात भक्कम आधार म्हणजे आईच असते. प्रेम, त्याग, संस्कार आणि निस्वार्थ मायेचा अखंड झरा म्हणजे आई.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तुझे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद राहिली आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजाप्रती संवेदनशीलता, माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठा जपण्याचे बळही तुझ्याकडूनच मिळाले.

ईश्वरचरणी प्रार्थना की, तुला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो. तुझे आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहोत.

31/05/2026

देवाभाऊ… 🔥🔥🔥

31/05/2026

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी लाईव्ह | मन की बात | १३४वा भाग

31/05/2026

कुशल प्रशासक, महान समाजसुधारक, न्यायप्रिय आणि आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

रस्ते, विहिरी, घाट आणि धर्मशाळांची उभारणी करून लोकमाता अहिल्यादेवींनी जनसामान्यांचे जीवन अधिक सुसह्य आणि समृद्ध केले. त्यांनी न्यायनिष्ठ, लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाचा भक्कम पाया रचला. त्यांची दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यांमुळे प्रजेच्या कल्याणाला नवी दिशा मिळाली. त्यांचा कुशल राज्यकारभार आजही प्रत्येक राज्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतो. रयतेची प्रगती, लोककल्याण आणि संस्कृतीचे जतन हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय होते.

#अहिल्यादेवी_होळकर #पुण्यश्लोक

29/05/2026

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटल्यानंतर जल्लोष करतानाचा व्हिडिओ समोर आला. या संवेदनशील प्रकरणाबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया!

28/05/2026

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील माझी भूमिका स्पष्ट केली.

28/05/2026

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचा पार्टी साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला. याबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया!

28/05/2026

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या पार्टीबद्दल मांडलेली भूमिका....

28/05/2026

स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता यज्ञकुंड, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त शतशः नमन!

अंदमानच्या काळकोठडीत अमानवीय छळ सहन करतानाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातील राष्ट्रभक्तीची ज्योत क्षणभरही मंदावली नाही. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित केला. त्यांच्या त्याग, धैर्य आणि प्रखर राष्ट्रनिष्ठेने भारतीयांच्या मनात स्वाभिमानाची जाज्वल्य प्रेरणा निर्माण केली.

#स्वातंत्र्यवीर_सावरकर #विनायक_दामोदर_सावरकर #स्वातंत्र्यवीर

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Trimbakeshwar Society, Mulik Nagar, Wadgoan Sheri, Adjacent To Kalyani Nagar
Pune
411014