पुस्तकांचं गाव, भिलार

पुस्तकांचं गाव, भिलार

Share

भारतातील पहिलं आगळंवेगळं 'पुस्तकांचं गाव'!

Photos from पुस्तकांचं गाव, भिलार's post 05/03/2026

अभिजात मराठी भाषा गौरव दिन
दि. २७ फेब्रुवारी हा कविवर्य वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तकांचं गाव, भिलार येथे प्रकल्प कार्यालयाच्या वतीने अभिजात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी ‘यशदा’ च्या ४४ वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अधिकारी व सत्र-संचालिका श्रीमती स्वाती कुलकर्णी यांनी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पास भेट दिली. अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे काव्यवाचन केले. १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करुन मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. योगायोगाने यशदाचे उप-महासंचालक मा.श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से) यांनी पुस्तकांचं गाव, प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पाचा माहितीपट पाहून प्रकल्पातील निवडक दालनांना भेट दिल्या. कवितेचे सादरीकरण केलेल्या डॉक्टरांना यशदाचे उप-महासंचालक मा. श्री. जोशी सरांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन केले. त्यानंतर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयापासुन जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत पदयात्रा काढली. यशदाचे उप-महासंचालक मा. श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से) यांनी केंद्रशाळेमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

Photos from पुस्तकांचं गाव, भिलार's post 23/04/2025

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल.

जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

04/05/2024

देशात आणि महाराष्ट्रात वाचन चळवळीची जोपासना व वाचन संस्कृती संवर्धन करणारा हा अभिनव प्रकल्प म्हणजेच भारतातील पहिले पुस्तकांचं गाव, भिलार.
निसर्गरम्य विविधतेने नटलेल्या महाबळेश्वर जवळील थंड हवेच्या ठिकाणी वसलेला, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था यांचा पुस्तकांचं गाव, भिलार या प्रकल्पाने ७ वर्ष पूर्ण केली आहेत.

दि. ४ मे, २०१७ रोजी सुरु झालेला, लाखो वाचक/ पर्यटक, हजारो वाचन कट्टे /वाचक गट, अनेक मान्यवर यांनी नावाजलेला पुस्तकांचं गाव, भिलार हा प्रकल्प आज आपला ७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. दि. ४ मे, २०१७ रोजी लावलेले वाचनसंस्कृतीचे रोपटे रोपटे आता फुलू लागले आहे, बहरू लागले आहे.

महाबळेश्वरला जाणारा वाचक इथे आल्यावर संत नामदेवांच्या अभंगानुसार
।। प्रेमपिसे भरले अंगी, गीतेछंदे नाचो रंगी।।
अशी त्याची अवस्था होते. पुस्तकांनी तो वेडा होतो, काहीतरी गवसले या आनंदाने अंतर्मनात नाचू लागतो आणि पुन्हा पुन्हा येण्याची ओढ निर्माण होते.

आपण सर्व वाचक-पर्यटकांच्या भरभरुन प्रतिसादामुळे आज वाचन संस्कृती संवर्धन करणारे पुस्तकांचं गाव, भिलार ८व्या वर्षात यशस्वीरीत्या पदार्पण करीत आहे.

आपणा सर्वांना संचालक, राज्य मराठी विकास संस्था, आणि प्रकल्प कार्यालयाकडून मनापासून शुभेच्छा!
प्रकल्पास पुन्हा पुन्हा नक्की भेट द्या!
पुस्तकं तुमची वाट पाहत आहेत.

Photos from पुस्तकांचं गाव, भिलार's post 23/04/2024

मा. श्री. विकास खारगे, भा. प्र. से. प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य यांची दि. १८ एप्रिल, २०२४ रोजी पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पास भेट.

दि. १८ एप्रिल, २०२४ रोजी मा. श्री. विकास खारगे, प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय यांनी सातारा जिल्ह्यास भेट दिली. या दरम्यान मा. प्रधान सचिव यांनी पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पास व प्रकल्प कार्यालयास भेट दिली. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक, डॉ. शामकांत देवरे यांनी मा. प्रधान सचिव यांचे राज्य मराठी विकास संस्थेची प्रकाशने व प्रकल्पाचे बोधचिन्ह असलेले मग भेट देऊन यथोचित स्वागत केले. मा. प्रधान सचिव यांनी प्रकल्प कार्यालयातील व्यवस्थेविषचा सविस्तर आढावा घेतला. पुस्तकांची दालने, पुस्तकांची संख्या, दालन चालकांविषयी व वाचक पर्यटकांविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

मा. प्रधान सचिव यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या दालनास भेट देऊन दालनातील पुस्तके पाहून समाधान व्यक्त केले आणि पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. दालन चालक व त्यांचे कुटुंब यांच्याशी चर्चा केली. निसर्ग पर्यटन आणि पर्यावरण या दालनाचे दालन चालक श्री. मोरे व त्याचे कुटूंब यांच्याशी प्रकल्पाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच, पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पाविषयी समाधान व्यक्त केले.

या वेळी डॉ. शामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था, सहसचिव वनविभाग श्रीमती अदिती भारद्वाज आणि श्रीमती. तेजस्विनी पाटील, तहसीलदार महाबळेश्वर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

23/04/2024

२३ एप्रिल,
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

Photos from पुस्तकांचं गाव, भिलार's post 13/03/2024

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचं गाव, भिलार येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा. श्रीहनुमान मंदीर सभागृह येथे अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा संगीत, अभिनय आणि नाट्यविष्कार असलेला ‘मधुरव’ बोरु ते ब्लॉग हा कार्यक्रम घेण्यात आला.


मराठी भाषेचा २००० वर्षांचा इतिहास, साहित्यातील आजवर न मांडले गेलेले अनोखे पैलू नाट्य, नृत्य, संगीत या माध्यमातून रंगमंचीय अविष्कारातून सादर केले गेले. साहित्य-माहिती-भाषा आणि मनोरंजन याची योग्य सांगड घातलेला स्फूर्तीदायक कार्यक्रम श्रीमती मधुरा वेलणकर-साटम, जुई भागवत, आशिष गाडे, सुरभी ढमाळ या कलाकारांनी सुंदर पद्धतीने सादर केला.

या प्रसंगी भिलार गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, प्रकल्पातील सहभागी दालनचालक तसेच गावातील जेष्ठ नागरीक आणि पंचक्रोशीतील एकूण २५० ते ३०० रसिक श्रोते कार्यक्रमास उपस्थित होते.

Photos from पुस्तकांचं गाव, भिलार's post 28/02/2024

पुस्तकांच्या गावात ‘मधुरव’ बोरु ते ब्लॉग

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचा २००० वर्षांचा इतिहास सांगणारा
संगीत – अभिनय – नाट्यविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम

दि. २७ फेब्रुवारी, हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने यावर्षी दि. २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ५ वा. पुस्तकांचं गाव, भिलार येथील श्रीहनुमान मंदिर येथे राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ‘मधुरव’ बोरु ते ब्लॉग, मराठी भाषेचा २००० वर्षांचा इतिहास सांगणारा संगीत – अभिनय – नाट्यविष्कार सादर होत आहे.

‘मधुरव’ बोरु ते ब्लॉग हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. साहित्य - माहिती - भाषा आणि मनोरंजन यांची योग्य सांगड घातलेला प्रबोधन व मनोरंजन देणारा कार्यक्रम आहे. निर्मिती : अभिजित साटम व अभिनेत्री मधुरा वेलणकर यांची असुन मधुरा वेलणकर-साटम, जुई भागवत, आशिष गाडे इ. कलाकार आहेत.

निसर्गरम्य गाव, नीरव शांतता आणि सुमारे ३५,००० पुस्तकांची सोबत अशा अनोख्या वातावरणात मायमराठीच्या लेखनप्रवासाचा वेध घेणाऱ्या या कार्यक्रमाला भिलार, पाचगणी, महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे व नजीकच्या सर्व परिसरांतील रसिकांनी अवश्य यावे.

Photos from पुस्तकांचं गाव, भिलार's post 22/10/2023

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त (१४ जानेवारी ते २८ जानेवारी) आयोजित महाबळेश्वर तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आली. ही स्पर्धा ४ गटांमध्ये (३ री व ४ थी – प्राथमिक गट, ५ वी ते ७ वी – उच्चप्राथमिक गट, ८ वी ते १० वी - माध्यमिक गट, ११ वी व १२ – उच्चमाध्यमिक) घेण्यात आली होती.

निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रत्येक गटांमधून प्रथम, द्वित्तीय, तृतीय असे तीन विजेते काढण्यात आले.

प्रथम विजेत्यास १,५००/- रु. रोख स्वरुपात व १,५००/- रु. पुस्तक स्वरुपात तसेच, स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

द्वित्तीय विजेत्यास १,०००/- रु. रोख स्वरुपात व १,०००/- रु. पुस्तक स्वरुपात तसेच, स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

तृतीय विजेत्यास ५००/- रु. रोख स्वरुपात व ५००/- रु. पुस्तक स्वरुपात तसेच, स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे

प्राथमिक गट (इ. ३ री व ४ थी)
प्रथम क्रमांक – आयुष पुरुषोत्तम माने, जिल्हा परिषद केंद्र शाळा , भिलार
द्वितीय – आरोही संजय कात्रट, नवेनगर, कुंभरोशी
तृतीय – सायरी राजेंद्र डावले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुरेघर

उच्च प्राथमिक गट (इ. ५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक – सुहानी अंगद करपे, जिल्हा परिषद केंद्र शाळा, भिलार
द्वितीय क्रमांक - आदीती रुपेश कळंबे, नगरपरिषद शाळा क्रमांक – २ पाचगणी
तृतीय क्रमांक – दिशा संतोष ढेबे, सेठ गंगाधर माखरिया हायस्कुल, महाबळेश्वर

माध्यमिक गट (इ. ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक – सायली संतोष काळे, हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार
द्वितीय क्रमांक – अथर्व प्रवीण हिरवे, चेतन दत्ताजी गायकवाड, मेटगुताड
तृतीय क्रमांक - तेजल भाऊ पिंगळे, एम. आर. भिलारे हायस्कुल, राजपुरी

उच्च माध्यमिक गट (इयत्ता १० वी ते १२ वी)
प्रथम क्रमांक – श्रेया अशोक पारठे, कांताबेन मेहता कॉलेज , पांचगणी
द्वितीय क्रमांक – प्रतीक लक्ष्मण धामुणसे, कांतबेन मेहता कॉलेज, पाचगणी
तृतीय क्रमांक – आदीत्य दीपक शिंदे, अंजुमन खैरुल इस्लाम, महाबळेश्वर

वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांची नावे
प्राथमिक गट (इयत्ता ३ री ४ थी)
प्रथम क्रमांक – आयुष पुरुषोत्तम माने, जिल्हा परिषद केंद्र शाळा, भिलार
द्वितीय क्रमांक – मीत विजय जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली
तृतीय क्रमांक – श्री गणेश कात्रट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवेनगर, कुंभरोशी

उच्चप्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक – गौरी रविंद्र बनकर, सेठ गंगाधर माखरीया हायस्कुल, महाबळेश्वर
द्वितीय क्रमांक – वैष्णवी लक्ष्मण आमराळे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – राजपुरी
तृतीय क्रमांक – सार्थक गणेश ढेबे, हिलरेंज माध्यमिक हायस्कुल, भिलार.

माध्यमिक गट ( इयत्ता ८वी ते १० वी )
प्रथम क्रमांक – वैभवी दत्तात्रय धनावडे, हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार
द्वितीय क्रमांक – अमृता प्रकाश खंडागळे, हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार
तृतीय क्रमांक – समीक्षा चिंतामणी राजपुरे, एम. आर. भिलारे हायस्कुल, राजपुरी

उच्चमाध्यमिक (इयत्ता १० वी ते १२ वी)
प्रथम क्रमांक – आदीत्य दीपक शिंदे, अंजुमन खैरुल इस्लाम, महाबळेश्वर

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व गावातील मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

Photos from पुस्तकांचं गाव, भिलार's post 22/10/2023

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने पुस्तकांचं गाव, भिलार येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त दिनांक १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ‘वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमास मा. श्री. डॉ. श्रीधर (राजा) दीक्षित, अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ आणि मा. श्री. एकनाथ आव्हाड, बालसाहित्यिक २०२३ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त या प्रमुख वक्त्यांनी कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मा. दीक्षित सरांनी “वाचनाने माणसाच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होतो ” असे मत व्यक्त केले. तसेच, मा. श्री. एकनाथ आव्हाड यांनी “वाचनाने माणूस जोडला जातो, माणसांना जोडण्याचे काम पुस्तक करते.”असे मौलिक विचार आपल्या व्याख्यानातून प्रकट केले.

श्रीहनुमान मंदीर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. या व्याख्यानाच्या कार्यक्रमास भिलार पंचक्रोशीतील शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांनी, गावातील ज्येष्ठ गावकऱ्यांनी या व्याख्यानाच्या कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली.

14/10/2023

१५ ऑक्टोबर, वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांच्या गावात ‘व्याख्यान’
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, दि. १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी पुस्तकांच्या गावी, भिलार येथे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे योजण्यात करण्यात आले आहे. मा.श्री. श्रीधर (राजा) दीक्षित- अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ व ‘छंद देई आनंद’ या बालकवितासंग्रहाला २०२३चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला असे बालसाहित्यकार मा. श्री. एकनाथ आव्हाड यांचे वाचन संस्कृती विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच महाबळेश्वर तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंधस्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या वाचनसंस्कृती विषयक व्याख्यानाच्या कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

Photos from Governor of Maharashtra's post 23/05/2023
Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


पुस्तकांचं गाव , पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीच्या पुढे ३ कि. मी
Pune
412805