08/04/2026
नमस्कार शेतकरी मित्रांनो🌱
खरीप हंगाम लवकरच सुरू होईल. पेरणीपूर्व तयारीबद्दल आपण मागील शेतीशाळेत माहिती घेतलीच आहे.
परंतु हंगाम सुरू झाल्यानंतर निविष्ठा साठी धावपळ करावी लागते किंवा ऐनवेळी मिळत नाहीत. तर अशावेळी *घरच्या घरी आपण जैविक निविष्ठा कशा तयार करू शकतो?* ते या शेतीशाळेत पाहणार आहोत..
आनंदाची गोष्ट म्हणजे, पानी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक विशेष डिजिटल शेतीशाळा आयोजित केली आहे. ही संधी नक्कीच सोडू नका!
☘️*‘जैविक / नैसर्गिक निविष्ठा उत्पादन'*☘️
🗓️दिनांक: ८ एप्रिल २०२६, बुधवार
🕢वेळ: सायं. ७:३० वा.
🔗 Zoom लिंक: https://cutt.ly/shetishala1
Meeting ID: 854 9891 7541
Passcode: 249237
📺 खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता
1) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf
2) कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JK-ciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu
3) पानी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH
आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की जॉईन करा....!
*यंदा जैविक / नैसर्गिक निविष्ठा घरच्या घरीच तयार करा…!* 🌾
Join our Cloud HD Video Meeting
Zoom is the leader in modern enterprise cloud communications.
30/03/2026
Agriculture MoU: महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ‘अफार्म’शी सामंजस्य करार
MPKV signs MoU with AFARM : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील ‘अफार्म’ संस्था यांच्यात नुकताच सामंजस्य क.....
26/03/2026
🏵️🌿‘अफार्म’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यात ग्रामीण उपजीविका आणि कृषी तंत्रज्ञान प्रसार बद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षरी 🌼🌱
🥳 महाराष्ट्रातील ग्रामीण विकास क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अध्यायाची सुरुवात🥰
---
अफार्म, पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी शाश्वत ग्रामीण उपजीविका आणि हवामान-अनुकूल कृषी तंत्रज्ञानावरील सहकार्य अधिक दृढ व व्यापक करण्यासाठी औपचारिकपणे सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे.
२३ मार्च २०२६ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि ‘अफार्म’चे अध्यक्ष डॉ. व्यंकट मायंदे यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या धोरणात्मक भागीदारीचा व्यापक उद्देश हा सातत्याने बदलत्या हवामान परिस्थितीत ग्रामीण उपजीविकेतील उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, क्षेत्रीय अंमलबजावणी आणि ज्ञान-प्रसार यांचे एकत्रीकरण करणे हा आहे.
या सामंजस्य करारामध्ये संशोधन, विस्तार, प्रशिक्षण आणि ज्ञान आदान-प्रदान या क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबद्दल विशेष आराखडा असेल. त्यामुळे वैज्ञानिक नवकल्पना ग्रामीण समुदायांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकतील. महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका शिखर परिषद २०२६ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अफार्म यांच्यात सुरू झालेल्या सहकार्यानंतर झालेला हा सामंजस्य करार या क्षेत्रात काम करण्यासाठी निश्चितच पथदर्शक असेल. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी असून या मार्फत संयुक्त पथदर्शी उपक्रम व क्षेत्रीय चाचण्या आणि व्यापक प्रसारासाठी मॉडेल्सचा विकास अपेक्षित आहे.
या सामंजस्य कराराद्वारे आखल्या गेलेल्या आराखड्याबद्दल बोलताना ‘अफार्म’चे अध्यक्ष डॉ. व्यंकट मायंदे म्हणाले, “या सामंजस्य करारामध्ये संशोधन, विस्तार, प्रशिक्षण आणि ज्ञान आदान-प्रदान या सर्व विषयांबद्दल केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तरतूद आहे. यामुळे वैज्ञानिक नवकल्पना ग्रामीण समुदायांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील. तसेच संयुक्त पथदर्शी उपक्रम आणि क्षेत्रीय चाचण्या, व्यापक प्रसारासाठी मॉडेल्सचा विकास आणि AFARM च्या ग्रामीण उपजीविका शिखर परिषद २०२६ नंतरच्या कृती कार्यक्रमाद्वारे सर्वांचा निरंतर सहभाग वाढवण्यासाठी दीर्घकालीन सहकार्यासाठी एक व्यवस्था विकसित होईल असा विश्वास वाटतो.”
कृषी विद्यापीठासारखी शैक्षणिक संस्था आणि ‘अफार्म’ सारखी राज्यभर काम करणारी ‘अफार्म’ संस्था यांच्यातील घनिष्ठ सहकार्यावर कार्यकारी संचालक श्री. सुभाष तांबोळी म्हणाले, “ही भागीदारी महाराष्ट्रातील ग्रामीण उपजीविका बळकट करण्यासाठी विविध हितसंबंधी घटक-संस्था यांच्यात सहकार्याची भावना रुजवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईल. कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि अफार्मच्या नेटवर्कच्या क्षेत्रीय अनुभवाशी सांगड घालून, ग्रामीण समुदायांसाठी प्रभावी, विस्तारक्षम आणि हवामान-अनुकूल उपजीविकेचे उपाय तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट ‘अफार्म’च्या ज्ञान-संशोधन विस्तार बद्दलच्या कामाला आदर्श जोड देणारे आहे. तसेच यातून संशोधन संस्था तळागाळातील विकास कार्य करण्यात अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करू शकतील असा विश्वास वाटतो.”
अफार्म आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातील सहकार्यातून खालील मुद्द्यांवर संयुक्तपणे ज्ञानप्रसार तसेच मार्गदर्शनपर काम होईल:
हवामान-अनुकूल आणि शाश्वत कृषी पद्धतींचा विकास आणि प्रसार
🟣विशिष्ट ठिकाण आणि पिकासाठी आवश्यक असणाऱ्या हवामानावर आधारित कृषी-सल्ला मार्गदर्शन सेवा
🟣अचूक निर्णयासाठी परिस्थिती सदृश्य हवामान अनुकूल सुधारित पीक-आराखडा निर्मिती
🟣 नाविन्यपूर्ण उपजीविका मॉडेलचे संयुक्तपणे कृती-संशोधन आणि क्षेत्रीय पडताळणी
🟣 शेतकरी आणि हितधारकांची अनुकूलन क्षमता वाढवण्यासाठी क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण
🟣 कृषी-वैज्ञानिक संस्था आणि तळागाळातील तंत्रज्ञ व कृषी प्रसारक यांचा संबंध दृढ करणे.
महाराष्ट्रातील ग्रामीण उपजीविका क्षेत्र सक्षम करण्यासाठी यातील विविध हितसंबंधी गटांमध्ये सहकार्य सदृढ करण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या ‘अफार्म’च्या वाटचालीतील हे महत्त्वाचे पाऊल आहे. कृषी विद्यापीठात असलेले अत्याधुनिक ज्ञान व शैक्षणिक जाण तसेच अफार्म च्या राज्यभर असलेल्या व्यापक संस्था-व्यक्ती यांच्या संपर्कक्षेत्रात असलेल्या अनुभवाशी सांगड घालून ग्रामीण समुदायांसाठी प्रभावी, विस्तारक्षम आणि हवामान बदलांना तोंड देऊ शकणारे उपजीविका संबंधित उपाययोजना तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
यातून संशोधन संस्था आणि तळागाळातील विकासकाम करणाऱ्या व्यक्ती-संस्था यांच्यात अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अफार्मची वाटचाल पुढे चालू राहणार आहे.
25/03/2026
सीताफळ महासंघाच्या २० व्या परिषदेत अफार्म चे अध्यक्ष डॉ. व्यंकटराव मायंदे यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख !
परिषदेत पुरंदर तालुक्यातील सीताफळ बागायत शेतकऱ्याला मरणोत्तर पुरस्कार
---
अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ (सीताफळ महासंघ) यांनी आयोजित केलेल्या २० वी राज्यस्तरीय सीताफळ परिषद कृषी महाविद्यालय येथे शनिवार २१ मार्च २०२६ रोजी पार पडली. यावेळी राज्यभरातील सुमारे १०० पेक्षा अधिक सीताफळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात महासंघ निर्मित “शाश्वत उत्पन्नासाठी सीताफळ” या पुस्तकाचे तर राहुरी कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प (ता. पुरंदर) तर्फे निर्मित “सीताफळ कीड व रोग व्यवस्थापन” या आठ पानी माहितीपत्रकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. विजय कोलते यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमात पुरंदर तालुक्यातील दिवे येथील प्रगतीशील शेतकरी श्री. विजय (आबा) कोंडाळकर यांना सीताफळ बागायती क्षेत्रातील संशोधन व विकास कामासाठी मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात आले. जानेवारी २०२५ मध्येच दिवे येथे त्यांचे त्यांच्या राहत्या घरासमोरील राज्य महामार्गावर अपघाताने निधन झाले होते. त्यांच्या वतीने मुलगा रवींद्र कोंडाळकर यांनी पुरस्कार स्विकारला.
सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी आणि महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सीताफळ बागायती क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दशकांपासून होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. मागील काही वर्षांत २७ हजार हेक्टर वरून एक लाख हेक्टर पर्यंत हे क्षेत्र वाढले आहे याची विशेष नोंद घेतली गेली. पुरंदर भागातील सीताफळ शेतीचे वैशिष्ट्य गट्टाणी यांनी सांगितले. सासवड मधील बाजारात व्यापाऱ्यापेक्षा शेतकरीच आपल्या मालाचा भाव (कमिशन शिवाय) ठरवतात ही पद्धत सगळीकडे राबवायला हवी यावर त्यांनी जोर दिला. श्री. गट्टाणी आणि डॉ. खर्चे या दोघांनी सीताफळ पल्प व्यवसाय वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजार जोडणीसाठी अधिकाधिक प्रयत्नांची गरज यावेळी व्यक्त केली. या विषयावर अधिकाधिक काम व्हायला हवे असा एकूण चर्चेचा सूर होता.
या चर्चेच्या अनुषंगाने दोघांनीही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील Post Harvest Technology Dept आणि डॉ. व्यंकटराव मायंदे यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विशेषतः सीताफळ गर व बीज निष्कासन यंत्र बद्दल ही चर्चा होती. या प्रकारचे अल्प-खर्चिक तंत्रज्ञान कोरडवाहू शेतीसाठी अधिकाधिक प्रमाणात विकसित, प्रसारित झाल्यास कोरडवाहू भागात संपन्नता येण्याच्या दृष्टीने निश्चित पावले पडू शकतील अशी सकारात्मक सूचना पुढे आली. या यंत्राबद्दल अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे : https://www.youtube.com/watch?v=cldwvqL4HBU
(वृत्तांत: राहुल माने, AFARM)
24/03/2026
Maharashtra DGIPR च्या सौजन्याने : World TB Day निमित्त आवाहन !
भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त “टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम” २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार असून, महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यातील सर्व जिल्हे व शहरी भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत एआय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नि-क्षय पोर्टलवरील एआय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व रूट मॅपिंग करण्यात आले असून, वृद्ध, मधुमेही, कुपोषित, पीएलएचआयव्ही, क्षयरुग्णांचे संपर्क, स्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १००% तपासणी सुनिश्चित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हाताने वापरता येणारे क्ष-किरण यंत्रणांद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ एनएएटी चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये नि-क्षय मोबाईल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येतील.
या मोहिमेत आयुष्मान आरोग्य शिबिरांद्वारे क्षयरोगासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, अॅनिमिया व कुपोषण यांसारख्या आजारांची एकत्रित तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विविध विभागांचा समन्वय साधत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, स्वयं सहाय्यता गट, माय भारत स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार असून, नि-क्षय मित्र उपक्रमाद्वारे रुग्णांना पोषण व मानसिक आधार दिला जाणार आहे.
#क्षयरोग
भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त “टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम” २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार असून, महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम राज्यातील सर्व जिल्हे व शहरी भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत एआय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नि-क्षय पोर्टलवरील एआय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व रूट मॅपिंग करण्यात आले असून, वृद्ध, मधुमेही, कुपोषित, पीएलएचआयव्ही, क्षयरुग्णांचे संपर्क, स्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १००% तपासणी सुनिश्चित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हाताने वापरता येणारे क्ष-किरण यंत्रणांद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ एनएएटी चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये नि-क्षय मोबाईल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येतील.
या मोहिमेत आयुष्मान आरोग्य शिबिरांद्वारे क्षयरोगासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, अॅनिमिया व कुपोषण यांसारख्या आजारांची एकत्रित तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विविध विभागांचा समन्वय साधत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, स्वयं सहाय्यता गट, माय भारत स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार असून, नि-क्षय मित्र उपक्रमाद्वारे रुग्णांना पोषण व मानसिक आधार दिला जाणार आहे.
24/03/2026
"स्टार्स फोरम" चे अध्यक्ष श्री. चैतन्य नाडकर्णी यांचे महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषद २०२६ मधील सादरीकरण
विषय : कौशल्य विकास आणि रोजगार वृद्धी बद्दलची भोवतालची परिसंस्था !
Link: https://youtu.be/Ln64JvCFMkc?si=ndht_Lcgf5b-Xqnx
Shri Chaitanya Nadkarny, Chairman, STARS Forum
He is leading figure in a non-profit network of organizations focussed on skills training, vocational education, appropriate technology and entrepreneurship ...
23/03/2026
कृषी विकास व प्रशिक्षण संस्था चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमित नाफडे यांचे महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषद मधील सादरीकरण -
विषय : कृषी उत्पादनावर आधारित उपजीविका मॉडेल ->
Link : https://youtu.be/afJUr_JxJnw?si=kJRmbfTe9tvWo6hk
Shri Amit Naphade, Chief Executive Officer of Krushi Vikas
He is a social entrepreneur and CEO of Krushi Vikas, with over two decades of experience in advancing sustainable livelihoods, climate-resilient agriculture,...
21/03/2026
प्रगती अभियान च्या श्रीमती आश्विनी कुलकर्णी यांचे ग्रामीण उपजीविका परिषद मधील सादरीकरण
विषय: ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उपजीविका संसाधने
Link : https://youtu.be/HOhY2YetfMw?si=p6QgNTUg2gbkgs04
Smt Ashwini Kulkarni, Pragati Abhiyan, a Civil Society Organisation
She is founder of Pragati Abhiyan and has extensively worked on MGNREGA, working with the Community, working with Government at all levels from local adminis...
20/03/2026
'द गोट ट्रस्ट' चे संस्थापक संचालक डॉ. संजीव कुमार यांचे महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषद, पुणे मधील भाषण !
https://youtu.be/ntEVo8wphUk?si=4l66oCHhwt8_CwJO
Dr Sanjeev Kumar, Founder Director, Goat Trust
He is a nationally and internationally recognized expert in livestock-based livelihoods, with over 28 years of experience in small ruminant development, valu...
18/03/2026
Join BAIF's online training on 𝗥𝘂𝗿𝗮𝗹 𝗗𝗲𝘃𝗲𝗹𝗼𝗽𝗺𝗲𝗻𝘁 𝘁𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝗖𝗼𝗻𝘃𝗲𝗿𝗴𝗲𝗻𝗰𝗲: 𝗟𝗲𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗶𝗻𝗴 𝗚𝗼𝘃𝗲𝗿𝗻𝗺𝗲𝗻𝘁 𝗦𝗰𝗵𝗲𝗺𝗲𝘀 𝗳𝗼𝗿 𝗔𝗰𝗰𝗲𝗹𝗲𝗿𝗮𝘁𝗲𝗱 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁
17/03/2026
"दिल है छोटा सा, छोटी सी आशा... ! "
अफार्म तर्फे संचालित आणि FINASTRA – CSR यांच्या डिजिटल वित्तीय समावेशन कार्यक्रम अंतर्गत ‘डिजिटल सखी अनुभव कथन कार्यशाळा’ सेवाग्राम, वर्धा येथे पार पडला. यावेळी श्री. शांताराम साकोरे, संचालक (कृषी), श्री. किशोर चौधरी, (सचिव, विचार विकास सामाजिक संस्था, वरोरा), श्री. गणेश रितपुरे (MIS समन्वयक,अफार्म), श्रीमती.कल्पना मोरे, (संचालक, विचार विकास सामाजिक संस्था, पुलगाव) यांनी यावेळी सर्व डिजिटल सखीना मार्गदर्शन केले. श्री. राहुल पडोळे, (कार्यक्रम समन्वयक, अफार्म) यांनी प्रास्तविक केले.
आर्वी, राळेगाव, देवळी, बाभूळगाव, कळंब या भागातील डिजिटल सखींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी ‘सेवा केंद्र MPR आणि Reporting सुधारणा’ या विषयावर श्री. गणेश रितपुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या डिजिटल सखींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील जयश्री येरमे (मुबारकपूर), नूतन अतकरी (घारफळ), श्रद्धा कन्नाके (सरूळ), सुवर्णा कोल्हे (वरुड), पुष्पा चिकटे (गोंधळी), यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निकिता शेंडे (तिरसडा), निर्मला सिडाम (पिंपळगाव), शिल्पा सावसाकडे (निंभोरा ), वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वैशाली तुरके (विरूळ), पूनम अजमिरे (रोहणा), सेजल गेटमे (वडाळा) यांचा समावेश होता.
यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील १३, आर्वी क्लस्टर मधील ७, देवळी क्लस्टर मधील ११, बाभूळगाव क्लस्टर मधील ६, कळंब क्लस्टर मधील ८ डिजिटल सखींनी सहभाग घेतला. कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील जयश्री येरमे (मुबारकपूर), श्रद्धा कन्नाके (सरूळ), यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निकिता शेंडे (तिरझडा ), प्रियंका बोंदाडे (मेंढळा), वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सेजल गेडमे (वडाळा), पूनम अजमिरे (रोहणा), वैशाली तुरके (विरूळ), यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील प्रियंका वाकुलवार(श्रीरामपूर), आश्विनी कांबळे (आष्टा), वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील प्रतिभा जाधव (घोडेगाव) या डिजिटल सखींनी आपल्या कामातील अनुभव कथन केले.
#डिजिटलसखी
17/03/2026
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्त जाणून घेऊ या महिला शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर काम करणाऱ्या श्रीमती नसीम शेख, स्वयम शिक्षण प्रयोग संस्था यांच्या भाषणातून त्यांच्या कामाबद्दल ....
अफार्म तर्फे आयोजित महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषद २०२६ मध्ये त्यांनी हे सादरीकरण केले होते.
Link : https://youtu.be/Y7FDgYQKgUU?si=ajFPoZie526o8x4B
Smt Naseem Shaikh, CEO, Swayam Shikshan Prayog (SSP)
Smt. Naseema Shaikh is a nationally and globally recognized leader in women-led rural development. With over two decades of experience, she has been at the f...