Vadgaon Sheri Assembly Constituency

Vadgaon Sheri Assembly Constituency

Share

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
Vadgaon Sheri Assembly

16/02/2024

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व विकासकामांचा तपशील लवकरच आपण सादर करणार आहोत तुम्हाला काही माहिती द्यायची असल्यास कृपया मेसेज करावा.

Jagdish Mulik Sunil Tingre Suhas Tingre Yogesh Mulik

04/02/2017

या उमेदवारांचे अर्ज बाद झाले
वडगावशेरी मतदार संघातील मनसे चे प्रभाग तीन चे उमेदवार प्रमिला अच्युतराव मोळावडे, पाच चे उमेदवार रंजना शिनलकर, दोन चे उमेदवार राजकुमार ढाकणे, सहाचे उमेदवार अर्चना माछरेकर, काँग्रेस च्या प्रभाग पाच मधील उमेदवार सुनीता भोसले यांचे उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद झाले.
याच बरोबर प्रभाग क्र. 1 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चेतन चव्हाण, प्रभाग क्र. 2 चे उमेदवार नगरसेविका सुनंदा देवकर, योगिता शिर्के या शिवसेनेच्या तीन उमेदवारांचा अर्ज बाद झाला. कुणाची अर्जावर सही नाही, एनओसी नाही या कारणावरून अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. प्रभाग 1 मध्ये आघाडीचे उमेदवार कोण ऐश्वर्या जाधव (NCP) कि रेणुका चलवादी (congress) यावरून देखील हरकती घेण्यात आली आहे. त्यामुळे आघाडी मध्ये अधिकृत कोण असणार हे देखील औस्तुक्याचे ठरणार आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी हरकती घेतलेल्या उमेदवारांचा निकाल 8 वाजता देण्यात येईल असे सांगितले. मात्र सूत्रानुसार हे सर्व अर्ज अवैध ठरवण्यात येणार आहेत.

03/02/2017

भाजपा यादी

प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी
अ - अ.जा.महिला आरपीआय --निलेश जठार (महिला)
ब - अ. जा. मारुती सांगाडे
क- ओबीसी महिला - अलका अविनाश खाडे.
ड - अनिल टिंगरे.



प्रभाग क्रमांक २ फुलेनगर-नागपूर चाळ
अ - अ.जा. आरपीआय सिद्धार्थ धेंडे
ब - ओबीसी महिला आरपीआय फरजाना शेख
क ओपन महिला - शीतल सांवत.
ड - ओपन- सुभाष चव्हाण



प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमानाथनगर
अ - अ. जा. राहुल भंडारे
ब - ओबीसी महिला - श्वेता गंगाधर खोसे - गलांडे
क - ओपन महिला - मुक्ता अर्जुन जगताप
ड - ओपन ---- बापूराव कर्णे-गुरुजी



प्रभाग क्रमांक ४ खराडी चंदननगर -
अ- अ.जा. शैलजीत बनसोडे
ब - ओबीसी महिला - बबडाताई पठारे
क - ओपन महिला - सोनल चव्हाण
ड - ओपन सचिन सातपुते.



प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर
अ- ओबीसी महिला सुनीता गलांडे
ब ओपन महिला शीतल शिंदे
क ओपन संदीप जऱ्हाड
ड- ओपन - यौगेश मुळीक.



प्रभाग क्रमांक ६ येरवडा
अ - अ.जा. वैभव पवार
ब - ओबीसी महिला आरपीआय
क - ओपन महिला शिल्पा संतोष राजगुरू
ड - ओपन राजेंद्र एंडल

14/06/2016

२०१७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या वार्डात किंवा प्रभागात कुठला पक्ष विजयी व्हावे असे तुम्हाला वाटते?

18/03/2016

तुम्हाला काय वाटते कोणत्या पद्धतीने व्हावी २०१७ ची नगरसेवकपदाची निवडणूक?

प्रभाग पद्धत कि वार्ड पद्धत

24/11/2014

CM Devendra Fadanvis to be in Pune for two days; to review development of Pune. Hope to Hear Good News for our Constituency...

17/09/2014

प्रिय मतदार बंधू-भगिनींना जाहीर आवाहन !!

लोकसभेच्या निवडणुकीत यादीत नाव असणाऱ्या मतदारांपैकी अनेक मतदारांची नावे यादीतच आली नसल्याच्या अनेक तक्रारी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आल्या होत्या.

17 सप्टेंबर पर्यंत आपल्या मतदान केंद्रात किंवा तलाठी कार्यालयात जावून आपले नाव तपासून घ्या. नवीन नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे वा मतदान कार्ड मिळणे यासाठी सदर केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. तरी आपण जागृत राहून आपली व आपल्या कुटुंबाची नावनोंदणी करावी. आपले मत बहुमुल्य आहे. आपला हक्क हिरावू देऊ नका

कृपया जास्तीत जास्त शेअर करा...

05/09/2014

वडगावशेरी मतदारसंघात उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्याने मनसेत सामील झालेले सुनील टिंगरे मतदारसंघातील विविध गणेशमंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यचा प्रयत्न करीत आहेत.

05/09/2014

Maharashtra election dates likely to be announced post Visarjan;
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा गणपती विसर्जनानंतर जाहीर होणार

05/09/2014

तीन राज्यांत पराभव अटळ!: काँग्रेसची खात्री पटली

लोकसभेतील जबरदस्त पराभवानंतर राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांत होणाऱ्या संभाव्य पराभवाची जणू अधिकृत खात्री करून घेतली आहे. काँग्रेसने घेतलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून तीन राज्यांत पक्षाचा पराभव अटळ असल्याची माहिती पुढे आली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसला एनडीएने अक्षरश: धूळ चारली. तेच वातावरण अद्यापही कायम असल्याने देशांतील चार राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुकांत काँग्रेसच्या हाती फार काही लागणार नाही, असेच चित्र आहे. खुद्द काँग्रेसवाल्यांनाही तसा संशय होता. काँग्रेसने घेतलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून हा संशय पूर्णपणे मिटला आहे. चार राज्यांपैकी महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव होणार असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

काँग्रेसचे सर्वेक्षण म्हणते... महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ७० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत.

02/09/2014

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची २०१४ ची निवडणूक चुरशीची होणार आहे... विविध पक्षामधून इच्छुकांची चडाओढ सुरु झाली आहे... विद्यमान आमदार बापू पठारे मतदारसंघ टिकविण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनील टिंगरे, नारायण गलांडे, जगदीश मुळीक, रघुनाथ कुचिक, अजय भोसले, आप्पा म्हस्के हेही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pune