03/06/2026
*BIS Support for Creation of Testing Facilities in MSME Clusters”*
जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न
Engineering Cluster Pune यांच्या पुढाकाराने व Bureau of Indian Standards यांच्या सहकार्याने आयोजित “BIS Support for Creation of Testing Facilities in MSME Clusters” या जनजागृती कार्यक्रमास उपस्थित राहून आपले विचार मांडण्याची संधी मिळाली, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
या कार्यक्रमातून एमएसएमई क्लस्टर्ससाठी चाचणी (Testing) सुविधा उभारणीसाठी बीआयएसकडून मिळणाऱ्या सहकार्याबाबत सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. गुणवत्तावाढ, मानकीकरण, स्पर्धात्मकता आणि जागतिक बाजारपेठेत एमएसएमई उद्योगांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत आश्वासक आणि दिशादर्शक ठरणार आहे.
अशा प्रकारचे ज्ञानवर्धक आणि भविष्याभिमुख उपक्रम एमएसएमई क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच मोलाचे ठरतील. उद्योग, नवोपक्रम आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचा विश्वास यानिमित्ताने अधिक दृढ झाला आहे.
या उपयुक्त व प्रभावी कार्यक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन..!
03/06/2026
“मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याणाची”
पश्चिम महाराष्ट्र विभाग – संघटनात्मक संपर्क दौरा | विभागीय आढावा बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या ऐतिहासिक कामगिरीची १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, “मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याणाची” या कार्यक्रमांतर्गत पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या संघटनात्मक संपर्क दौऱ्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड व पुणे उत्तर (मावळ) जिल्ह्याची विभागीय आढावा बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली.
‘राष्ट्र प्रथम’ या मूल्याधिष्ठित संकल्पनेतून सातत्याने सेवा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच ‘विकसित भारत’ या ध्येयपूर्तीसाठी सरकार वेगाने पुढे जात आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, या १२ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश (विभाग समन्वयक) आ. निरंजन डावखरे, विभाग सहसंयोजक मा. विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक आ. विक्रम पाचपुते, मा. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, मा. खासदार अमर साबळे, जिल्हा प्रभारी भरत पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष, मा. शत्रुघ्न (बापू) काटे, भाजपा पुणे उत्तर (मावळ) जिल्हा जिल्हाध्यक्ष मा. प्रदीपजी कंद यांनी भूषवले. या विभागीय आढावा बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा आणि जनसंपर्काच्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल चर्चा झाली. विश्वास, विकास आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित मोदी सरकारच्या कार्याचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा दृढ संकल्प या बैठकीतून व्यक्त झाला.
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad BJP Bhosari
03/06/2026
धुळे येथून सुरतकडे जाणारी आणि सुरतहून महाराष्ट्राकडे येणाऱ्या दोन एसटी बसची सुरतजवळ महामागविर समोरासमोर झालेली भीषण धडक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो. तसेच, अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
भावपूर्ण श्रद्धांजली..!
03/06/2026
विकसित भारताचा महामार्ग : दळणवळण क्षेत्रातील ऐतिहासिक परिवर्तन!
देशाच्या प्रगतीचा वेग ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सक्षम आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था. रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, बंदरे आणि जलवाहतूक यांचे मजबूत जाळे हेच आर्थिक विकासाचे खरे इंजिन असते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली आहे.
आज देशभरात आधुनिक एक्सप्रेस-वे, भव्य महामार्ग, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक रेल्वे सेवा, वेगाने विस्तारत असलेली मेट्रो व्यवस्था, नव्या विमानतळांचे जाळे आणि विकसित होत असलेली जलवाहतूक व्यवस्था भारताच्या नव्या सामर्थ्याची साक्ष देत आहेत. हे परिवर्तन केवळ काँक्रीट आणि स्टीलचे नाही, तर देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवणारे आहे.
या विकासामुळे सामान्य नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ झाला आहे. दुसरीकडे उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळाली आहे. लॉजिस्टिक खर्चात झालेली घट, मालवाहतुकीचा वाढलेला वेग आणि देशाच्या कानाकोपऱ्यांना मिळालेली जोडणी यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनत आहे.
आजचा भारत केवळ विकासाची स्वप्ने पाहत नाही, तर आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळावर त्या स्वप्नांना वास्तवात उतरवत आहे. सक्षम दळणवळण, गतिमान अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारा भारत हेच नव्या युगातील राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी चित्र आहे.
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad BJP Bhosari
03/06/2026
जननायक, ओबीसी समाजाचे बुलंद नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातील जनसामान्यांचा आवाज आणि लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#गोपीनाथमुंडे #जननायक
03/06/2026
|| श्री गणेशाय नमः ||
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरूमे देवो सर्व कार्य सर्वदा..!
सर्व भाविक भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा..!
02/06/2026
जनतेचा आशीर्वाद, विश्वास आणि प्रेम हीच लोकप्रतिनिधीची खरी ओळख असते. पिंपरी-चिंचवडकरांनी गेल्या अनेक वर्षांत दाखवलेला विश्वास हीच माझ्या प्रत्येक निर्णयामागची आणि प्रत्येक कामामागची प्रेरणाशक्ती आहे.
"मायबाप जनतेशी संवाद" हा केवळ एक कार्यक्रम नसून, नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि विकासाच्या स्वप्नांशी जोडलेला एक जिव्हाळ्याचा सेतू आहे. जनतेच्या समस्या ऐकणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करणे, हीच लोकसेवेची खरी जबाबदारी आहे.
पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी आणि शहराला अधिक सक्षम, आधुनिक व प्रगत बनविण्यासाठी आपले प्रयत्न निरंतर सुरू राहतील. जनतेचा विश्वास हेच आमचे बळ, तर जनसेवा हाच आमचा संकल्प आहे.
आपल्या प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्याच्या जोरावर विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेऊया.
जनतेचा विश्वास... विकासाचा ध्यास...!
जनसेवा हाच धर्म...!
जय श्रीराम..! 🚩
02/06/2026
“विकासही... वारसाही...”
हा केवळ एक मंत्र नाही, तर नवभारताच्या उभारणीचा दृढ संकल्प आहे…!
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी आणि प्रभावी नेतृत्वाखाली भारत आज आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करत असतानाच आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धनही तितक्याच अभिमानाने करत आहे.
श्रीराम जन्मभूमी मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक कॉरिडॉर यांसारख्या भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्पांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि अध्यात्माला नवसंजीवनी मिळाली आहे. या विकासकामांमुळे देशातील कोट्यवधी भाविकांची तीर्थयात्रा अधिक सुलभ, सुरक्षित, वेगवान आणि सुविधायुक्त झाली आहे.
सेंगोलची संसदेत प्रतिष्ठापना, आयुष मंत्रालयाची स्थापना, आंतरराष्ट्रीय योग दिनाला मिळालेली जागतिक मान्यता अशा ऐतिहासिक निर्णयांमधून हजारो वर्षांची भारतीय परंपरा आणि संस्कृती जागतिक स्तरावर नव्या तेजाने उजळून निघत आहे.
आजचा नवा भारत हा केवळ पायाभूत विकासाचा नाही, तर संस्कृती, श्रद्धा, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम असलेला समर्थ भारत बनत आहे.
“विकासाच्या वाटेवर चालताना, वारशाचा अभिमान जपणारा भारत”
हेच आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे…! 🇮🇳
Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad BJP Bhosari
01/06/2026
भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ तसेच द्वैवार्षिक पोटनिवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो.
महाराष्ट्र विधान परिषद उमेदवार श्री. अरुण लखानीजी, श्री. अविनाश ब्राह्मणकरजी, श्री. प्रविण पोटे पाटील, श्री. धैर्यशील कदम, श्री. राजेंद्र राऊतजी, श्री. प्राजक्त तनपुरे, श्री. सुहास शिरसाटजी, श्री. अमर राजूरकर, श्री. बसवराज पाटीलजी, श्री. नंदकिशोर महाजन आणि डॉ. राजीव पोतदारजी यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!
Devendra Fadnavis Arun Lakhani Pravin Pote Patil Dhairyashil Kadam Rajendra Raut Prajakt Prasadrao Tanpure Amarnath Rajurkar Basavraj Patil - बसवराज पाटील Nandkishor Mahajan BJP Maharashtra
01/06/2026
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन
काल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील त्यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण करत मनापासून अभिवादन करण्यात आले.
न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष आणि लोककल्याणकारी शासनाचा आदर्श घालून देणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून स्त्रीशक्ती, धर्म, संस्कृती आणि सामाजिक समतेचा दीप प्रज्वलित केला. मंदिर पुनरुज्जीवन, जनकल्याणकारी निर्णय आणि प्रजेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्या सदैव प्रेरणास्थान आहेत.
त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करताना, त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचरणी कोटी कोटी वंदन..!