Urban Cell Pune

Urban Cell Pune

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Urban Cell Pune, Public Service, pune, Pune.

Photos from Urban Cell Pune's post 01/10/2025

पुणे शहराच्या विकासासाठी पाठपुरावा...

आज महाराष्ट्र अर्बन सेल अध्यक्षा आदरणीय माजी खा. वंदनाताई चव्हाण यांच्यासोबत पुणे मनपाचे आयुक्त मा. श्री. नवलकिशोर राम यांची भेट घेतली आणि बाणेर परिसरातील समस्यांबाबत तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Photos from Urban Cell Pune's post 26/08/2025

अर्बन सेलची महत्वपूर्ण बैठक संपन्न!

आज पुणे अर्बन सेलची महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा आदरणीय माजी खा. वंदनाताई चव्हाण यांच्या अध्यक्षततेखाली संपन्न झाली. याप्रसंगी पुणे अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी उपस्थिती दर्शवत बैठकीत सहभाग नोंदवला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अर्बन सेलचे सरचिटणीस श्री. नितीनजी जाधव सर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य यांनी आपले विचार प्रकट केले. आजमितीस पुणे शहर वेगाने वाढत असून होणारा विकास हा दिशाहीन आहे आणि यामुळे नागरिकांना उग्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांना वाचा फोडणे काळाची गरज बनले आहे. अन्न, वस्त्र, निवारा याचसह रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छ हवा, सांडपाणी निचरा या मूलभूत सुविधा बनल्या असून पर्यावरणाचे होणारे नुकसान पाहता आपण ठोस पावले उचलणे आवश्यकता आहे.

याबाबत आदरणीय वंदनाताई यांनी सविस्तर मार्गदर्शन करत येणाऱ्या काळात नागरिकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अध्यक्ष या नात्याने येत्या दिवसांत आग्रहीपणे नागरी गैरसोयीचा अभ्यास करत वाचा फोडण्यासाठी सज्ज राहावे, असे प्रतिपादन केले. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज होणे, हे आपले कर्तव्य असून लवकरच एकदिवसीय कार्यशाळा घेण्याच्या मा. ताईंच्या सूचनेला अनुमोदन दिले. अत्यंत सकारात्मक वातावरणात संपन्न झालेल्या या बैठकीत अर्बन सेलच्या सभासद मा. अश्विनी ताई जाधव यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Photos from Urban Cell Pune's post 14/07/2025

*औचित्य गुरुपौर्णिमेचे*!!!!

आदरणीय मा. खा. वंदनाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली कार्यरत असलेल्या अर्बन सेल
श्री. नितीन वसंत जाधव( प्रदेश समन्वयक अर्बन सेल)
श्री. स्वप्निल दादा दुधाने (शहराध्यक्ष पुणे अर्बन सेल)

अर्बन सेल पुणे व व्हायब्रंट सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक सन्मान व सत्कार **नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल* धायरी येथे
आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे संचालक श्री. अनिकेत चव्हाण( संचालक धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान )उपस्थित होते. तसेच

श्री. विलास खाडे (प्राचार्य कै. बंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज)

श्री.विकास कुंभार (मुख्याध्यापक शेवंताबाई बंडोजी चव्हाण प्राथ. कन्या शाळा व कै बंडोजी खंडोजी चव्हाण पूर्व प्राथमिक विद्यालय)

सौ. कोंकणे
(नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल)

श्री. मदन सूर्यवंशी
(विभाग प्रमुख कै. बंडोजी खंडोजी चव्हाण ज्युनियर कॉलेज विज्ञान वाणिज्य कला शाखा)

श्री. माधव काकडे( प्राचार्य नामदेव बंडोजी चव्हाण प्राथ. उच्च माध्यमिक विद्यालय)

या सर्व मान्यवरांचा शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

डॉ.अश्विनी सुनील जाधव
संस्थापिका अध्यक्ष,
व्हायब्रंट सोशल फाउंडेशन
शहर समन्वयक -अर्बन सेल पुणे

Photos from Urban Cell Pune's post 11/07/2025

*औचित्य जन्मदिवसाचे कर्तव्य वृक्षारोपणाचे*!

*मा खासदार मा महापौर*
*महाराष्ट्र अर्बनसेलच्या अध्यक्षा वंदनाताई चव्हाण* यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने *कोथरूड विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष सचिन हनुमंतराव यादव यांनी *वृक्षारोपणाचा कार्यक्रम* आयोजित केला होता.

या वृक्षारोपण अभियानात गिरीश गुरनाणी गणेश ठोंबरे, उदय निगडे,अमित दारवटकर, विजय देशमुख, देवा वाल्हेकर, तानाजी सावंत, नारायण बानगुडे, आशिष भालेराव, राजवीर दारवटकर सहभागी झाले होते 🙏

Photos from Urban Cell Pune's post 29/04/2025

*जाणीव कर्तव्याची, पर्यावरण रक्षणाची* !

कोथरूड मधील वेताळ व हनुमान टेकडी येथील वृक्षांना, पक्षांना लागणार्‍या पाण्यासाठी तयार केलेल्या पाण्याच्या टाक्यांची व पाणवठे यांची दुरावस्था झालेली आहे. सर्व टाक्यांमध्ये गवत वाढलेले असून अस्वच्छ झालेल्या आहेत तसेच सर्व पाणवठ्यांना तडे गेल्यामुळे पाणी जास्त काळ न राहता जमिनीमध्ये मुरून जाते.या वेळेस उन्हाळा तीव्र असल्यामुळे वृक्षांना व पक्षांना पाण्याची आवश्यकता भासणार आहे तरी लवकरात लवकर पाण्याच्या टाक्यांची व पाणवठ्यांची स्वच्छता करून दुरुस्ती करण्यात यावी तसेच या ठिकाणी टँकर ने नियमित पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा
या संदर्भात मा एम एन मोहिते साहेब वनसंरक्षण विभाग,पुणे वनविभाग यांना निवेदन देण्यात आले कार्यालयीन विभाग प्रमुख काळे साहेब यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भातले माहिती पुढील कार्यालयाला पाठवलेली आहे आणि हे काम लवकरात लवकर करून घेऊ.
यावेळी माझ्यासमवेत पुणे अर्बन सेल शहराध्यक्ष स्वप्निल दादा दुधाने ज्येष्ठ सदस्य शिवाजी काका गवारे ,पै निकुंज उभे,सुजित पोळेकर उपस्थित होते.

Photos from Urban Cell Pune's post 23/04/2025

आपण अर्थ डे साजरा केला, पृथ्वीसोबत नातं जोडण्यासाठी.
पण नंतरच, निसर्गानं इशारा दिला — लोहेगावमध्ये तापमान ४३.२°C आणि शनिवारवाडा परिसरात ४१.२°C, एप्रिलमधील उच्चांक.
फक्त प्रतीकात्मक उपक्रम नकोत, आता कृती हवी!

We celebrated Earth Day to reconnect with nature.
But just days later, nature reminded us — Pune recorded an intense 43.2°C in Lohegaon and 41.2°C in Shivajinagar, one of the hottest April days ever.
Let’s move beyond symbolic celebrations.
It’s time for real climate action.

Photos from Urban Cell Pune's post 10/03/2025

तू चाल पुढं पुढं...

काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट, अंतरंगी डिजायनर्स आणि पुणे अर्बन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कर्वेनगर - वारजे परिसरातील भगिनींसाठी मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी आणि आरी वर्कचे मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात अनेक भगिनींनी उपस्थिती दर्शवत हा उपक्रम यशस्वी केला.

तब्ब्ल ४०० हून अधिक माता भगिनींनी आपल्या नावाची नोंदणी केली असून आरी वर्कचे प्रशिक्षण देणारे श्री. अभयजी भोसले यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवत येत्या तीस दिवसांत उत्तमोत्तम प्रशिक्षण देण्याचा शब्द दिला आहे. यावेळी १२० महिलांच्या चार बॅच तयार करण्यात आल्या असून त्याप्रत्येक बॅचमधुन ३० महिलांचा स्वतंत्र ग्रुप करण्यात आला आहे. प्रत्येक महिला भगिनीला उत्तम प्रशिक्षण मिळण्यासाठी कमी संख्येच्या बॅच तयार केल्या असून येत्या महिनाभरात या भगिनी लवकरच ही कला शिकून घेतील, यात शंकाच नाही.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटीका मातोश्री सौ. लक्ष्मीताई दुधाने, प्रशिक्षक श्री. अभयजी भोसले सपत्नीक, श्री. योगेश माकणे सपत्नीक तर खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा मीनल ताई धनवटे, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे, माझे सर्व सहकारी, ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, अंतरंगी डिजायनर्स, पुणे अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने माता भगिनी याप्रसंगी उपस्थित होत्या.

स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाने
अध्यक्ष - अर्बन सेल पुणे

07/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त
हॅन्ड एम्ब्रोयडरी (आरी) - प्रशिक्षण वर्क

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट - अतरंगी डिजायनर्स - पुणे अर्बन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने हॅन्ड एम्ब्रोयडरी आरी वर्क मोफ़त प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या दि ०८ मार्च २०२५, शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता सर्व सहभागी महिलांच्या उपस्थितित होणार असून याप्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती!
स्थळ :
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल, कर्वेनगर, पुणे
वेळ :
शनिवार, दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता

स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाने
अध्यक्ष- अर्बन सेल - पुणे

Photos from Urban Cell Pune's post 21/02/2025

महत्वपूर्ण बैठक आणि चर्चा!

आपल्या शहरातील आदरणीय मा. खा. वंदनाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे अर्बन सेलची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. याप्रसंगी अर्बन सेलची येत्या काळातील वाटचाल आणि भविष्यातील उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नुकतेच उत्तराखंड या ठिकाणी राष्ट्रीय मॉडर्न पॅन्थॉलॉन स्पर्धा संपन्न झाली असून या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या श्रावणी जयदीप निलवर्ण आणि त्यांच्या मातोश्री रेखा निलवर्ण तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कास्य पदके प्राप्त करणाऱ्या वृंदा अनिरुद्ध वाणी आणि मातोश्री सौ. बिना वाणी यांचा सत्कार आदरणीय मा. खा. वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Photos from Urban Cell Pune's post 12/02/2025

एक कार्यक्रम ज्येष्ठांसाठी!

मुंबई अर्बन सेल, पुणे अर्बन सेल आणि रिजनल रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वृध्दांची काळजी व त्यांचे कल्याण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन’ हा कार्यक्रम कर्वेनगर मधिल मातोश्री वृद्धाश्रम व प्रगती विद्या मंदिर स्कुल येथे संपन्न झाला.

सोमवार, दि. १० फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कल्याणाप्रती आपल्या जबाबदारी याबद्दल यथायोग्य चर्चा विनिमय करण्यात आले. आदरणीय खा. वंदनाताई चव्हाण आणि माजी महापौर व मुंबई अर्बन सेल अध्यक्षा निर्मला प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घडलेल्या सकारात्मक विचार मंथनातून पुनःश्च कृतज्ञता म्हणून ज्येष्ठ नागरिकांप्रती प्रेम आणि जबाबदारी याबद्दल विचार व्यक्त केले.

याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने, कोथरूड अर्बन सेल अध्यक्ष सचिनजी यादव, खडकवासला विधानसभा अर्बन सेल अध्यक्षा मीनल ताई धनवटे, अर्बन सेल सदस्या अश्विनी ताई जाधव आणि मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

04/02/2025

SAVE OUR RIVERS – ACT NOW!

Our rivers are under threat! The River Front Project will destroy 88 km of our river’s ecosystem, replacing it with concrete for commercial use.

What’s Happening?
•Loss of biodiversity and natural water recharge zones
•Increased flood risk and water shortages
• More pollution, heat, and diseases

What’s at Stake?
• Severe floods and water crisis
• Health hazards from contaminated water
• A lost natural heritage for future generations

What Can We Do?

Join the CHIPKO MARCH and stand for our rivers!

📅 9th Feb, Sunday |
⏰ 3:30 PM
📍 Kalmadi School, Baner → Riverbank

This is our city, our future—let’s protect it!

Photos from Urban Cell Pune's post 03/02/2025

Precaution is cure...

सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात गुलीयन बॅरी सिंड्रोम अर्थात GBS या आजाराने थैमान घातले असून आपले पुणे शहरही याला अपवाद राहिलेले नाही. दोन वर्षांच्या लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत अनेक जण याचे बळी ठरले असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे, आवश्यक आहे.

या रोगाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची तपासणी आणि उपचार मोफत व्हावे आणि यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र रुग्णालय अथवा रुग्णालयात स्वतंत्र विभाग कार्यान्वित करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याचसह शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची तपासणी होऊन त्यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी होणे त्यांची माहिती ना उपलब्ध करणे, ही काळाची गरज असल्याचेही नमूद केले. सदर आजार गंभीर असून त्याची लक्षणे, उपचार आणि माहिती याबद्दल पुणे मनपाच्या वतीने वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांना अधिकृत माहिती उपलब्ध करण्यात यावी, असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी सदर रोगाची तपासणी केंद्रे कमला नेहरू रुग्णालयात सुरू असून रुपये २ लाखांपर्यंत उपचार शहरी वैद्यकीय गरीब उपचार योजनेंतर्गत करण्यात येतील, अशी माहिती मिळाली. आजमितीस शहरात ९३ रुग्ण पॉजिटीव्ह असून यातील ७५% रुग्ण खाजगी तर २५% रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले. ससून हॉस्पिटल या ठिकाणी १५ बेड तर औंध येथील डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध असल्याचे ऐकून समाधान वाटले. प्रशासन सदर गोष्टीकडे गांभीर्याने पाहत असून नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचना व नियमांचे पालन करावे, ही विनंती!

याप्रसंगी महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस श्री. नितीन जाधव, पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने, सहकारी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अर्बन सेल अध्यक्षा नीता ताई गलांडे, खडकवासला विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्षा मीनल ताई धनवटे, सभासद प्रियांका ताई तांबे पर्वती विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष श्री. अमोलजी परदेशी आदी उपस्थित होते.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
Pune
411038