Ashtavinayak Ganpati

Ashtavinayak Ganpati

Share

१ मोरगांव
२ थेऊर
३ सिद्धटेक
४ रांजणगाव

पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. ....

Photos 22/04/2021

http://www.ranjangaonmahaganpati.org/

इच्छापूर्ती करणारा महागणपती
अष्टविनायकामधील हे आठवे स्थान असून, या महागणपतीचा लौकीक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे. आजपर्यंत अनेक भाविकांच्या कुटुंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकटे महागणपतीच्या कृपाप्रसादाने दूर झाल्याचे भाविक सांगतात. महागणपतीच्या दर्शनाने संकटे दूर होतात, अडचणीमधून मार्ग निघतात म्हणून भाविकांची १२ महिने याठिकाणी गर्दी असते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा...
http://goo.gl/AFlrx

Photos 14/04/2021

👉 श्री महागणपती - रांजणगाव
goo.gl/0T470Z

👉 श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट
goo.gl/eYHDxY

लॉकडाऊनः नवीन नियमात काय सुरू आणि काय बंद पाहा... 09/04/2021

महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (ता. 9) वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का?...

लॉकडाऊनः नवीन नियमात काय सुरू आणि काय बंद पाहा... कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गा.....

Photos 09/04/2021

http://www.ranjangaonmahaganpati.org/
Like THE PAGE ✔ Comment ✔ Tag ✔ Share ✔
!!जय गणेश!! !!जय गणेश!! !!जय गणेश!! !!जय गणेश!!

महागणपतीची पौराणीक कथा
फार प्राचीन काळी त्रैतायुगात गृत्स्मद नावाचा एक ज्ञानी होऊन गेला. गणंना त्वाम गणपती या मंत्राची रचना गृत्समदाने केली होती. त्यामुळे या मंत्राच्या जपाच्या आधी गृत्समद ऋषीचे नाव घेतले जाऊ लागले. एके दिवशी गृत्समद ऋषींना मोठी शिंक आली आणि त्यांच्या शिंकेतून एक जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला. गृत्समदऋषींनी या मुलास आपला पुत्र मानले. मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून इंद्रासही जिकेऩ असे तो मुलगा गृत्समदऋषींना म्हणाला तेंव्हा गृत्समद ऋषींनी त्यास गणंना त्वाम़ या गणेशमंत्राचा उपदेश केला. पित्याने दिलेल्या मंत्राप्रमाणे त्या बालकाने पाच हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याचप्रमाणे गजाननाने त्याला लोखंड, रूपे , व सुवर्णाची नगरे दिली. तुझ्याकडे असलेल्या तीन नगरांमुळे तुला त्रिपुर हे नाव प्राप्त होइलर् एका शंकरावाचुन तुझा पराभव कोणीही करणार नाही. तू या लोकी अनेक सुखे उपभोगल्यावर शिवशंकर एकाच बाणाने तुझ्या या त्रिपुरांचा नाश करेल व तुलाही मुक्ती मिळेल असा वर विनायकाने दिला. गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला. त्याने अवघ्या त्रेलोक्याला हैराण करून सोडले. त्याने प्रथम मृत्यूलोक पादारंत केला. नंतर इंद्र्राचा पराभव करून स्वर्गाचे राज्य घेतले त्रिपुरासुराच्या भयाने ब्र्म्हदेव कमळात लपला व विष्णु क्षीरसागरात दडला. त्रिपुराने चंड व प्रचंड असे दोन मानसपुत्र उत्पन्न केले आणि एकाला ब्रम्हलोकाचे व एकाला विष्णूलोकाचे राज्य दिले.

नंतर कैलासपाशी जाऊन त्याने आपल्या बाहूने तो सर्व पर्वत हलवला. त्याचा हा पराक्रम पाहून शिवशंकर आनंदित झाले. त्रिपुरासुरास वर मागावयाला सांगितले. कैलासापाशी कैलास पर्वत मागतला. शंकराने आपले कैलासावरील स्थान त्या दैत्याला दिले आणि आपण मंदार पर्वतावर निघून गेले.

पृथ्वीवर आलेल्या त्रिपुराच्या भीमकाय नामक सेनापतीने पृथ्वीवरील सर्व राज्यांपासुन खंडणी घेतली. त्रिपुराच्या पाताळात गेलेल्या वज्रद्रंष्ट सेनापतीने सर्व नागांचा पराभव केला.अशा प्रकारे त्रिपुरासुर त्रिभुवनांचे राज्य करू लागला.

आपल्या पराभवामुळे गिरीकंदरी लपून बसलेले इंद्र्रासह सर्व देव त्रिपुराच्या वधाविषयी विचार करत असता नारदमुनी तेथे प्रकट झाले व म्हणाले त्रिपुराने हजारो वर्षे गजाननाची तपश्चर्या केली म्हणून त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तेंव्हा तुम्ही सर्वजण गजाननाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्या,असे सांगून नारदमुनींनी सर्व देवास एकाक्षर मंत्राचा उपदेश केला नंतर सर्व देव गणपतीची तपश्चर्या करू लागले,त्यांची निस्सीम तपश्चर्या पाहून गजानन प्रगट झाले,तेव्हा देवांनी गजाननाची आठ श्लोकांनी (प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रम विनायकम स्तुती केली,संकटाचे निवारण होण्यासाठी देवांनी ही स्तुती केली म्हणून त्या अष्टश्लोकी स्तोत्राला संकटनाशनम गणपती स्तोत्रम असे नाव प्राप्त झाले,जो कोणी दिवसातून तीन वेळा भक्तीयुक्त अंतकरणाने त्या स्तोत्राचा पाट करील त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाची पीडा होणार नाही असा प्रत्यक्ष गणपतीने या स्तोत्रास वर दिला आहे.

देवास आश्वासन दिल्यावर ब्राम्हणाचे रूप घेऊन गजानन त्रिपुराकडे गेला व म्हणाला राजा मी एक ब्राम्हण असुन चौस्ष्ट कलांचा अभ्यास केला आहे. म्हणून मला कलाधर असे म्हणतात. तुझी किर्ति ऐकून तुझ्या दर्शनास आलो आहे. तेंव्हा त्रिपुरासुर म्हणाला हे कलाधरा तू तूझी कला दाखव. तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुध्दा देईन कलाधर म्हणाला हे राजन मी तुला तीन उत्तम प्रकारची विमाने करून देतो त्या विमानातून तुला एका क्षणात वाटेल तिथे जाता येईल व जे काय मनात आणशील ते तुला प्राप्त होईल तसेच एका शंकराशिवाय कोणालाही त्या विमानाचा भेद करता येणार नाही ज्यावेळी शंकर एका बाणाने त्या तीन विमानांचा भेद करेल तेंव्हा तुझाही नाश होईल नंतर कलाधराने उत्तम प्रकारची तीन विमाने तयार केली ती विमाने पाहून त्रिपुराला फार आनंद झाला व त्याने त्या कलाधरास काय पाहिजे ते मागावयास सांगितले तेव्हा कलाध्राने कैलास पर्वतावरील गजाननाची चिंतामणी नावाची मूर्ती त्रिपुरासुराकडे मागितली.

कलाधराची मागणी त्रिपुरासुरास अत्यंत तुच्छ वाटली,त्याने आपला दूत शंकराकडे पाठवला आणि उन्मत्तपणे चिंतामणी मूर्तीची मागणी केली,चिंतामणीची मूर्ती तुझ्यासारख्या उन्मत्त पुरूषास जन्मजन्मंतरीही लाभणार नाही असा उलटा निरोप शंकराने त्रिपुरासुरास पाठवताच त्रिपुरासुर क्रोधित झाला व त्याने तत्काळ चतुरंग सेना एकत्रित करून मंदार पर्वतावर स्वारी केली़.

शंकर आणि त्रिपुरासुर याच्यांत तुंबळ युध्द सुरू झाले, त्रिपुरासुराने शंकराच्या सर्व सैन्याचा फन्ना उडवला आणि शेवटी फक्त शिवशंकर युध्दभुमीवर उरले,एकटयाने युध्द करून जय मिळणार नाही, असे वाटुन शिवशंकर युध्दभुमी सोडून गिरीकंदरात लपून बसले़. शंकराचा पराभव झाल्याचे समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालय याला शरण .गेली

विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासुर मंदार पर्वतावर आला असता तेथे त्याला सहस्त्र सूर्याप्रमाणे तेजस्वी चिंतामणीची मूर्ती सापडली,ती घेऊन त्रिपुरासुर मोठया आनंदाने परतत असताना त्याच्या हातातील मूर्ती अचानक नाहीशी झाली, मूर्ती नाहीशी झाली हा अपशकुन समजून त्रिपुरासुर दुःखी झाला.

देवांचा पराभव झाल्यामुळे त्रैलोक्यात अधार्म सुरू झाला व यज्ञयागादी कर्म बंद पडली,हा प्रकार पाहून शंकर इतर देवांसह त्रिपुरासुराच्या नाशाचा उपाय योजू लागले,तेव्हा नारदमुनी प्रगट होऊन शंकरास म्हणाले महादेवा युध्दास जातेवेळी तू प्रथम गजाननाचे पूजन केले नाहीस म्हणून तुला जय मिळाला नाही,त्यासाठी आधी गणपतीची आराधना कर त्याला प्रसन्न कर आणि मग युध्दास जा म्हणजे तुला जय मिळेल,शंकरास नारदमुनींचे म्हणणे पटले आणि दंडकारण्यात जाऊन शंकराने गजाननाची षडाक्षर मंत्रानी आराधना केली,त्यावेळी शंकराच्या मुखातून एक दिव्य पुरूष उत्पन्न झाला व शंकरास म्हणाला मीच गजानन आहे,मीच सृष्टीचे पालनपोषन करतो़ मी तुजवर प्रसन्न झालो आहे,तुला जे जे वर पाहिजे असतील ते ते मागुन घे गजाननाचे भाषण ऐकून शंकरास आनंद झाला व त्याने गजाननाच् स्तुती केली स्तुती ऐकुन गजानन म्हणाले शंकरा माझ्या बीजमंत्राचा जप करूण एक बाण अभिमंत्रित कर तो बाण तू त्या राक्षसांच्या पुरांवर सोडलास म्हणजे त्याची तिन्ही पुरे एकदम नष्ट होतील़ मग तू त्याचे सहज भस्म करशील,असे बोलत गणपतीने शंकराला आपले सहस्त्रनाम सांगितले,त्या सहस्त्रनामाचा जप केला असता कोण्त्याही कार्यात जय होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. गजाननाकडून वर मिळाल्यावर शंकरास आनंद झाला.

गजाननाच्या वरप्राप्तीनंतर शंकराने सर्व देवांस युदधास बोलावले. त्रिपुरासुराचे व शंकराचे तुंबळ युध्द सुरू झाले त्रिपुरासुराच्या नाशासाठी शंकराने पृथ्वीचा रथ केला चंद्र सुर्याची चाके लावली ब्राम्हदेवाला सारथी विष्णूचा बाण आणि अश्विनीकुमारांना घेाडे केले एकाक्षर व षडाक्षर मंत्राच्या जपाने धनुष्य व बाण अभिमंत्रित केले नंतर धनुष्यास बाण लावून तो कणापर्यंत ओढून सोडला,तेंव्हा त्रिभुवनात एकदम विजेसारखा लख्ख प्रकाश पडला त्रिपुराला मूर्च्छा येऊन तो खाली पडला आणि असुराच्या तिन्ही पुरांचे भस्म झाले,त्रिपुराच्या शरीरातून एक ज्योती निर्मान होऊन तिने शंकराच्या शरिरात प्रवेश केला व त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली त्या दिवसापासुन शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झाले ही घटना कार्तिक शुध्द पौर्णिमेला घडली म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात.

राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी; पाहा काय सुरु काय बंद? 07/04/2021

राज्यात करोनचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, तो रोखण्यासाठी राज्य सरकारने पाच एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. 'ब्रेक द चेन' हे घोषवाक्य घेऊन अर्थ चक्राला धक्का न देता आणि....

राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी; पाहा काय सुरु काय बंद? 'ब्रेक द चेन' हे घोषवाक्य घेऊन अर्थ चक्राला धक्का न देता आणि श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी राज्य सरकारने घेतली...

31/03/2021

🙏 आज संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 09.38 वाजता. 🙏
श्री महागणपती-रांजणगाव
👉 https://bit.ly/3pyvRbO

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pune
411004