Yashada Pune

Yashada Pune

Share

Yashwantrao Chavan Academy Of Development Administration

Photos from Yashada Pune's post 06/05/2026

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) येथे “New Alphabets of Health” या विषयावर व्याख्यानाचे यशस्वी आयोजन बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी संवाद सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानासाठी प्रख्यात तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता झाली. यामध्ये यशदातील प्रशिक्षणार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपल्या मार्गदर्शनात डॉ. हिरेमठ यांनी आधुनिक जीवनशैलीत आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “New Alphabets of Health” या संकल्पनेतून त्यांनी आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक विचारसरणी या घटकांचे सुलभ आणि प्रभावी विश्लेषण केले.

तसेच, दैनंदिन जीवनात लहान-लहान बदल करून आरोग्यदायी सवयी कशा रुजवाव्यात याबाबत त्यांनी उपयुक्त टिप्स दिल्या. उपस्थितांनी व्याख्यानातील मुद्द्यांना चांगला प्रतिसाद दिला व चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रम शेवटी आभार प्रदर्शनाने संपन्न झाला. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला असून, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

04/05/2026

On 3rd May 2026, as part of the Promotion Training Programme for Under Secretaries from the General Administration Department, a field visit to NDA, Khadakwasla was conducted.

The NDA administration extended exceptional cooperation and offered deep insights into this prestigious institution—a true symbol of national pride, discipline, and excellence.

An inspiring and enriching experience for all participants.

30/04/2026

आज दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी यशदा, पुणे येथे प्रशासकीय विभागनिहाय क्षमता बांधणी आराखडा तयार करण्याबाबत एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.

महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग, क्षमता विकास आयोग, नवी दिल्ली व यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेस राज्य शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये यशदाचे महासंचालक सुहास दिवसे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच उपमहासंचालक सचिन कलंत्रे यांनी कर्मयोगी प्रशासन व क्षमता बांधणी आयोगाबाबतच्या संकल्पना व भूमिका स्पष्ट केल्या.

कार्यशाळेमध्ये यशदाच्या डिजिटल लर्निंग लॅबच्या प्रमुख कल्याणी गोखले यांनी विभागनिहाय क्षमता बांधणी आराखडा तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानुसार उपस्थित अधिकाऱ्यांनी 'आय-गॉट प्लॅटफॉर्म'वर क्षमता विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया स्वतः पार पाडली.

या कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आलेल्या विषयांबाबत सविस्तर अहवाल सामान्य प्रशासन विभागामार्फत केंद्र शासनास पाठविण्यात येणार आहे. सदर शिफारशी व अभिप्राय लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी येथे मे मध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये सादर करण्यात येणार आहेत.

अल्प कालावधीच्या सूचनेनुसार आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे संयोजन प्रज्ञा दासरवर, किरण धांडे , शाहूराज मोरे व इतर अधिकारी - कर्मचारी यांनी केले.

28/04/2026

‘गावविकासातून राष्ट्रविकास’ हे पुस्तक यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्रामार्फत प्रकाशित करण्यात आले आहे. Yashada Talks या YouTube चॅनेलवर या पुस्तकाचे लेखक श्री. राजीव नंदकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक, राज्य नागरी विकास संस्था, यशदा) यांच्याशी प्रकल्प संशोधक श्री. व्यंकटेश कल्याणकर यांनी संवाद साधला आहे.

या पॉडकास्टमध्ये पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास, त्यामागील संकल्पना आणि ग्रामविकासातील त्याची उपयुक्तता याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत अधिकारी, पदाधिकारी आणि अभ्यासकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे.

#गावविकास #राष्ट्रविकास

23/04/2026

जागतिक पुस्तक दिन

आज एक पुस्तक हातात घ्या… कारण प्रत्येक पुस्तकात तुमचे उद्याचे यश दडलेले असते.
वाचन ही केवळ सवय नाही, तर विचारांना दिशा देणारी आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी शक्ती आहे.

20/04/2026

यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे (भाप्रसे) यांनी एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (CPTP-11) अंतर्गत नगर विकास विभागातील मुख्याधिकाऱ्यांना “आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

Photos from Yashada Pune's post 17/04/2026

यशदा प्रशिक्षण केंद्र, पुणे
यशदा बॅच दि. १७/११/२०२५- १६/१२/२०२५ आपण सातारा जिल्हा येथील पुस्तकांचे गाव भिलार येथे आम्हा प्रशिक्षनार्थी वैद्यकिय अधिकारी यांना भेट देण्यासाठी घेऊन गेला होतात. ते पुस्तकांचे गाव पाहून माझ्या मनामध्ये विचार आला की आपण आपल्या गावामध्ये असलेल्या आरोग्य संस्थे मध्ये "पुस्तकांची पी. एच. सी" का उभारू शकत नाही?
श्रीम. स्वाती कुलकर्णी मॅडम (सत्र संचालक )आपल्या आणि यशदा टीम कडून मार्गदर्शनाने प्रेरित होऊन मी "पुस्तकांची पी.एच.सी." प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी, ता. इंदापूर, जि. पुणे. येथे उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपली यशदा प्रशिक्षण संस्था, पुणे हे एक नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल वैद्यकिय अधिकारी यांना वारंवार आनंदाने उपक्रम करण्यासंदर्भात प्रेरित करत असता. आम्ही वैद्यकिय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी येथील कर्मचारी यांच्या वतीने आपले यशदा प्रशिक्षण केंद्र आणि सत्र संचालक श्रीम. स्वाती कुलकर्णी मॅडम आपले खूप खूप आभार मानू इच्छितो.
धन्यवाद यशदा टीम..!!

आपला विनीत,
डॉ. गणराज रामदास चौगुले
वैद्यकिय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी,
ता. इंदापूर. जि. पुणे.

16/04/2026

Under the Sadhana Saptah initiative, Yashwantrao Chavan Academy of Development Administration organized the Master Trainer Workshop under Sadhana Saptah the leadership of Dr. Suhas Diwse IAS (DG Yashada), Shri.Shekhar Gaikwad (IAS Retd.), ADG Yashada. The programme, led by Course Director Smt. Veena Supekar, aimed at building competencies, fostering leadership, and enabling effective knowledge dissemination.

15/04/2026

यशदा (YASHADA) माध्यम व प्रकाशन केंद्रामार्फत प्रकाशित ‘गावविकासातून ते राष्ट्रविकास’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील (भाप्रसे) यांच्या हस्ते संपन्न झाले.
या पुस्तकाचे शब्दांकन व संकलन श्री. राजीव नंदकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी) यांनी केले असून, गावविकास ते राष्ट्रविकास या प्रवासाची दिशा दर्शवणारे हे मार्गदर्शक पुस्तक ठरणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे प्रमुख तसेच माध्यम व प्रकाशन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Photos from Yashada Pune's post 10/04/2026

*Visit of Shri. Vikas Kharge, IAS, Additional Chief Secretary, Revenue Department, Government of Maharashtra to YASHADA*

Shri Vikas Kharge Sir, Additional Chief Secretary, Revenue, GoM conducted a meeting today (10.4.2026) at YASHADA on drafting the Land Titling Bill.

Shri Chocklingam Sir, Chief Electoral Officer, Maharashtra gave a detailed presentation on the concept of Land Titling and the proposed bill. He also showed the demo of LandStack portal implemented in the UT of Chandigarh.

Divisional Commissioner, Pune Shri Pulkundwar sir, Settlement Commissioner Shri Nawal sir, DG, YASHADA Shri Diwase sir, ADG YASHADA Shri Gaikwad sir were present during the deliberations.

Shri Dharurkar, DS and Shri Shaikh, DO from the Revenue Department and Smt Dhaware and Smt Sakhare from the L&JD also attended the meeting in person.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Yashwantrao Chavan Academy Of Development Administration (YASHADA). Postal Address : Rajbhavan Complex, Baner Road, PUNE
Pune
411007

Opening Hours

Monday 9:15am - 6pm
Tuesday 9:15am - 6pm
Wednesday 9:15am - 6pm
Thursday 9:15am - 6pm
Friday 9:15am - 6pm