01/06/2026
Long before modern power grids, the elements shaped human progress. Today, renewable energy is often celebrated as a futuristic breakthrough, yet its blueprint is as old as time. Every solar cell absorbing the sun's brilliance, every turbine driven by hydraulic gravity, and every wind farm capturing the atmosphere's breath is a modern echo of ancient reverence. Even our circular economy, which transforms agricultural waste like bagasse into biofuel, simply honors the timeless law that everything returns to the earth. Innovation is not about outsmarting nature, but finally learning to collaborate with it. Swipe through to discover how the foundational elements of our planet continue to power our future.
01/06/2026
मानवी संस्कृतीचा इतिहास आणि निसर्गाची पंचतत्त्वं यांचा एक प्राचीन आणि अतूट संबंध आहे. आज आपण ज्याला आधुनिक हरित ऊर्जा तंत्रज्ञान म्हणतो, ते प्रत्यक्षात निसर्गाच्या याच सनातन नियमांचे प्रकटीकरण आहे. सूर्यप्रकाशाला विजेमध्ये बदलणारे सौर पॅनेल्स, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर फिरणारे टर्बाइन्स, शेतीच्या कचऱ्यातून इंधन बनवून चक्र पूर्ण करणारी वसुंधरा आणि हवेच्या प्रवाहातून प्रकाश निर्माण करणाऱ्या पवनचक्क्या या सर्व गोष्टी आपल्या पूर्वजांच्या निसर्गाप्रती असलेल्या आदराचाच आधुनिक आरसा आहेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी ऊर्जेचे मूळ आजही निसर्गातच आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन निसर्गाचा हा सुंदर संगम अनुभवण्यासाठी नक्की स्वाइप करा.
30/05/2026
The future of sustainability lies in making better use of the resources we already have. As Maharashtra advances towards cleaner and more efficient development models, innovative approaches to waste management are helping address environmental challenges while supporting the state's long-term sustainability goals. From reducing landfill dependence to promoting resource recovery, these initiatives demonstrate how responsible environmental management can create lasting benefits for communities and future generations.
30/05/2026
शाश्वत विकासाचा पाया उपलब्ध संसाधनांचा अधिक परिणामकारक आणि जबाबदारीने वापर करण्यात आहे. महाराष्ट्र स्वच्छ, सक्षम आणि भविष्याभिमुख विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना, कचरा व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण उपाययोजना पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासोबतच राज्याच्या दीर्घकालीन शाश्वत विकास उद्दिष्टांना बळकटी देत आहेत. भूभराव स्थळांवरील अवलंबित्व कमी करण्यापासून संसाधनांच्या पुनर्प्राप्तीला चालना देण्यापर्यंत, हे उपक्रम जबाबदार पर्यावरण व्यवस्थापनाद्वारे समाज आणि भावी पिढ्यांसाठी दीर्घकालीन लाभ निर्माण करण्याचे उदाहरण ठरत आहेत.
25/05/2026
What many see as agricultural residue is now becoming a powerful contributor to Maharashtra’s renewable energy ecosystem. Across the state, bagasse co-generation projects are helping transform sugar industry by-products into reliable clean power, creating a model where industry, agriculture, and sustainability work together. This growing network of projects is not only strengthening Maharashtra’s energy capacity, but also encouraging smarter use of available resources through cleaner and more efficient technologies.
25/05/2026
कृषी अवशेष म्हणून पाहिला जाणारा ऊसाचा चोथा आज महाराष्ट्राच्या नवीकरणीय ऊर्जा व्यवस्थेतील एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत बनत आहे. राज्यातील सह-वीज प्रकल्पांद्वारे साखर उद्योगातील उपउत्पादनांचा वापर करून स्वच्छ ऊर्जा निर्मिती केली जात आहे, ज्यामुळे उद्योग, शेती आणि शाश्वत विकास यांच्यात एक सक्षम ऊर्जा साखळी तयार होत आहे. हे प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मितीपुरते नाहीत, तर उपलब्ध संसाधनांचा अधिक परिणामकारक आणि पर्यावरणपूरक वापर कसा करता येतो याचेही उदाहरण ठरत आहेत.
20/05/2026
A silent transformation is unfolding across Maharashtra’s public infrastructure. From administrative offices to institutional buildings, rooftops across the state are steadily turning into sources of clean and sustainable energy under the PM Surya Ghar: Muft Bijli Yojana scheme. What once served as unused urban space is now contributing towards reduced carbon emissions, improved energy efficiency, and a stronger renewable energy network for Maharashtra. Through Mahaurja Ground Report, MEDA brings this transition closer to citizens, combining data, geography, and on-ground progress to showcase how renewable energy is becoming an active part of governance and development.
20/05/2026
महाराष्ट्रातील सार्वजनिक पायाभूत व्यवस्थेमध्ये एक शांत पण महत्त्वपूर्ण ऊर्जा परिवर्तन घडत आहे. पी.एम. सूर्यघर उपक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक इमारतींवरील छते आता स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेची नवी केंद्रे बनत आहेत. पूर्वी केवळ रिकामी जागा म्हणून वापरली जाणारी ही छते आज कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि महाराष्ट्राची हरित ऊर्जा व्यवस्था अधिक सक्षम बनवणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महाऊर्जा ग्राउंड रिपोर्ट मालिकेतून MEDA हा बदल नागरिकांसमोर आणत आहे, आकडेवारी, नकाशे आणि प्रत्यक्ष प्रगतीच्या माध्यमातून राज्यातील वाढते सौरऊर्जाकरण अधिक जवळून दाखवत आहे.