19/04/2026
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शहर शाखा उपक्रम*
🍁दि. 18 एप्रिल 2026 ला नायगाव पेठ तालुका हवेली जिल्हा पुणे
येथे रमाई महोत्सवा निमित्त विज्ञान व चमत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमारीता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे माननीय ठकसेन गोराने सर राज्य प्रधान सचिव, माननीय दिगंबर कट्यारे सर, राज्य वैज्ञानिक जाणिवा कार्यवाह, माननीय मनोहर पाटील सर जिल्हा प्रधान सचिव तसेच पुणे शहर शाखेचे अध्यक्ष लालचंद कुंवर सर, कार्याध्यक्ष माधुरी गायकवाड, बुवाबाजी विरोधी संघर्ष विभाग- सह कार्यवाह रेणुका शिंदे,कार्यक्रमात पोलिस उपनिरीक्षक कांबळे सर
उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे गोराने
सरांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक तसेच भोंदू बाबा कशा पद्धतीने आपली फसवणूक करतात आणि त्या करिता आपण किती सतर्क असायला हवे, तसेच समाजसुधारकांचे पुस्तकं वाचणे आणि समजून घेणे हे आजच्या पिढीला किती गरजेचे आहे, तसेच अनेक भोंदू बाबा आपला कसा फायदा घेतात यावरही
सर्वांना मार्गदर्शन केले,
तसेच दिगंबर कट्यारे सरांनी चमत्कार सादरीकरण करून त्यामागील विज्ञान काय आहे, भोंदू बुवा बाबा हातचलाखी करून कशी आपली फसवणूक करतात हे स्पष्ट करून सांगितले तसेच मनोहर पाटील सरांनी संत सुधारकांच्या
अभंगातून हे भोंदू बाबा आपल्या महिलांची शारीरिक अर्थिक मानसिक कशी फसवणुक करतात हे चमत्कार सादरीकरण करून सांगितले, याकरिता घरातील मूळ पाया महिला आहेत त्यांनी नेहमी अशा भोंदू बाबा ना बळी न पडता आपण सजग आणि सतर्क असायला हवे व जादूटोणा असेल किंवा भोंदू बाबा अशा कोणत्याही गोष्टीला भिऊन चालणार नाही तर विज्ञान काय सांगते यावर भर द्यावा
प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान आहे हे सर्व वक्त्यांनी स्पष्ट केले ,
प्रत्येकांनी एक, दोन प्रयोग सादरीकरण केले,
महिलांचा प्रतिसाद उत्तम होता महिला व किशोरवयीन मुली मंचावर येऊन प्रयोग करण्यात सहभागी होत होत्या.🍁
कार्यक्रमात आयोजकांनी चहा नाश्ता, व जेवण व्यवस्था केलेली होती. तसेच खूप आदर व सत्कार करण्यात आला. कार्यक्रम घेण्याबद्दल आयोजक खूप उत्साही होते. आणि कार्यक्रमानंतरही त्यांनी पुन्हा हे कार्यक्रम गावात घेऊ असे मनोगतातून व्यक्त केले 🍁
17/04/2026
महाअंनिस पुणे शहर शाखा उपक्रम
*महात्मा जोतिबा फुले* जयंती निमित्त आज रविवार दि.12/04/2026रोजी 5:30 वाजता ARAI रोड येथील तक्षशिला बुध्द विहारा मध्ये *विज्ञान,चमत्कारातून अंधश्रद्धा मुक्ती कार्यक्रम* *तक्षशिला बुद्ध विहार,स.नं.४४, हनुमान नगर,
ARAI रोड, पौड रोड,
पुणे - ३८.आयोजित करण्यात आलेला होता त्यात माननीय दिगंबर कट्यारे सर, मनोहर पाटील सर, माधुरी गायकवाड उपस्थित होते.
त्यात कट्यारे सरांनी वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याकरिता प्रत्येक व्यक्तींमध्ये चिकित्सक वृत्ती, प्रश्न विचारणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले तसेच चमत्कारामागे भोंदू बाबांची हातचलाखी कशी असते ते प्रयोगातून सर्वांसमोर सादर केले.
मनोहर सरांनी संताचे व समाजसुधारकांचे विचार आपल्याला रुजविणे महत्त्वाचे आहे हे प्रयोग सादरीकरणातून स्पष्ट केले. तसेच महिला जास्तीत जास्त शारीरिक, अर्थिक, मानसिक बळी पडतात तसे न होण्याकरिता आपल्याला महात्मा जोतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकार करणे आवश्यक आहे व यात प्रामुख्याने महिला स्वतः सक्षम कशा होतील. त्याकरिता त्यांच्यात किती एकजूट असावी तसेच कोणतेही प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे व इतर महिलांचा ही सहभाग करून घ्यावा हे मांडण्यात आले.
सर्वांचा उत्साह शेवट पर्यंत टिकून होता, पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम व्हावे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
🍁अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका तक्षशिला बुद्ध विहारला भेट देण्यात आली. स्वतः महिला व मुले मुली प्रयोग करायला समोर येत होत्या
अतिशय उत्साही आणि आनंदी, वातावरणात हा कार्यक्रम घेण्यात आला.🍁
11/04/2026
🌌 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती – पुणे शहर शाखा 🌌
✨ आकाशदर्शन – खगोलातील रंजकता अनुभवण्याची सुवर्णसंधी! ✨
🔭 विशेष व्याख्यान व प्रत्यक्ष निरीक्षण कार्यक्रम
👨🏫 व्याख्याते:
डॉ. नितीन शिंदे
(खगोल अभ्यासक व संपादक – अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिक)
🌠 या कार्यक्रमात काय खास?
• उघड्या डोळ्याने आकाश निरीक्षण
• दुर्बिणीतून पाहा –
🌙 चंद्रावरील खड्डे
🪐 शनीची कडी
🌌 गुरुचे उपग्रह
🧠 जाणून घ्या आणि समजून घ्या –
• ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावर खरोखर परिणाम होतो का?
• ग्रहणामुळे काही दुष्परिणाम होतात का?
• गुण जुळवण्यामागील सत्य काय आहे?
• राशी-नक्षत्र म्हणजे नक्की काय?
• कडक मंगळ, साडेसाती, कालसर्पयोग – यांचा भांडाफोड!
• वास्तूशास्त्राचा भुलभुलैय्या
📍 स्थळ: कुडजे, अगळंबे फाटा, सिंहगड रोड, पुणे
📅 दिनांक: २५ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ७ ते रात्री ३
💡 आपले आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण टाळण्यासाठी — हा कार्यक्रम नक्की अटेंड करा!
📞 संपर्क:
मयुर पटारे – 99703 55105
माधुरी गायकवाड – 95527 00386
⚠️ सूचना:
1) नावनोंदणी आवश्यक
2) नोंदणी शुल्क: ₹100 (विद्यार्थ्यांसाठी मोफत)
👉 विज्ञानाच्या नजरेतून विश्व पाहा… अंधश्रद्धा दूर करा! 🚀
05/04/2026
जर तुम्ही एखाद्या पुरुषाला शिक्षित केले तर तुम्ही एका व्यक्तीला शिक्षित कराल, परंतु जर तुम्ही एका स्त्रीला शिक्षित केले तर तुम्ही संपूर्ण कुटुंबाला आणि शेवटी एक राष्ट्र शिक्षित करता.
- सावित्रीबाई फुले
05/04/2026
I dwell in possibility.
–Emily Dickinson
23/03/2026
कॅथरीन हेपबर्न... पॅन्ट घालणारी पहिली हिरोईन. स्त्रियांना फक्त स्कर्टच घालणे चांगले मानले जायचे, पॅन्ट घालणाऱ्या स्त्रिया म्हणजे वाया गेलेल्या, characterless स्त्रिया, कपड्यांच्या बाबतीत स्त्रियांवर एवढी बंधने होती... पॅन्ट वापरायला सोपी होती, पण परंपरा आणि modesty च्या नावाखाली स्कर्टच वापरावा लागे.
कॅथरीन हेपबर्न यांनी जेव्हा पॅन्ट वापरायला सुरू केले तेव्हा movie production ने त्यांची पॅन्ट जप्त केली होती. Movie फ्लॉप होईल म्हणून. त्यांच्यावर बंदी घातली. तरीही कॅथरीन हेपबर्न यांनी पॅन्ट घालूनच movies केल्या आणि एकापाठोपाठ एक hit movies दिल्या. सगळ्यात जास्त ऑस्कर पण मिळवले.
कॅथरीन हेपबर्न यांनी पॅन्ट वापरायला सुरू केल्यानंतर बाकीच्या स्त्रियांनी सोयोचे म्हणून pant वापरायला सुरू केले आणि कपड्यांच्या बाबतीत स्त्रियांना मोकळा श्वास मिळायला सुरुवात झाली.
23/03/2026
स्त्रियांना पुरुषांच्या दयेवर जगण्याची गरज नाही, त्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागेल.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
23/03/2026
स्त्रियांनी केवळ सुशिक्षित होऊन चालणार नाही, तर त्यांनी निर्भीड बनले पाहिजे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
16/03/2026
निमंत्रण: विशेष व्याख्यान ⚖️📜
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (पुणे शहर शाखा) आयोजित एका महत्त्वपूर्ण विषयावरील व्याख्यानासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण!
भारतीय लोकशाहीत आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत 'धर्मस्वातंत्र्य' हा विषय अत्यंत कळीचा आहे. याच पार्श्वभूमीवर नव्या अधिनियमाची व्याप्ती आणि आव्हाने समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
🔹 विषय: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ : पार्श्वभूमी, स्वरूप आणि आव्हाने
🔹 मार्गदर्शक: डॉ. शमसुद्दीन तांबोळी (अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ) 🎤
🗓️ दिनांक: १८ मार्च २०२६
🕗 वेळ: संध्याकाळी ८:३० वाजता
📍 माध्यम: Google Meet (ऑनलाइन)
🔗 सहभागी होण्यासाठी लिंक:
https://meet.google.com/kmg-nnmu-pct
सामाजिक न्यायाचा आणि संविधानाचा विचार अधिक प्रगल्भ करण्यासाठी या व्याख्यानात नक्की सहभागी व्हा. आपले मित्र आणि परिचितांनाही हे निमंत्रण आवर्जून पाठवा. 🤝
धन्यवाद!
आयोजक:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती - पुणे शहर शाखा.