13/09/2026
*येरवडा खुल्या कारागृहात बंदीवानांसाठी "मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर तसेच नेत्ररोग व त्वचारोग तपासणी शिबिर संपन्न.*
*येरवडा खुले कारागृह, समता फाउंडेशन आणि ऍडव्होकेट पिंकी शर्मा राजगुरू, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार, दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी येरवडा खुल्या कारागृहातील शिक्षा बंदीवानांसाठी "मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर तसेच नेत्ररोग व त्वचारोग तपासणी शिबिराचे" आयोजन करण्यात आले होते.*
*महाराष्ट्र राज्याचे मा. महासंचालक (कारागृहे व सुधारसेवा) डॉ. सुहास वारके, विशेष महानिरीक्षक श्री. योगेश देसाई आणि पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक श्री. सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले.*
*या कार्यक्रमाच्या सुरुवातीला येरवडा खुल्या कारागृहाचे अधीक्षक श्री. शामकांत शेडगे यांनी शिबिरासाठी उपस्थित सर्व डॉक्टर व ऍडव्होकेट मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.*
*बंदीवानांमधील संभाव्य आरोग्यविषयक समस्या प्राथमिक टप्प्यातच ओळखणे, आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय उपचार व कायदेशीर प्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शन मिळवून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.*
*या शिबिरामध्ये 100 पेक्षा अधिक शिक्षा बंदीवानांनी सहभाग नोंदवला. तज्ज्ञांकडून नेत्र आणि त्वचेची तपासणी करून वैद्यकीय लाभ घेतला.*
*ऍडव्होकेट पिंकी शर्मा राजगुरू यांनी बंदीवानांना कायदेविषयक मार्गदर्शन करून शिक्षेनंतर देखील न्याय मिळविण्याकरिता उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखलकरता येते याविषयीच्या बाबी सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.*
*या प्रसंगी कारागृह अधीक्षक श्री. शामकांत शेडगे, ऍडव्होकेट पिंकी शर्मा राजगुरू, समता फाउंडेशनचे श्री. बालाजी नलावडे, नेत्रतज्ज्ञ डॉक्टर गणेश नरहरी, तुरुंगाधिकारी श्री. नागनाथ भानवसे आणि श्रीमती निशा श्रेयकर प्रामुख्याने उपस्थित होते.*
*हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तुरुंगाधिकारी श्री. नागनाथ भानवसे, तुरुंगाधिकारी निशा श्रेयकर, सुभेदार बालाजी सावंत, सुनील गायकवाड, चंद्रकांत खांदवे, हवालदार राजेंद्र धनगर, दत्तात्रय मोडक, भोसले, भीमराव थोरात, लता पिसे, महिला कारागृह शिपाई संध्या जाधवर, शैला कदम, सरला साबळे, रेश्मा आदलिंगे, तसेच कारागृह शिपाई याकुब शेख, वैभव पाटील, संतोष जाधव, महेश हळदकर, महेंद्र लोहकरे, मोहसिन शेख, लिपिक प्रवीण खुस्पे, वरिष्ठ अधिकारी गोविंद गावडे, मिश्रक (फार्मासिस्ट) अभिषेक रौंधळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराला कारागृहातील बंदीवानांचा मोठा प्रतिसाद मिळाला.*