वीर बाजी पासलकर स्मारक

वीर बाजी पासलकर स्मारक

Share

पुणे महानगर पालिकेचे आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचलित वीर बाजी पासलकर स्मारक

Photos from वीर बाजी पासलकर स्मारक's post 29/12/2025

वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित मासिक डिसेंबर 2025

कार्यक्रम वृत्त

शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी चौथे पुष्प उत्साहात संपन्न झाले.

पुणे महानगरपालिकेचे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचालित वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी हे मासिक व्याख्यान आयोजित केले जाते.

आज झालेल्या व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती. इंद्रायणी चव्हाण लाभलेल्या होत्या. Operation Sindoor _Inside story असा विषय होता. नुकतेच त्यांचे Operation Sindoor या विषयाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. घडलेल्या घटनेचा चित्त थरारक असा इतिहास त्यांनी सर्वांपुढ मांडला. "सध्या या operation ला विराम मिळालेल आहे, हे युद्ध थांबलेलं नाही. कधीही परत सुरु होऊ शकत. संपूर्ण Operation ची आखनी करताना भारतीय संस्कृती, परंपरा, आपल्या पूर्वजाचे स्मरण केल्याचे दिसून येते." हे त्यांनी आवर्जून सांगितले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रोहन शिरीष चाटे, विंग कमांडर विनायक डावरे उपस्थित होते. या सोबतच समितीचे अध्यक्ष श्री. शरद जगताप, सचिव श्री. प्राज भिलारे, कार्यवाह श्री. सुरेश महल्ले व अन्य समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी 70 नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. शंकर मरगळे यांनी केले, प्रास्ताविक श्री. प्राज भिलारे तर श्री. गजानन देशमुख यांनी परिचय करून दिले. सामूहिक शिववंदने ने कार्यक्रमाची सांगता झाली.

26/12/2025

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचालित वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित

📍 मासिक व्याख्यान📍

विषय - Operation Sindoor_Inside story

वक्ते - श्रीमती. इंद्रायणी चव्हाण (लेखिका, अभ्यासक)

Operation Sindoor_ हे भारताचे आक्रमक असे मिशन ज्या माध्यमातून आता पर्यंत भारताने अनेक कारवाया केल्या आहेत. या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी आपण जरूर सहभागी व्हा. कार्यक्रमाचे वक्ते *श्रीमती. इंद्रायणी चव्हाण यांचे नुकतेच Operation Sindoor* यावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. आज पर्यंत अनेक लेख त्यांचे प्रकाशित झाले आहेत, अनेक पुस्तकांचे अनुवादन त्यांनी केले आहे, अनेक टीव्ही मालिकांचे लेखन त्यांनी केले आहे. असा हा विषय ऐकण्यासाठी जरूर या.

दिनांक - शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
वेळ - सायंकाळी 7 वाजता*

स्थळ - वीर बाजी पासलकर स्मारक, छत्रपती राजाराम पुलाजवळ, सिंहगड रोड, पुणे.

Photos from वीर बाजी पासलकर स्मारक's post 16/12/2025

वीर बाजी पासलकर स्मारक समिती मासिक व्याख्यान - नोव्हेंबर 2025

कार्यक्रम वृत्त

शुक्रवार, 28 नोव्हेंबर रोजी तिसरे पुष्प उत्साहात संपन्न झाले.

पुणे महानगरपालिकेचे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचालित वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी हे मासिक व्याख्यान आयोजित केले जाते. *ऐतिहासिक विषयांचा मागोवा घेणे, खरा इतिहास सर्वांच्या समोर मांडणे, खोटा विमर्श खोडून काढणे या सोबतच नवोदित वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश्य समोर ठेवून या मासिक व्याख्यानाची सुरुवात झाली आहे.

या मासिक व्याख्यानासाठी श्री. मोहन शेटे यांनी 'असा होता शनिवार वाडा' या विषयावर अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली शनिवार वाडा चे ऐतिहासिक वैभव, निर्मिती प्रक्रिया, राज्य कारभार, या सोबतच वाड्यासंबंधी असलेल्या अनेक प्रेरणादायी आठवणीना यावेळी त्यांनी उजाळा दिला आणि प्रत्यक्ष ते चित्र इतिहास प्रेमी श्रोत्यांच्या पुढे उभे केले. या वेळी परिसरातील इतिहास अभ्यासक, नागरिक बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोडी लिपी तज्ञ्, अभ्यासक अशोक सरपाटील उपस्थित होते. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष श्री. शरद जगताप, सचिव श्री. प्राज भिलारे, कार्यवाह श्री. सुरेश महल्ले व अन्य समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी 110 नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. सुनील कदम यांनी केले, प्रास्ताविक श्री. प्राज भिलारे तर श्री. अभय मोरे यांनी परिचय करून दिले. सामूहिक शिववंदने ने कार्यक्रमाची सांगता झाली.

28/11/2025

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचालित वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित

📍मासिक व्याख्यान📍

पुणे शहराची ओळख अनेक ऐतिहासिक संदर्भाने आहे, त्यामधील एक म्हणजे शनिवारवाडा.

शनिवार वाड्याबद्दल सुद्धा अनेक गोष्टी आहेत, भ्रम संभ्रम आहेत, अनेक प्रश्न सुद्धा आहेत पण या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे, योग्य ठिकाणी मिळत नाहीत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि पुण्याचा दैदीप्यमान इतिहास जाणून घेण्यासाठी आपण जरूर सहभागी व्हा. 🙏🙏

विषय - असा होता शनिवारवाडा
वक्ते - श्री. मोहन शेटे (इतिहास तज्ञ, अभ्यासक)

दिनांक - शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
वेळ - सायंकाळी 7 वाजता

स्थळ - वीर बाजी पासलकर स्मारक, राजाराम पुलाजवळ, सिंहगड रोड, पुणे.

Photos from वीर बाजी पासलकर स्मारक's post 03/11/2025

वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित मासिक व्याख्यान वृत्त

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी पहिले पुष्प उत्साहात संपन्न झाले.

पुणे महानगरपालिकेचे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचालित वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी हे मासिक व्याख्यान आयोजित केले जाते. ऐतिहासिक विषयांचा मागोवा घेणे, खरा इतिहास सर्वांच्या समोर मांडणे, खोटा विमर्श खोडून काढणे या सोबतच नवोदित वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश्य समोर ठेवून या मासिक व्याख्यानाची सुरुवात झाली आहे. पहिल्या व्याख्यानासाठी श्री. सुजित तांबे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे धर्म रक्षणाचे कार्य या विषयावर अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. या वेळी परिसरातील इतिहास अभ्यासक, नागरिक बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू युवा प्रबोधिनीचे श्री. राजेंद्र बेंद्रे उपस्थित होते. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष श्री. शरद जगताप, सचिव श्री. प्राज भिलारे, कार्यवाह श्री. सुरेश महल्ले व अन्य समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. अभय मोरे यांनी केले तर, आभार प्रदर्शन श्री. सम्राट लाड यांनी केले. सामूहिक शिववंदने ने कार्यक्रमाची सांगता झाली.

31/10/2025
Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


203, Narveer Tanaji Malusare Road, Jaydeo Nagar, Dattawadi, Pune 411030
Pune
411051